विकसित भारत संकल्प यात्रेला
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
· शेंबोली येथील कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड, (जिमाका) दि. 16 :- शासकीय योजनांप्रती प्रत्येक गावात विश्वासर्हता निर्माण व्हावी, लोकांच्या मनात काही शंका असल्यास त्याचे निरसन व्हावे यादृष्टीने विकसित भारत संकल्प यात्रेला ग्रामीण भागात उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. शेंबोली येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे, त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे, आरोग्यापासून निवासापर्यंत सुविधा मिळाव्यात, शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृद्ध व्हावेत यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. लोकांच्या मनामध्ये शासकीय योजनांप्रती ज्या काही धारणा आहेत त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होत आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून ही यात्रा प्रत्येक लाभधारकापर्यंत पोहोचावी यादृष्टिने चोख नियोजन केले आहे. आज शेंबोली येथील कार्यक्रमात ज्यांची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत व ज्यांनी मतदार ओळखपत्रासाठी नाव नोंदणी केली अशा युवकांचा सत्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुदखेडचे तहसीलदार मुगाजी काकडे, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, तालुका आरोग्य अधिकारी गुट्टे, महिला बाल विकास अधिकारी श्रीमती पुणे, आरोग्य अधिकारी कासराळीकर, विस्तार आधिकारी लतीफ यांच्यासह तालुकास्तरीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
00000