Friday, September 13, 2024

वृत्त क्र. 837

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या 

लाभार्थ्यांची निवड 19 सप्टेंबर रोजी लॉटरी पद्धतीने होणार 

नांदेड दि. 13 :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत सुविधा कर्ज योजना (एनएसएफडीसी) 5 लाख व महिला समृध्दी (एमएसवाय) 1.40 लाख या योजनेचे कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड गुरूवार 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. ग्यानमाता शाळेसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सभागृहात लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चिट्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) होणार आहे.  

या कर्ज प्रकरणांची ईश्वरी चिट्ठी (लॉटरी) द्वारे निवड करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड तथा ईश्वर चिट्ठी समितीचे अध्यक्ष यांनी दिलेल्या मान्यतेनुसार चिट्ठीव्दारे (लॉटरी पद्धतीने) ही निवड करण्यात येणार आहे. या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे. पात्र अर्जदारांची यादी या महामंडळ कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. याची संबधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) नांदेड यांनी केले आहे. 

0000

 वृत्त क्र. 836

संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे रविवारी आयोजन    

नांदेड दि. 13 :- संविधान मंदिर लोकार्पण कार्यक्रम भारताचे  उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांच्या हस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वा. ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्यात येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास परिसरातील ज्येष्ठ मंडळी, प्रतिष्ठित नागरीक, पालक, विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन उमरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जे. एस. गायकवाड यांनी केले आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी या हेतूसाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
0000

 वृत्त क्र. 835 

सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

 

नांदेड दि. 13 सप्टेंबर : सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवरअफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेतअसे आवाहन त्यांनी केले आहे.

 

या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखावेवेगवेगळ्या प्रतिकृतीवेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धीबातम्यालेखअग्रलेखफोटोव्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईलयाबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे.

 

तथापिकाही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणारेतसेच सोशल मीडियाचा गैरवापर करणारे असामाजिक तत्व वृत्त देताना,पोस्ट करतानासामाजिक जाणीवांचे भान ठेवत नाही. अशांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा. तसेच नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्ट बद्दल प्रतिक्रिया देताना व्हाट्सअपफेसबुकइंस्टाग्राम वरील पोस्ट नेमक्या कुठल्या आहेत याची खातर जमा करावी. शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी.

 

काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. परस्परांच्या धर्माविरुद्धधार्मिक कार्यक्रमासंदर्भात अफवा पसरवितातटीका टिपणी करतातत्यामुळे जनतेने सावध असावे.

 

नांदेड शहराला सर्व धर्मियांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे .त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. नांदेडच्या प्रिंटइलेक्ट्रॉनिक्ससोशल मीडियामेडिया इन्फ्लुअन्सरशांतता समितीच्या सदस्यांनी अशा प्रकारे माध्यमांचा कोणी गैरवापर करत असेल तर याबाबत पोलीस विभागाला अवगत करावेअसे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

00000




  वृत्त क्र. 834

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार शनिवारी धाराशिव जिल्हयात

 परंडा येथे 14 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम

नांदेड दि.13 सप्टेंबर : राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे.14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता परंडा शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण अभियानाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे, राणाजगजितसिंह पाटील,ज्ञानराज चौगुले व कैलास पाटील यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहेत.

या कार्यक्रमात जिल्हयातील 10 यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.विविध विभागाअंतर्गत 9 महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभाचे वाटप, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत 5 महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 15 महिलांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांचे योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारुन त्यामध्ये महिलांविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे.आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबीराचे आयोजन करुन महिलांची आरोग्य तपासणी व सकस आहार यासह स्वच्छताविषयक माहिती देण्यात येणार आहे. 

कामगार विभागाच्या वतीने महिला कामगारांना भांडी वाटप करण्यात येणार आहेत.महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून महिला बचतगटांची नोंदणी करण्यात येवून स्टॉलच्या माध्‍यमातून महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला जिल्हयातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

 ***

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...