Friday, September 13, 2024

 वृत्त क्र. 835 

सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर

 

नांदेड दि. 13 सप्टेंबर : सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवरअफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेतअसे आवाहन त्यांनी केले आहे.

 

या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखावेवेगवेगळ्या प्रतिकृतीवेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धीबातम्यालेखअग्रलेखफोटोव्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईलयाबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे.

 

तथापिकाही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणारेतसेच सोशल मीडियाचा गैरवापर करणारे असामाजिक तत्व वृत्त देताना,पोस्ट करतानासामाजिक जाणीवांचे भान ठेवत नाही. अशांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

 

त्यामुळे समाज माध्यमांचा योग्य प्रकारे सर्वांनी वापर करावा. तसेच नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्ट बद्दल प्रतिक्रिया देताना व्हाट्सअपफेसबुकइंस्टाग्राम वरील पोस्ट नेमक्या कुठल्या आहेत याची खातर जमा करावी. शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी.

 

काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. परस्परांच्या धर्माविरुद्धधार्मिक कार्यक्रमासंदर्भात अफवा पसरवितातटीका टिपणी करतातत्यामुळे जनतेने सावध असावे.

 

नांदेड शहराला सर्व धर्मियांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे .त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. नांदेडच्या प्रिंटइलेक्ट्रॉनिक्ससोशल मीडियामेडिया इन्फ्लुअन्सरशांतता समितीच्या सदस्यांनी अशा प्रकारे माध्यमांचा कोणी गैरवापर करत असेल तर याबाबत पोलीस विभागाला अवगत करावेअसे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.

00000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...