Saturday, January 15, 2022

 राष्‍ट्रीय मतदार दिनानिमीत्‍त विविध स्‍पर्धांचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्‍हा प्रशासनाकडुन राष्‍ट्रीय मतदार दिनाच्‍या अनुषंगाने आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेत जिल्‍हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिकांनी व नवमतदारांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 या महामारीच्‍या संदर्भात केंद्र व राज्‍य सरकारकडुन निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन यावर्षीचा राष्‍ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्‍यात येणार आहे.

 

यामध्‍ये इयत्ता नववी ते बारावी व पदवी, पदव्युत्तर वयोगटातील तसेच सर्व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी / महिला/ नागरिकासाठी लोकशाही आकाशकंदील बनविणे व भित्तीपत्रक तयार करणे इ. स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारे स्‍पर्धकांनी (विद्यार्थी) आकाशकंदील/ भित्तीपत्रक तयार करून 19 जानेवारी पर्यंत आपले शाळा महाविद्यालयात अथवा तालुक्‍यातील संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. खुल्या गटातील स्पर्धक महिला / नागरिक यांनीही तयार केलेले आकाशकंदील / भित्‍तीपत्रक इ. संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. उक्‍त प्राप्‍त विजेत्‍यामधुन तालुकास्‍तरावर प्रत्‍येक गटातून प्रथम/व्दितीय विजेते निवड करण्‍यात येतील.

 

स्‍पर्धेचे निकष / नियम :

लोकशाही आकाश कंदील

Ø  लोकशाही आकाश कंदीलावर निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार नोंदणी /जागृती इ.  बाबत संदेश/घेाषवाक्‍य / लोगो/चित्र असणे बंधनकारक राहील..

Ø  स्‍पर्धक लोकशाही आकाश कंदील त्‍यांना हवा त्‍या आकाराचा बनवू शकतील, आकाराचे बंधन राहणार नाही.

Ø  यासाठी लागणारे साहित्‍य  – आकाश कंदील तयार करण्‍यासाठी पर्यावरणपूरक साहित्‍याचा वापर केला जावा. डिझायनिंग करण्‍यासाठीचे रंग/रंगीत पेपर/जिलेटिन पेपर/तसेच इतर साहित्‍य स्‍पर्धकांनी स्‍वत: आणून घरी लोकशाही आकाश कंदील तयार करावायाचा आहे.

भित्‍तीपत्रक -

Ø  भित्‍तीपत्रकाचा आकार Regular Drawing Sheet  (Emperor size)  च्‍या आकाराचा असावा.

Ø  भित्‍तीपत्रावर  चित्रे /लिखीत मजकूर लिहीता अथवा चिकटवता येईल./ परंतु निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार जागृती इ.  बाबत संदेश/घेाषवाक्‍य असणे बंधनकारक राहील.

Ø  भित्तीपत्रकावर निवडणूक विषयक – लोकशाही, मतदार नोंदणी व मताधिकार  याबाबतचे लोगो/चित्र ही काढता येईल.

 

तसेच गाणी लोकशाहीची मतदान अधिकाराची ही संकल्पना घेऊन एक नवीन गीतरचना तयार करुन त्याचे जास्तीत जास्त चार मिनिटांचा व्हीडिओ बनवून (संगीत, नृत्य नेपथ्यासह) टेलीग्राम 9284453899 वर दिनांक 23 जानेवारी पर्यंत पाठवायचे आहेत.

00000

ग्रामपंचायत पोटनिवडणूक मतदान,

मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलम

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांची पोटनिवडणूक 2021-22 च्या अनुषंगाने मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी व बुधवार 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागु करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी 18 जानेवारी रोजी ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या मतदान केंद्रापासून व 19 जानेवारी 2022 रोजी ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामव्यतीथ्रकत खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंधीत करण्यात आले आहे. याबाबत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.  

 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायती मधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूक 2021-22 साठी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात मंगळवार 18 जानेवारी रोजी मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंत आणि बुधवार 19 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरु झाल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील.  

 

नांदेड तालुक्यातील सिद्धनाथ, त्रिकुट. अर्धापूर तालुक्यातील आमराबाद, आमराबाद तांडा, शेलगाव खु. देळुब खु, रोडगी. मुदखेड तालुक्यातील खांबाळा, हिस्सापाथरड. हदगाव तालुक्यातील महाताळा / वरुला, फळी चेंडकापुर, भाटेगाव, माटाळा. हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी. बिलोली तालुक्यातील तोरणा, रुद्रापुर, गागलेगाव, हिप्परगाथडी. देगलूर तालुक्यातील काठेवाडी, करडखेडवाडी. कंधार तालुक्यातील शिरसी खु. औराळ, रहाटी, मसलगा तर लोहा तालुक्यातील रायवाडी, हिंदोळा/करमाळा, लिंबोटी खरबी या ग्रामपंचायतीचा पोटनिवडणुक कार्यक्रमात समावेश आहे.

00000


 नांदेड जिल्ह्यात 421 व्यक्ती कोरोना बाधित तर 62 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या हजार 818 अहवालापैकी 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 364 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 163 एवढी झाली असून यातील 88 हजार 288 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला हजार 220 रुग्ण उपचार घेत असून बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्थाप्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्कसॅनिटायझरसुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावेअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 17भोकर 3देगलूर 5धर्माबाद 3, हिमायतनगर 1, कंधार 6किनवट 1लोहा 7माहूर 1मुदखेड 3मुखेड 3नायगाव 3वाशीम 1, परभणी 6, हिंगोली 2, अकोला 1, अमरावती 1, जालना 2, पुणे 1, यवतमाळ 1, गडचिरोली 1, मुंबई 1, हैद्राबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 2, भोकर 1, बिलोली 11, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, किनवट 3, माहूर 1, मुदखेड 4, मुखेड 11, नायगाव 3 असे एकूण 421 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53खाजगी रुग्णालय 3नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.

 

आज 2 हजार 220 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 477नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण हजार 697खाजगी रुग्णालय 22 अशा एकुण 2 हजार 220 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- लाख 16 हजार 179

एकुण निगेटिव्ह स्वॅब- लाख 8 हजार 927

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 93 हजार 163

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 288

एकुण मृत्यू संख्या-हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.76 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-33

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-108

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 2 हजार 220

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावाअसेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...