Wednesday, October 3, 2018


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरात
शुक्रवारी टोंपे, तिडके यांचे व्याख्यान
            नांदेड दि. 3 :- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती, नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यावतीने उज्ज्वल नांदेड" हिमेअंतर्गत शुक्रवार 5 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामध्ये  डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे उपजिल्हाधिकारी सोपान टोपे हे पूर्व परीक्षेविषयी तर बालविकास प्रकल्प अधिकारी कैलास तिडके हे डिसेंबरमध्ये होणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराउपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


आरोग्य शिबिरात
212 ज्येष्ठ नागरिकांची तपासणी
नांदेड, दि. 3 :- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त 60र्षे वयोगटावरील जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबीर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुगोबिंद सिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतेच घेण्यात आले. यावेळी 212 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी नांदेड शहर शाखेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के, उत्तर मराठवाडा जेष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष अशोक तेरकर, महासंघाचे सचिव भागीरथी बच्चेवार, कोषाध्यक्ष जयवंतराव सोमवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉ. तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात 212 जेष्ठ नागरिकांचे महुमेह, उच्च रक्तदाब, मोतीबिंदू व मौखिक आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 69 जेष्ठ नागरिकांची ईसीजी काढण्यात आले.
शिबिरास अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर, एनसीडी कार्यक्रमाचे नोडल ऑफीसार एच. आर. गुंटूरकर, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक सदाशिव सुवर्णकार, शितल उदगीरकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी केले तर आभार डॉ. एच. के. साखरे यांनी मानले.
000000

शौर्यदिन उत्साहात साजरा  
सैनिकांचा जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केला सत्कार
नांदेड, दि. 3 :- शौर्यदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे नुकतेच करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी उपस्थित विरनारी, विरपिता व ऑपरेशनमधील अपंग माजी सैनिक, माजी सैनिकांचा सत्कार केला.
यावेळी विरनारी श्रीमती अरुणा टर्के, श्रीमती शितल कदम, श्रीमती ज्योती थोरात, विरपिता धोंडीबा जोंधळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे, ऑन कॅ. जाधव यांच्यासह  जवळपास 110 माजी सैनिक उपस्थित होते. तसेच कर्नल विकास शांडीले, कमान अधिकारी, 52 महा. बटालियन, एनसीसी व त्यांच्यासोबत 8 सेवारत सैनिक, मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी  शौर्यदिनाचे महत्व सांगून विरमाता, वीरपत्नी  व  सर्व  माजी सैनिकांनी केलेल्या त्यागाबाबत व सेवेबाबत आभार व्यक्त केले. सैनिकांच्या अडीअडचणी असल्यास नि:संकोचपणे मांडव्यात असे आवाहन त्यांनी केले.  
यावेळी मेजर  बिक्रमसिंग थापा व मा सै ऑन कॅप्टन प्रकाश कस्तूरे  यांनी  सर्जीकल स्ट्राईक व भारताची सैन्य ताकद याची माहिती दिली. सुरुवातीला शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व दिपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण संघटक कमलाकर शेटे यांनी शौर्य दिन साजरा करण्याबाबत शासनाची भुमिका सांगितली. सुत्रसंचालन माजी सैनिक अजय कानोले यांनी केले तर आभार माजी सैनिक पी. झगडे यांनी मानले. या कार्यक्रमास सैनिकी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000000

वृत्त क्र.   पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   नांदेड दि. 24 जानेवारी :- राज्याचे इतर मागास बहूजन कल्याण , दूग्धविकास , अपारंपारि...