Friday, February 18, 2022

 नांदेड जिल्ह्यात 19 व्यक्ती कोरोना बाधित

तर 69 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 53 अहवालापैकी 19 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 15 तर अँटिजेन तपासणीद्वारे 4 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 727 एवढी झाली असून यातील 99 हजार 901 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 138 रुग्ण उपचार घेत असून यात 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 688 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, देगलूर 1, हदगाव 1, माहूर 4, मुदखड 2, लोहा 1, उमरखेड 1, आंध्रप्रदेश 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, लोहा 1, नायगाव 1 असे एकुण 69 कोरोना बाधित आढळले आहे.

 आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 28,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 40 असे एकुण 69 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 113, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 138 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 67 हजार 845

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 48 हजार 307

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 727

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 99 हजार 901

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 688

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.24 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-11

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-138

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4. 

कोरोना विषाणुची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुन: येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधीनंतर दुसऱ्या लसीचा डोस अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

000000

 भूमि अभिलेख विभागाच्या गट-क संवर्गातील

पदभरतीसाठी छाननी अर्ज भरण्याच्या सूचना


नांदेड (जिमाका) दि. 18 :- भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह 4 (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारण करीत असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची सुविधा विभागाच्या http://landrecordsrecruitment2021.in http://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 09 ते 31 डियेंबर, 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. 

त्यानुसार दिनांक 31 डिसेंबर, 2021 अखेर ऑनलाईन स्वरुपात स्वीकरण्यात आलेल्या एकूण 76 हजार 379 अर्जांचा डाटा विभागाकडे प्राप्त झालेला आहे. या डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले, त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे आढळले तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पध्दतीने अपलोड केल्याचे दिसून आले आहे. 

या कारणामुळे विभागाने ऑनलाईन स्वरुपातील प्राप्त अर्जांमधून अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीकरीता छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणेचे ठरविले आहे. त्याबाबतच्या सविस्तर सुचना विभागाच्या http://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील. 

छाननी अर्ज हे केवळ दिनांक 09 डिसेंबर, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. त्या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करायचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येवून या छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करण्याची सूचना जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केली आहे.

000000

 ई-पीक पाहणीच्या कालमर्यादेत 28 फेब्रुवारी पर्यंत वाढ

नांदेड (जिमाका) दि. 18 :- रब्बी हंगामाच्या ई-पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. पीक पाहणीच्या नोंदणीसाठी 1-0-07 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. सर्व खातेदार शेतकऱ्यांनी हे नवीन व्हर्जन अपडेटेड करून घेणे आवश्यक आहे. खातेदार शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी ई-पीक पाहणीची मुदत पूर्वी 15 फेब्रुवारी पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती ई-पीक पाहणीचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी कळविले आहे.

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...