Friday, January 19, 2018

विभागीय क्रडा स्पर्धे शासकीय तंत्रनिकेतनचे यश
नांदेड, दि. 19 : आंतरशाखीय पदविका क्रिडा स्पर्धेत 2018 अंतर्गत विविध क्रिडा प्रकारात शासकीय तंत्रनिकेतन मधील विविध खेळाडूंनी घवघवीत यश मिळविले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे  जिमखना उपाध्यक्ष प्रा. ए. बी. दमकोंडवार यांनी विविध संघाचे अभिनंदन केले.
प्रथम क्रमांकावर राहिलेल्या मुलांच्या कॅरम संघात येलगंटवार लोकेश, गट्टरवार अभिषेक, शेख अन्वर, शुभम् बहादूरे, शेवडकर तुषार, गवळी दीपक तर द्वितीय बक्षिस प्राप्त बुध्दीबळ संघात प्रवीण जाधव, पांचाळ निलेश, पाटील ओंकार, शेख अदिल अथर्व चौधरी यांचा समावेश होता. मुलींच्या कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक विजेत्या संघात देशमुख वृषाली, गुणाले अदिती, जाधव दिपाली, गोडकर प्रियंका नजान सविता यांचा समावेश आहे. ऍ़थेलिटिक्स अंतर्गत 100 मिटर धावणे (रिले) मध्ये प्रथम क्रमांक गोळाफेक मध्ये प्रथम तर 100, 200, 800, 1500 मीटर धावणे थालिफेक मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. या संघात अनुक्रमे कपिल बिरादार, अटलवार सचिन, सोहेल काझी, किरण भूरे, कुणाल देशमुख शेख अन्वर, फैजान रझा, लोहार आकाश यांचा सहभाग होता.
या स्पर्धेसाठी संघव्यवस्थापक म्हणून प्रा. लोकमनवार, प्रा. कुलकर्णी, प्रा. कळसकर, प्रा. राठोड, प्रा. मुधोळकर, प्रा. दुटाळ, कु. वडजे, श्री. लोकरे श्री. पवार, श्री. शेख जावेद यांनी परिश्रम घेतले.

0000
मराठी ज्ञानभाषेसोबत जनभाषा व्हावी
- प्रा. विश्वाधर देशमुख
नांदेड, दि. 19 :-             मराठी भाषेकडे केवळ एक भाषा म्हणून बघू नका मराठी ज्ञानभाषा रहाता ती जनभाषा होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विख्यात साहित्यिक प्रा. विश्वाधार देशमुख यांनी येथील शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात आयोजित व्याख्याना प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी. डी. पोपळे हे होते.
            प्रा. देशमुख यांनी मराठी भाषेचे महत्व विशद करतांना मराठी भाषा संवर्धनासाठी युवा वर्गाची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले. मराठी भाषेत इतर भाषेची सरमिसळ झाल्याने मराठी भाषा आता पिजन झालेली आहे. मराठी भाषेला आपली जीवन दाहिनी करुयात मातृभूमी, मातृभाषा माता यांच्यावर आपण प्रेम करुन ऋण फेडले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. कविताचा माध्यमातून युवा विद्यार्थ्यांची मने प्रा. विश्वाधर देशमुख यांनी जिंकले.
            अध्यक्षीय समारोपात संस्थचे प्राचार्य पोपळे यांनी मराठी भाषेला आपण शालेय जीवनापासून टाळतो. आपलीच भाषा आपल्याला अवघड वाटते. वास्तविकत: मराठीचे महत्व वैश्विक स्तरावर नेण्यासाठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत मराठीला जपावे असा संदेश त्यांनी दिला.
याअंतर्गत "मराठी असे अमुची मायबोली" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ऋषीकेश अमलापुरे यांना प्रथम, जाधव प्रवीण यास द्वितीय तर प्रोत्साहनपर बक्षिस पवन तिवारी, स्वप्नील वट्टमवार यांना देण्यात आले. यावेळी प्रा. सकळकळे, प्रा. ए. एम. लोकमनवार, प्रा. कदम प्रा. कळसकर प्रा. राठोड प्रा. मुधोळकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. व्ही. कुलकर्णी यांनी केले तर मान्यवर पाहुण्यांचा परिचय डॉ. ए. ए. जोशी यांनी केला. सुत्रसंचलकु. आर. के. देवशी यांनी केले तर अभार डॉ. बिट्टेगिरी यांनी मानले.

00000
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे
सदस्य सी. एल. थूल यांचा दौरा 
नांदेड दि. 19 :-  महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य (विधी) सी. एल. थूल हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील.
शनिवार 20 जानेवारी रोजी मुंबई येथुन देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.30 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 11 वा. नांदेड येथुन डीव्ही कारने हदगावकडे प्रयाण व हदगाव येथील दंगली दरम्यान तसेच पोलीसांनी केलेल्या धाड सत्रात कु. योगेश जाधव यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांची भेट व त्याच्या मृत्यूबाबतची चौकशी आणि इतर शासकीय पुर्तता अहवालाबाबत चर्चा. दुपारी 1 वा. राखीव. दुपारी 3 वा. हदगाव येथून डीव्ही कारने हिंगोलीकडे प्रयाण करतील. रात्री हिंगोली येथुन सोईनुसार डीव्हीकारने नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. रविवार 21 जानेवारी रोजी नांदेड येथुन सकाळी 10 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

00000
आराखड्यानुसार जलयुक्तची
कामे वेळेत पूर्ण करावीत  
- पालक सचिव एकनाथ डवले
नांदेड दि. 19 :- जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार मनरेगाची कामे आराखड्यानुसार कामे वेळेत व नियोजनबद्ध पूर्ण करावीत, असे निर्देश मृद व जलसंधारण विभागाचे सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी आज दिले. डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  
बैठकीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, वनसंरक्षक आशिष ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहु, उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्रीमती अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच संबंधीत विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.  
श्री. डवले म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही शासानाची महत्वाकांक्षी योजना असल्याने या अभियानांतर्गतची कामे येत्या जुनपर्यंत पूर्ण करावीत. पावसाचा थेंब-न-थेंब वाचविण्याची आणि उपयोगात आणण्याची गरज आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे झाली आहेत. तसेच मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, मनरेगा ही योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचे जियो टॅगिंगची कामे व छायाचित्र आपलोड करण्याची कामे तात्काळ पुर्ण करावीत, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच कृषी, वन, लघुसिंचन (जसं), लघुपाटबंधारे (जि.प.), पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत छायाचित्रे अप आदि विषयांवर उपयुक्त सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी श्री डोंगरे यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडण्यात आलेली गावे व कामांची माहिती  सादरीकरणाद्वारे दिली. तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात सन 2016-17 मध्ये एकुण 8 हजार 220 कामे पूर्ण झाल्याची माहिती दिली.
यावेळी पालक सचिव श्री डवले यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील 2017-18 करिता सर्वसाधारण , अनुसचित जाती  उपयोजना, आदिवासी उपयोजना अंतर्गत डिसेंबर 2017 अखेर मंजूर तरतूद, प्राप्त तरतूद आणि झालेल्या खर्चाचा आढावा घेतला.  

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...