Saturday, November 17, 2018

देगलूर, मुखेड, उमरी तालुक्यात
दुष्काळ सदृश्य परिस्थिती ;
विविध उपाययोजना, सवलती लागू
नांदेड, दि. 17 :- जिल्ह्यातील देगलूर, मुखेड व उमरी या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जाहिर केली आहे. शासन निर्णयान्वये सन 2018-19 च्या खरीप हंगाम Trigger-2 लागू झालेल्या देगलूर, मुखेड व उमरी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत.  
दुष्काळसदृश्य परिस्थिती देगलूर, मुखेड व उमरी तालुक्यामध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सुट. शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू राहतील.
00000

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात बैठक संपन्न
ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानाने जीवन जगावे
-         न्या. वसावे
नांदेड दि. 17 :- ज्येष्ठ नागरिकांनी सन्मानाने, आनंदाने जीवन जगावे असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी केले.
ज्येष्ठ नागरीकांना मोफत विधीसेवा सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड येथे प्राधिकरणाचे सचिव न्या. वसावे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अॅड. व्ही. डी. पाटनुरकर अशोक तेलकर हे उपस्थित होते.   
न्या. वसावे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांची तक्रार किंवा समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोबत आहे. कोणालाही त्यांचे हक्क अधिकार हिरावू घेता येत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची वेळेत तपासणी करुन औषध अनियमितपणे घ्यावीत. त्यांना आपले हक्क अधिकार माही असणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती न्या. वसावे यांनी यावेळी दिली.
ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या जाणून दाखलपूर्व प्रकरणांचा विचारआवश्यक विधी सेवा उपलब्ध रु देण्याबाबत सूचित केले. जेष्ठ नागरीकांचे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्याबाबत संबधित न्यायालयासुचना देण्यात ली. यावेळी ज्येष्ठ नागरीकांना आवश्यक त्यांना मोफत वकिल देण्यात आला होता.
0000




शेतकरी सन्मान योजनेंतर्गत
एक वेळ समझोतासाठी मुदतवाढ
नांदेड दि. 17 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत एकवेळा समझोतासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह 1 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता (वन टाईम सेटलमेंट) योजनेखाली पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी 31 डिसेंबर 2018 पर्यत वाढविण्यात आला आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...