Friday, April 17, 2020


कोरोना : नांदेड जिल्ह्यात नियंत्रणात
182 जणांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण
            नांदेड दि. 17 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 570 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 182 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 56 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 40 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 530 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 26 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 322 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 290 नमुने निगेटीव्ह आले असून 27 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 75 हजार 64 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड यांनी दिली आहे.
000000


नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका
हद्दीत ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना
नांदेड, दि. 17 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा  भाग म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात ॲन्टी कोरोना कवच / फोर्सची समिती स्थापना मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी आदेशाद्वारे केली आहे. या समितीत क्षेत्रिय कार्यालय निहाय वसुली लिपीक यांची अध्यक्ष व संबंधित वार्डाचे स्वच्छता निरीक्षक यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
पथक प्रमुख व वसुली लिपीक, करनिरीक्षक / पर्यवेक्षक यांचे नाव, पदनाम पुढील प्रमाणे आहेत. क्षेत्रिय कार्यालय क्रमांक एक तरोडा-सांगवी - वसुली पर्यवेक्षक (कर)- बळीराम यंगडे, साहेबराव ढगे. वसुली लिपीक- विठ्ठल तिडके, सचीन गजभारे वार्ड ब्लॉक क्र. 1.22, राजू जोरवर वार्ड ब्लॉक क्र. 1.23. शादुल्ला वार्ड ब्लॉक क्र. 12.4, सतिश महाबळे वार्ड ब्लॉक क्र. 13.2, मारोती रणखांबे वार्ड ब्लॉक क्र. 13.5, रंगनाथ भोसले वार्ड ब्लॉक क्र.13.6, एन. एम. कल्याणकर वार्ड ब्लॉक क्र. 13.1, बालाजी रत्नपारखे वार्ड ब्लॉक क्र.12.1, गंगाधर भंडारे वार्ड ब्लॉक क्र.12.3, सुनिल टेकाळे वार्ड ब्लॉक क्र. 12.2.8, रमेश ढोले वार्ड ब्लॉक क्र. 12.6, बालाजी कल्याणकर वार्ड ब्लॉक क्र.13.3, सुरेश हिंगोले वार्ड ब्लॉक क्र. 13.4.7, अक्षय कंधारे वार्ड ब्लॉक क्र.12.5, कमलेश छुट्टे वार्ड ब्लॉक क्र.12.7.
क्षेत्रीय कार्यालय क्रमांक दोन अशोकनगर – वसुली पर्यवेक्षक (कर) रणजित पाटील, वसंत कल्याणकर, वसुली लिपीक (कर)- एकनाथ राठोड वार्ड ब्लॉक क्र.1.14, जगदीश जैस्वाल वार्ड ब्लॉक क्र. 1.15, बालाजी लंकवाडे वार्ड ब्लॉक क्र. 1.17, ज्ञानेश्वर मोरे वार्ड ब्लॉक क्र. 1.18, गजानन टाक वार्ड ब्लॉक क्र.1.2, तोलाजी वाईकर वार्ड ब्लॉक क्र., कृष्णा पोतदार वार्ड ब्लॉक क्र.1.12, म. अजरोद्दीन वार्ड ब्लॉक क्र.1.13, संजय नागपूरकर वार्ड ब्लॉक क्र. 1.16, दिलीप इंगोले वार्ड ब्लॉक क्र.1.19, सिद्धार्थ हाटकर वार्ड ब्लॉक क्र.1.21, रामदयालसिंघ ठाकूर वार्ड ब्लॉक क्र. 1.24.
क्षेत्रिय कार्यालय क्रमांक तीन शिवाजीनगर – प्र. वसुली पर्यवेक्षक (कर) परसराम गाढे, वामन भांनेगावकर, अ. नईम अ. गफुर, राजेश कऱ्हाळे. वसुली लिपकी (कर)- लक्ष्मण वाघमारे वार्ड ब्लॉक क्र. 1.1.1.3, राहुल सोनसळे वार्ड ब्लॉक क्र. 1.2, 1.7, धम्मपाल दवणे वार्ड ब्लॉक क्र. 1.4, 1.5, कलमजितसिंघ बुंगई वार्ड ब्लॉक क्र. 1.11, महेंद्र पठाडे वार्ड ब्लॉक क्र. 1.6, 1.25, मेघराज जोंधळे वार्ड ब्लॉक क्र. 1.8, अब्दुल हबीब वार्ड ब्लॉक क्र. 1.9, रामदास हाडे वार्ड ब्लॉक क्र. 1.10.
क्षेत्रिय कार्यालय क्रमांक चार वजिराबाद नांदेड – प्र. वसुली पर्यवेक्षक (कर) रमेश वाघमारे, किरणसिंघ गंगनसिंघ, अजहर अली. वसुली लिपीक (कर)- पंडीत खुपसे वार्ड ब्लॉक क्र. 2.1 व 8, यशवंतकर रमेश वार्ड ब्लॉक क्र.3.2-3, लक्ष्मण सुनेवाड वार्ड ब्लॉक क्र. 2.9-12, रमेश वाघमारे वार्ड ब्लॉक क्र. 3.1, 3.3, गोपाल चव्हाण वार्ड ब्लॉक क्र. 4.1, 2.3, शेख रफिक वार्ड ब्लॉक क्र. 7.14, नरेंद्रसिंघ काटगर वार्ड ब्लॉक क्र. 3.4-5, 3.6.7, लखन कुंटे वार्ड ब्लॉक क्र. 4.4, 5.6, महेंद्र नागरे वार्ड ब्लॉक क्र.5.1-4.
क्षेत्रिय कार्यालय क्रमांक पाच इतवारा – प्र. वसुली पर्यवेक्षक (कर) गोपाल तोटावाड, अब्दुल हबीब. वसुली लिपीक (कर) राजेश ऐडके वार्ड ब्लॉक क्र. 6.7-4, इश्वर वाव्हूळे वार्ड ब्लॉक क्र. 8.1-4, सुरेंद्र जोंधळे वार्ड ब्लॉक क्र. 9.1 ते 3, गुलाम दस्तगीर वार्ड ब्लॉक क्र. 9.4, अशोक पवळे वार्ड ब्लॉक क्र. 9.4, सय्यद गफार वार्ड ब्लॉक क्र. 9.5, शरद नवघडे वार्ड ब्लॉक क्र. 9.6,  आसिफ खान शेर खान वार्ड ब्लॉक क्र. 9.7, नितिन पवार वार्ड ब्लॉक क्र. 9.8.9.
क्षेत्रिय कार्यालय क्रमांक सहा सिडको वाघाळा – प्र. वसुली पर्यवेक्षक (कर) सुधिरसिंह बैस, राजेश्वर आरटवार. वसुली लिपीक (कर)—सुदाम थोरात वार्ड ब्लॉक क्र. 10.1, व्यंकट गायकवाड वार्ड ब्लॉक क्र. 10.2, मारोती सारंग वार्ड ब्लॉक क्र. 10.2, महेश जोंधळ वार्ड ब्लॉक क्र. 11.6, संतोष भदरगे  वार्ड ब्लॉक क्र. 11.7.9, मोराती चव्हाण वार्ड ब्लॉक क्र. 10.3, 4, दिपक पाटील वार्ड ब्लॉक क्र. 11.1, मालू एनफळे वार्ड ब्लॉक क्र. 11.2, राजपालसिंघ जक्रेवाले वार्ड ब्लॉक क्र. 11.3,4.5, नथुराम चौरे वार्ड ब्लॉक क्र. 11.8, सुखदेव जोंधळे वार्ड ब्लॉक क्र. 11.1 याप्रमाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीची कार्यपद्धत शहरात परदेशातून, परराज्यातून व जिल्ह्याबाहेरुन प्रवास करुन आलेल्या व्यक्तींबाबत करावयाची कार्यवाही : शहरातील स्वयंसेवक एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने अध्यक्षांनी नगरांच्या प्रवेश व निकास द्वाराच्या ठिकाणी तपासणी पथकाची नेमणूक तीन शिफ्टमध्ये  24 तास करावी. अशा पथकासाठी आवश्यकता भसल्यास सावलीसाठी टेन्टची व्यवस्था करावी. संबंधित पथकातील स्वयंसेवकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक इ. नियुक्ती आदेशाच्या प्रतीसह संबंधीत क्षेत्रिय कार्यालयास सादर करावे. अशा व्यक्तींची वैद्यकीय पथक येईपर्यंत शहरातील समाज मंदीर, शाळा, इत्यादी वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. या व्यक्तींची तात्काळ संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन घेण्यात यावी. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार या व्यक्तीस प्रादूर्भावाचे लक्षणे दिसून आली नसल्यास त्यास गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्यास त्यास नजीकच्या कॅम्पमध्ये किंवा शहरातील समाज मंदिर शाळा याठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी. तपासणीमध्ये प्रादुर्भाची लक्षणे किंवा संशयास्पद स्थिती आढळून आल्यास त्यांना तात्काळ शासकीय विलगीकरण केंद्रात दाखल करावे. बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा नांदेड यांच्याकडे सादर करावी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा नांदेड यांनी विहित प्रपत्रात आयुक्त कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा नांदेड यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही अनुसरुन त्याचा अहवाल आयुक्त कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालयास सादर होईल याची दक्षता घ्यावी. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समुह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल. या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास असल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020 इतर अनुषंगीक कायदानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही आदेशात मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने नमूद केले आहे.
00000



हरवलेल्या मुलीची शोधपत्रिका
नांदेड दि. 17 :- हदगाव तालुक्यातील पळसा येथील प्रियंका नागनाथ दिनकर (वय 17 वर्षे) ही मुलगी बुधवार 18 मार्च पासून ती बेपत्ता आहे. या मुलीचा रंग सावळा असून बांधा सडपातळ, उंची अंदाजे पावणेपाच फूट, अंगावर कपडे जांभळ्या रंगाचा टॉप त्यावर पांढरे ठिपके व गुलाबी रंगाचा स्कार्फ ज्यावर छोट्या-छोट्या मोत्यांची डिझाइन व जिन्स कपडे आहेत. पायात लाल रंगाची सँडल असून शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे. तिला मराठी भाषा बोलता येत तर केस काळे व लांब, चेहरा गोल आहे.
या वर्णनाची प्रियंका नागनाथ दिनकर या मुलीची माहिती मिळाल्यास हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंढे (मो. 8888 1415 78) व पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिटेवार (मो. 9922 0109 33 व 9834 6341 49) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनाठा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक टी. वाय. चिट्टेवार यांनी केले आहे.
00000


आस्थापनांनी मनुष्यबळाची
माहिती ऑनलाईन सादर करावी
नांदेड दि. 17 :- सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसुचित करणे) कायदा 1959 नियम 1960 अन्वये मार्च 2020 अखेर संपणाऱ्या मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती नमुना ईआर-1 मध्ये विहीत मुदतीत जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांन ऑनलाईन गुरुवार 30 एप्रिल पर्यंत सादर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.   
सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणे ) कायदा 1959 नियम, 1960 च्या कलम 5(1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच कलम 5 (2) अन्वये खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरु, स्त्री एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस विषयांकीत कायद्यातील तरतुदीनुसार विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावरु ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.
            मार्च-2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कैलासनगर वर्कशॉप रोड नांदेड या कार्यालयाद्वारे चालू असून या सर्व आस्थापनांकडून पूर्ण  प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
सर्व आस्थापनांना यापूर्वीच युझर नेम पासवर्ड या कार्यालयाकडून देण्यात आल आहेत.  त्याचा वापर रु प्रत्येकाने या विभागाच्या www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर लॉगीन करावे आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.
सदर तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम गुरुवार 30 एप्रिल 2020 ही आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे कायद्याचे अनुपालन करून सहकार्य करावे. तव्दतच प्रत्येक आस्थापनांनी आपापला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तत्काळ अद्यावत करावी.
यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास, ई-मेल आयडी  nandedrojgar@gmsil.com यावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधल्यास, आपणास या कार्यालयाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
000000


नांदेड जिल्ह्यात ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांचे आदेश
नांदेड दि. 17 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा  भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात ॲन्टी कोरोना कवच / फोर्सची स्थापना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  आदेशाद्वारे नुकतीच केली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून, परराज्यातून व जिल्ह्याच्या बाहेरुन प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी स्वत:हून त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्यांनी प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घेतली नाही, अशा व्यक्तींची माहिती त्याठिकाणच्या लोकांनी त्यांना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधित तहलिसदार यांना कळविण्यात आले होते.  
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच मनपा आयुक्त यांच्या समवेत जिल्ह्यात काही भागात पाहणी करीत असतांना काही लोक गावात, नागरी क्षेत्रात पायवाट व इतर मार्गाने जिल्ह्याच्या बाहेरुन प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी न होता असे लोक गावात, नागरी भागातील इतर लोकांमध्ये मिसळल्यामुळे त्यांच्यापासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाययोजनेबाबतचे प्रयत्न निष्फळ होवून अशा लोकांपैकी कदाचित एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्यास त्यांच्यापासून समाजातील इतर लोकांना प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी   ॲन्टी कोरोना कवच / फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्याची रचना व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.
ग्राम पातळीवरील समितीची रचना : संबंधित गावचे तलाठी- अध्यक्ष, संबंधीत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वयंसेवक (एनजीओ, एनएसएस, एनसीसी आदी)- सदस्य तर पोलीस पाटील हे सदस्य सचिव आहेत.  
नागरी (नगरपालिका, नगरपंचायत) क्षेत्रातील रचना : संबंधित वार्डाचे वसूली लिपीकअध्यक्ष, संबंधित मुख्याधिकारी यांनी एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक इ. यांचा व त्यांना आवश्यक व्यक्तींचा त्यांच्या स्वेच्छेने  समावेश करावा- सदस्य तर संबंधीत वार्डाचे स्वच्छता निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत.
नागरी (महानगरपालिका) क्षेत्रातील रचना : संबंधित वार्डाचे वसुली लिपीकअध्यक्ष, संबंधित संबंधित उपायुक्त यांनी एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक इ. यांचा व त्यांना आवश्यक असलेल्या व्यक्तींचा त्यांच्या स्वेच्छेने समावेश करावा- सदस्य, तर संबंधीत वार्डाचे स्वच्छता निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत.
समित्यांची कार्यपद्धती
ग्रामीण भागात परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याबाहेरुन प्रवास करुन आलेल्या व्यक्तींबाबत करावयाची कार्यवाही : गावातील स्वयंसेवक एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक किंवा गावातील स्वयंसेवी संस्था यांच्या सह्याने अध्यक्षांनी गावाच्या प्रवेश व निकास द्वाराच्या ठिकाणी तपासणी पथकाची नेमणुक तीन शिफ्टमध्ये 24 तास करावी. अशा पथकासाठी आवश्यक भासल्यास सावलीसाठी टेन्टची व्यवस्था करावी. संबंधीत पथकातील स्वयंसेवकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक इ. नियुक्ती आदेशाच्या प्रतीसह संबंधीत तहसिल कार्यालयास सादर करावे. अशा व्यक्तींची वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाज मंदिर, शाळा इत्यादी वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. या व्यक्तींची तात्काळ संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन घेण्यात यावी. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार, या व्यक्तीस प्रादुर्भावाची लक्षण दिसून आली नसल्यास त्यास गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्यास त्यास नजीकच्या कॅम्पमध्ये किंवा गावातील समाज मंदिर, शाळा याठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी. तपासणीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे किंवा संशयास्पद स्थिती आढळून आल्यास त्यांना तात्काळ शासकीय विलगीकरण केंद्रात दाखल करावे.
बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी व नागरी भागासाठी वैद्यकीय अधीक्षक यांनी विहित प्रपत्रात संकलित करावी. संकलीत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी मनपा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी.
नागरी क्षेत्रासाठी संबंधित महापालिका आयुक्त तसेच सर्व नगरपालिक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही अनुसरुन त्याचा अहवाल या जिल्हाधिकारी कार्यालयास सादर होईल याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात याबाबत संबंधित तहसिलदार यांनी पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडावी.
औद्योगिक रहिवासी क्षेत्रात असे व्यक्ती प्रवास करुन आल्यास त्यांची तात्काळ माहिती संबंधित तहसिलदार यांना देण्याची जबाबदारी संबंधित औद्योगिक क्षेत्राच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची व सहय्यक कामगार आयुक्त यांची राहील.
सर्व तहसिलदार यांनी ग्रामपातळीवरील समित्यामधील सदस्यांचे नावे, भ्रमणध्वनी क्रमांक संबंधित गावात प्रसिद्ध करावीत तसेच नागरी क्षेत्रात महापालिका आयुक्त व सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी समित्या गठीत करुन त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक संबंधित क्षेत्रात प्रसिद्ध करावेत.
या आदेशास तात्काळ अंमल देण्यात यावा. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल. या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड-19 उपायोजना नियम 2020 मधील तरदुत व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व भारतीय दंड सहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल.
तसेच या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड 19 उपायोजना नियम 2020 मधील तरतुद व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...