Wednesday, November 20, 2019


जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात
दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन
        
नांदेड, दि. 20 :- येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दरवर्षी प्रमाणे यावर्षी दिवाळी अंक प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा नियोजन अधिकारी संजय कोलगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अप्पर कोषागार अधिकारी महेश राजे, वरीष्ठ लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, साहित्यीक डॉ. जगदिश कदम, शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष रावसाहेब शेंदारकर, बी. जी. देशमुख जिल्हा ग्रंथालय अधिकारी आषिश ढोक, राजेंद्र हंबीरे, प्रताप सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रदर्शनामध्ये 180 दिवाळी अंक वाचकांसाठी वाचनांसाठी उपलब्ध करुण देण्यात आली आहेत. या दिवाळी अंक प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आषिश ढोक यांनी केले आहे.
00000


26 नोव्हेंबर रोजी संविधान
दिन साजरा करण्याचे निर्देश  
नांदेड, दि. 20 :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्राद्वारे दिले आहेत.
या दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात यावे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन मोठ्या आवाजात करावे. तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभातफेऱ्यांचे आयोजन करावे. तसेच संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावेत. निबंध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
0000


पेठवडज जिल्हा परिषदेच्या  
पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नांदेड दि. 20 :- राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांचा पोटनिवडणूक डिसेंबर 2019 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार महाराष्‍ट्र जिल्‍हा परिषद (मतदार विभाग व निवडणूक घेणे) नियम 1962 चे कलम 11 अन्‍वये, पोट-नियम (1-अ) याद्वारे अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी कंधार तालुक्यातील 50-पेठवडज जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची अनुसूची प्रसिद्ध केली आहे.
पेठवडज जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्‍याचा कालावधी शुक्रवार 22 नोव्हेंबर ते बुधवार 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत राहील. (रविवार 24 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत). तहसिलदार कंधार यांच्या कक्षात नामनिर्देशन पत्रांची छाननी गुरुवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून होईल. आवश्‍यकता असल्‍यास मतदान घेण्‍यात   गुरुवार  12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30  ते सायं 5.30 पर्यंत घेण्यात येईल. मतमोजणी मिटींग हॉल, तहसिल कार्यालय, कंधार शुक्रवार  13 डिसेंबर 2019 सकाळी 10 वाजेपासून होईल.
निवडणुकीच्‍या तारखांची सुचना व निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्ध करण्याची तारीख शुक्रवार 22 नोव्हेंबर 2019 ही राहील. संकेतस्‍थळावर भरण्‍यात आलेले नामनिर्देशनपत्र निर्वाचन अधिकाऱ्यांनी स्विकारण्‍याचा कालावधी शुक्रवार 22 ते बुधवार 27 नोव्हेंबर 2019 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत राहील. रविवार 24 नोव्हेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्‍याने नामनिर्देशनपत्र स्विकारण्‍यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व त्‍यावर निर्णय देणे गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजेपासुन. वैध उमेदवारांची यादी गुरुवार 28 नोव्हेंबर 2019 रोजी छाननीनंतर लगेच प्रसिध्‍द करण्यात येईल.  नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्‍याबाबत किंवा ते नामंजुर करण्‍याबाबतचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्‍या निर्णयाविरुद्ध जिल्‍हा न्‍यायाधिशांकडे अपिल करण्‍याची शेवटची तारीख सोमवार 2 डिसेंबर 2019 रोजी जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्‍याची संभाव्‍य शेवटची तारीख गुरुवार 5 डिसेंबर 2019 रोजी. जिल्‍हा न्‍यायाधिशांनी अपिल निकालात काढल्‍यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करणे गुरुवार 5 डिसेंबर 2019 रोजी, उमेदवारी मागे घेणे जेथे अपील नाही तेथे बुधवार 4 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. जेथे अपील आहे तेथे शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणुका लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्‍द करणे व निशाणी वाटप जेथे अपील नाही तेथे बुधवार 4 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर. जेथे अपिल आहे जेथे शनिवार 7 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 3.30 वाजेनंतर. मतदानाची तारीख गुरुवार  12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30  ते 5.30 पर्यंत राहील. मतमोजणीची तारीख शुक्रवार  13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजेपासुन. निवडूण आलेल्‍या सदस्‍यांची नावे मंगळवार 17 डिसेंबर 2019 पर्यंत प्रसिध्‍द करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
00000






मुखेड न्यायालय संकुलाच्या
नूतन इमारतीचे रविवारी भूमीपुजन 
नांदेड दि. 20 :- मुखेड येथील न्यायालय संकुलाच्या नूतन ईमारतीचा भूमीपूजन सोहळा रविवार 24 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती मा. किशोर क. सोनवणे यांच्या हस्ते मुखेड न्यायालय संकुल येथे सकाळी 11 वा. संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन अतुल सलगार, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-1 जोड न्यायालय, मुखेड व  मुखेड अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ड. धनंजय येवतीकर यांनी केले आहे.  
00000


हदगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या
नूतन इमारतीचे शनिवारी भूमीपुजन 
नांदेड दि. 20 :- हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन ईमारतीचा भूमीपूजन सोहळा शनिवार 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती मा. किशोर क. सोनवणे यांच्या हस्ते दुपारी 3 वा. दिवाणी व फौजदारी न्यायालय हदगाव येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन हदगाव दिवाणी न्यायाधीश क स्तर सुनिता पैठणकर तसेच हदगाव अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ड. नागोराव वाकोडे यांनी केले आहे.  
00000


प्रोफाईल भरण्याबाबत
5 डिसेंबरची मुदतवाढ
नांदेड दि. 20 :- मान्यता प्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेळोवेळी अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्यासाठी प्रोफाईल भरण्याबाबत पुन:श्च 30 ऑक्टोंबर 2019 ते 11 नोव्हेंबर 2019 या कालावधीत मुदतवाढ देण्यात आलेली होती.
काही माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाईल भरण्याबाबतची प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. प्रोफाईल भरण्याची लिंक सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे अशा शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोफाईल भरण्यासाठी पुन:श्च अंतिम 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या वाढीव कालावधीत प्रोफाईल भरण्याबाबतचे कामकाज न चुकता पूर्ण करुन घ्यावे व त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी केले आहे.
00000


जात वैधता प्रमाणपत्राची फेर तपासणी
नांदेड दि. 20 :- मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र. 2723/2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या तत्कालीन जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी दिनांक  30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड येथे जातीच्या दाव्यापृष्टयर्थ आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड यांनी केले आहे.
00000


मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
अभ्यासाबरोबर खेळाला महत्व दिले पाहिजे  
-          जिल्हाधिकारी अरुण डोंगरे  
नांदेड दि. 20 :- मुलांचा बौद्धीक विकासाबरोबर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालमहोत्सवाचे आयोजन आवश्यक असून त्यासाठी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने निराधार, निराश्रीत बालकाश्रमातील मुलांसाठी 14 नोव्हेंबर बालदिनाचे औचित्य साधुन तीन दिवसीय (17 ते 19 नोव्हेंबर) चाचा नेहरु बालमहोत्सवाचे आयोजन वाडी पाटी येथील बालकाश्रमात करण्यात आले होते.या बालमहोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे पुढे म्हणाले की, या बालमहोत्सवाच्या निमित्त तीन दिवस विविध मैदानी व सांस्कृतीक स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळून शारीरीक व मानसिकदृष्टया सक्षम होतील. या महोत्सवाच्या आयोजनामुळे महिला व बाल विकास कार्यालयाने निराधार, निराश्रितांच्या चेहऱ्यावर हसु फुलवण्याचे कार्य केले आहे. जिल्हा प्रशासन बालकांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची  पुर्तता करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम म्हणाल्या बालके ही उद्याचे राष्ट्राचे भविष्य आहेत आणि त्यांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी तसेच त्यांच्या दिनचर्येत बदल व्हावा, त्यांना आनंद मिळण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांची माहिती इतरांना व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती डॉ. निरंजन कौर सरदार अध्यक्ष बाल कल्याण समिती ॲड. सावित्री जोशी, डॉ. सीमा लटुरिया, डॉ. सुरेखा कलंत्री यांची उपस्थिती होती. कै. सोपानराव तादलापुरकर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर्वधर्म समभाव वेशभुषा धारण करुन उपस्थितांचे लक्ष वेधले. या महोत्सवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी व डेरला येथील मुलांनी सहभाग नोंदवला.
            हा बालमहोत्सव तीन दिवस आयोजित करण्यात आला होता त्यात दोन दिवस विविध मैदानी खेळासह विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर 19 नोव्हेंबर रोजी सांस्कृतीक कार्यक्रम पार पडला त्यात एकल गायन समुह गायन एकल नृत्य व समुह नृत्य स्पर्धो पार पडल्या यात 9 स्वंयसेवी संस्था परिसरातील शाळेचे जवळपास पाचशे बालके सहभागी झाले होते.
बालमहोत्सवाचे समारोपात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) मिलींद वाघमारे, बाल कल्याण समितीचे सदस्य ॲड. गणेश जोशी, श्री पवळे मुख्याध्यापक जि.प.प्रा. डेरला हे उपस्थित होते त्यांचे हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यातील विजेत्यांना विभागीय स्तरावरील बाल महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश जोंधळे यांनी केले तर बालमहोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीमती काळम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी श्री. घुमे  श्री. खानापुरकर, श्री. दवणे, श्रीमती सोनकांबळे, श्री दरपलवार, श्री बडवणे तसेच बाल संरक्षण कक्षाच्या श्रीमती राठोड व त्यांचा कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. श्री लालबाजी घाटे यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सर्व सुविधेसह जागा उपलब्ध करुन दिली आणि आभार श्री  सावळे यांनी मानले.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...