हदगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या
नूतन इमारतीचे शनिवारी भूमीपुजन
नांदेड दि. 20 :- हदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन ईमारतीचा
भूमीपूजन सोहळा शनिवार 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद
तथा नांदेड जिल्ह्याचे पालक न्यायमुर्ती मा. किशोर क. सोनवणे यांच्या हस्ते दुपारी
3 वा. दिवाणी व फौजदारी न्यायालय हदगाव येथे संपन्न होणार आहे.
यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन
हदगाव दिवाणी न्यायाधीश क स्तर सुनिता पैठणकर तसेच हदगाव अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ड.
नागोराव वाकोडे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment