Sunday, October 16, 2016

आमचा गाव, आमचा विकास योजनेतून
खैरगावला मिळाला शुद्ध पेयजल प्रकल्प
चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आमचा गाव, आमचा विकास कार्यक्रमांतंर्गत गावात यंदा उद्भवलेला पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावून गावातील लोकांना शुध्द पाणी उपलब्ध करुन दिल्याच सरपंच सौ. कल्पना दत्ता नादरे सांगत होत्या.
नांदेड जिल्हयाच्या अर्धापूर तालुक्यातील खैरगावमध्ये आत्तापर्यंत कधीच पाणी प्रश्न उद्भवला नव्हता. पण यंदाच्या उन्हाळयात मात्र पाणीपातळीने तळ गाठला. गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. यावेळी माहिती मिळाली ती चौदाव्या वित्त आयोगाबाबतच्या निधीची, या आयोगातून राज्य शासनाला 1 हजार 500 कोटी रुपये सन 2015-20 या कालावधीतच उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 5 वर्षासाठी गावाची लोकसंख्या, क्षेत्रफळानुसार निवड करण्यात येणार आहे. देण्यात येणारा निधी टप्याटप्याने शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी, रस्ते, अदी बाबींवर खर्च करण्यात येणार आहे आणि यंदा त्याच आयोगाचा  उपयोग  गावातील  पाणी टंचाईसाठी कामी आला असे सरपंच सौ. नादरे म्हणाल्या.
गावात दोन ठिकाणी बोअरवेल घेण्यात आल्या. त्यातील एक बोअरवेलला भरपूर पाणी लागले मग संकल्पना सूचली की, आपण पाणी शुध्द स्वरूपात उपलब्ध करून दिलं तर आणि आरओ प्लॅान्ट (शुध्द पेयजल) बद्दल माहिती मिळवली साधारण या प्रकल्पासाठी अडीच लाखापर्यंत खर्च येणार होता आणि तो 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून करायचा ठरवलं. संबंधित कंपनीला थेट संपर्क साधला आणि जागेची पाहणी करून लगेच सर्व यंत्रणा बसवून देण्याच्या हालचाली चालू केल्या आणि अवघ्या 15 दिवसांत सर्व यंत्रणा तयार झाली. पाणी टंचाई दरम्यान गावातील लोक खाजगी RO Plant मधून ज्यादा दाराने पिण्याचे पाणी खरेदी करत होते तेच शुध्द पाणी आता गावकऱ्यांना अत्यंत माफक दरात म्हणजेच 5 रुपयात 20 लिटर पाणी एटीएम मशिनच्या माध्यमातून देण्यात येत आहे, असेही सरपंच सौ. नादरे यांनी सांगितले.
या शुध्द पेयजल प्रकल्पामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व कळाल आणि दुसर म्हणजे पाण्यातून होणाऱ्या रोगांमुळे आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला. याबद्दल गावातील ललिताबाई मुंगल या महिलेची प्रतिक्रिया बोलकी होती त्या म्हणाल्या की , आम्हाला पुर्वी पिण्याचे शुध्द पाणी घेण्यासाठी जास्तीचे पैसे लागत होते. पण आता गावातच शुध्द पाणी मिळत असल्यामुळे चांगले झाले आहे. आनंदा लोखंडे म्हणाले की , खरं तर आमच्यासाठी हे सगळ स्वप्नासारखं आहे कारण एवढया स्वस्तात पाणी तेही आमच्याच गावात आम्हाला मिळत असल्यामुळे बाहेरच्या RO Plant शुध्द पेयजलवाल्यांची मनधरणी करावी लागत नाही. हे सर्व पाणी आम्हाला पाहिजे तेव्हा मिळत आहे.
सध्या या शुध्द पेयजल केंद्राची क्षमता 1 हजार लिटर असून पुढील काळात ही क्षमता वाढविण्यात येवून उन्हाळयात थंड पाणी सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचा मानस सरपंच सौ. नादरे यांनी बोलून दाखवला. या सर्व वाटचालीत त्यांना सर्व ग्रामपंचायत सदस्यांबरोबरच गावातील नागरिकांनी पण मोलाचे मार्गदर्शन सहकार्य केले.
-         राष्ट्रपाल साहेबराव सरोदे
     मो.  9860233964
 (लेखक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड येथे आंतरवासिता करीत आहेत)
0000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...