Friday, May 31, 2024

वृत्त क्र. 455

 

नांदेड जिल्ह्यात पशुधनाचे शंभर टक्के ईअर टॅगिंगची मोहिम

·         पशुसंवर्धन विभागाला पशूपालकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन

 

नांदेड दि. 31 :- नांदेड जिल्ह्यातील पशुधनाचे १०० टक्के इअर टॅगिंग करण्यासाठीची प्रक्रिया एक जून पासून जिल्ह्यात सुरू होत आहे. ही प्रक्रिया सर्वांसाठी आवश्यक व अनिवार्य आहे.या प्रक्रियेला प्रतिसाद देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

जनावरांची खरेदी-विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे तसेच राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील पशुधनास 100 टक्के ईअर टॅगिंग करुन त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंद अदययावत करण्याची कार्यवाही करण्याचे नियोजन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

जनावरांच्या बाजारात ईअर टॅगिंग नसलेले पशुधन असल्यास त्यांची तिथेच ईअर टॅगिंग करण्याच्या दृष्टीने पशुधन विकास अधिकारी ,पशुधन पर्यवेक्षक यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

 

नांदेड जिल्हयांमधील कार्यरत एकूण ७ फिरते पशुचिकित्सापथक यांची प्रत्येक जनावराच्या बाजारांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे बाजारातील पशुधनास आवश्यक पशुवैदयकीय सेवा तसेच विषयांकित बाबींच्या अनुषंगाने शेतकरी पशुपालक, जनावरांचे व्यापारी यांचे प्रबोधन होईल.

 

 ईअर टॅगिंगमुळे विशिष्ठ भागातून जनावरांची खरेदी-विक्री, चाऱ्याची टंचाई, दुधाचे भाव पडणे, दुष्काळ याअनुषंगाने पुरावाजन्य निर्णय घेणे प्रशासनाला शक्य होणार आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या जनावरांची खरेदी-विक्री टॅगिंग करुन झाल्यास त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करता येईल व बाहेरच्या राज्यातून आजारी जनावरे राज्यात दाखल झाल्याने होणारे साथरोग प्रादूर्भाव यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

 

पशुधनाच्या बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी पशुधनाची माहिती विक्री करण्यात आलेल्या संबंधीत जिल्हयाच्या पशुसंवर्धन विभागास सादर करणे तसेच खरेदी-विक्री करण्यात आलेल्या पशुधनाची ईअर टॅगिंग करुन नोंदी अदयावत करणे बाबत निर्देशित केले आहे. बाजारामध्ये पशुधनाची ने-आण करताना कोणत्याही प्रकारची क्रुरता होणार नाही याची देखील दक्षता बाळगणे आवश्यक आहे. प्राण्यांमधील क्रुरतेस प्रतिबंध अधिनियम 1962 (जनावरांच्या बाजारांची नियमावली-2017) तसेच शासन निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व पशुधनाचे आठवडी बाजार , कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी याची तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.

 

नांदेड जिल्ह्यात सुमारे 12 पेक्षा अधिक जनावरांचे बाजार भरतात. ज्यातील पाच बाजार सर्वात मोठे असून त्यामध्ये 100 पेक्षा अधिक पशुधनाची खरेदी विक्री करण्यात येते. ईतर पशुधनाच्या बाजारांमध्ये कमी, मध्यम संख्येच्या पशुधनाची खरेदी विक्री केली जाते. नांदेड जिल्ह्यातील सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांना जनावरांच्या बाजारामध्ये सर्व बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत जबाबदारी देण्यात आलेली आहे.

00000

वृत्त क्र. 454

 जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त

जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

·         जनजागृती रॅलीस हिरवी झेंडा दाखवून प्रारंभ

 

नांदेड दि. 31 :-  ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामांची लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनिष दागडीया यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. रॅली दरम्यान तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबतचे पोस्टर्सचित्रफीती यांच्या माध्यमातून तंबाखू विरोधी जनजागृती करण्यात आली. तसेच तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली.

 

या रॅलीसाठी जिल्हा रुग्णालयातील अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिनेनिवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टेनोडल अधिकारी   डॉ. हनुमंत पाटीलनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच.के. साखरेडेंटल सर्जन डॉ. साईप्रसाद शिंदेडेंटल सर्जन डॉ. अर्चना तिवारीजिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. उमेश मुंडे व तसेच इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष डॉ. मनिष दागदिया व इतर पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्थेचे पदाधिकारीश्री गुरुगोविंद सिंघाजी स्मारक शासकीय नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक व सर्व विध्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेरसामाजिक कार्यकर्ता बालाजी गायकवाडसमुपदेशक सदाशिव सुवर्णकारसमुपदेशक नागेश अटकोरे व सुनील तोटेवाडसुनील खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

0000

 

वृत्त क्र. 453

 जिल्हा रुग्णालयात मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा


नांदेड दि. 29 :- जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय व सर्व आरोग्य संस्थेमध्ये 28 मे रोजी मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. जिल्हा रुग्णालयात यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाड यांची उपस्थिती होती. मासिक पाळी दिवस का साजरा केला जातो, मासिक पाळीविषयी समाजात असलेले समज -गैरसमजा बद्दल यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.

 

मासिक पाळी म्हणजे काय व सॅनेटरी पॅडचा उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मासिक पाळीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आहार कसा घ्यावा, योगा हा आरोग्यासाठी किती महत्वाचा आहे याविषयावरही नर्सिग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण, नातेवाईक यांना माहिती सांगितली.

00000

वृत्त क्र. 452

 दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त


नांदेड दि.28 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 वीची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, मरावती,  नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  


इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970,9011184242,8421150528, 8263876896, 8369021944, 8828426722, 9881418236, 9359978315, 7387647902, 9011302997 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

वृत्त क्र. 451

 शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी

 
·    जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली आढावा बैठक

 
नांदेड दि. 28 :- 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल  2024 रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जून 2024  रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार असून यासाठी अद्ययावत तयारी प्रशासनाने सुरू केली असून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यवस्थे संदर्भात बैठक घेण्यात आली.

16 नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा अनुसार स्ट्राँग रूम मध्ये सध्या मतपेट्या कुलुपबंद आहेत. ज्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये मतपेट्या बंद आहेत.त्याच ठिकाणी मतमोजणीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मतमोजणीची व्यवस्था करताना निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी ,तसेच जनतेला माहिती देणारी माध्यमे यांच्या महत्त्वाच्या भूमिका व जबाबदाऱ्या असतात. त्यांच्या संदर्भातील व्यवस्थेचा आज आढावा घेण्यात आला.
     
सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवस पासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्राँग रूम मध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच 24 तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.




चार जूनला सकाळी सात वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष केली जाते. माध्यमांना याबाबत माहिती दिल्या जाते. माध्यमामार्फत वृत्तपत्र व वाहिन्यांद्वारे या संदर्भातील वृत्त संकलन केले जाते.




     
आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली.आज झालेल्या या बैठकीला व पाहणी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी  पी.एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विजय माने यांच्यासह विविध विभाग प्रमुख व सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.






महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...