Monday, September 1, 2025

 शिवनेरी किल्ला - महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतिचिन्ह




गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून यानिमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्राबाहेर मराठीबहुल असणाऱ्या प्रदेशात पाच ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमाकरिता सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.


 

 वृत्त क्रमांक 927

पूरपरिस्थितीमुळे अडकलेल्या ६६ नागरिकांना सुखरूपपणे काढले  बाहेर 

होमगार्ड जवानांनी लावली जीवाची बाजी

नांदेड दि. १ सप्टेंबर:- पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. मदतीसाठी सर्व यंत्रणा धावपळ करीत असताना नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी ६९ नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी तातडीने बचाव व मदत कार्य हाती घेतले. जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून होमगार्डची एक टिम धर्माबाद येथे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे रवाना करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक कार्यालय यांना दिले.त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक,नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी व ९ जवान यांची टिम तत्परेने २९ रोजी धर्माबाद येथे रवाना झाली. 

या मध्ये प्र. केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्यद इम्रान अली, शेख फेरोज शेख इमाम, माधव कोमटवार, बालाजी गवंडेल, मादास हिवरे, शिवाजी कोकरे, प्रभाकर कोमटवार, पृथ्वीराज कंधारे व हनुमान घोडके यांचा समावेश होता.

उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे तसेच तहसिलदार सुरेखा स्वामी यांच्या मार्गदर्शना खाली होमगार्ड टिम हुनगुंदा, संगम मनूर येथे पाठविण्यात आली. महसूल प्रशासनाकडे ओबीएम मशिनची फायबर बोट होती. सैन्य दलाची टिम देखील तेथे कार्यरत होती.पण बोट चालविणारे प्रशिक्षित कुशल तंत्रज्ञ नव्हते. राज्य आपती व्यवस्थान आणि होमगार्ड आपती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले होमगार्ड जवान लगेच सरसावले. परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेऊन मोठी रिस्क घेत त्यांनी बोट सुरु करून हुनगंदा येथे पुरात अडकलेल्या  ६३ नागरिकांना बाहेर काढून बोटीद्वारे सुरक्षित ठिकाणी हलविले.

संगम मनूर येथे महादेव मंदिराला पुराने वेढा घातला होता. त्यात मंदिरात महंत यांच्यासह सहा नागरिक आडकून पडले होतो. त्यांना देखील दिलासा देत पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

तहान भूक विसरून होमगार्ड जवान यांनी आपल्या जीवाची बाजी लावत आपले कर्त्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले. 

००००











▶️ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया


‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’ महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ आहे. प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुण-तरुणींना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे महामंडळ कार्यरत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजना, कर्ज व अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, याबाबत जाणून घ्या…
▶️
व्यवसायातून उन्नतीसाठी ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ’



▶️ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी अर्थसंकल्पात ७५० कोटी रुपयांची तरतूद



अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती


अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना




▶️ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना


 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...