पोलीस पाटील भरती प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये
Thursday, January 18, 2024
वृत्त क्र. 57
वृत्त क्र. 56
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत
विविध उपक्रमाद्वारे मार्गदर्शन
नांदेड, (जिमाका) दि. 18 :- परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान हे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदेड शहर व जिल्ह्यातील काही पेट्रोलपंप तसेच प्रमुख चौकात रस्ता सुरक्षा संदर्भात बॅनर्स, माहितीपत्रके व भित्तीपत्रके नुकतेच लावण्यात आली. तसेच नांदेड, नायगाव, मालेगाव येथील प्रमुख चौकांमध्ये वाहनचालक, नागरिकांना जवळपास 1 हजार 400 माहिती पुस्तिका व रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोटार वाहन निरीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, गणेश तपकीरे, सहायक मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, निलेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात यावेळी मार्गदर्शनही करण्यात आले.
0000
वृत्त क्र. 55
रस्ता सुरक्षा अभियानातर्गत
हेल्मेट जनजागृती रॅली संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान 2024 राबविण्यात येत आहे. त्याअनुंषगाने आज प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नागरिकांमध्ये हेल्मेट वापराच्या प्रसारासाठी हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीचे उद्घाटन सकाळी 8.30 वा जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांच्या हस्ते संपन्न झाले.
या रॅलीत परिवहन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक वाहन वितरक व सामान्य नागरिक इत्यादी सुमारे 200 ते 220 अधिकारी / कर्मचारी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. ही हेल्मेट रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून शहरातील प्रमुख रस्ते व एसपी ऑफीस चौक, कलामंदीर, आयटीआय चौक, श्रीनगर, राज कॉर्नर मार्गे साठे चौक, जुना मोंढा कौठा, लातूर फाटा, सिडको मार्गे एकूण 21 किमीचे अंतर पार करत प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. या रॅलीमध्ये 35 महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास या कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत हे उपस्थित होते. शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे व सुभाषचंद्र मारकड हे सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, मंजूषा भोसले, गणेश तपकीरे व निलेश ठाकूर, संघपाल कदम सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या हेल्मेट रॅलीद्वारे ‘हेल्मेटयुक्त व अपघातमुक्त नांदेड' असा संदेश नागरिकांना देण्यात आला.
0000
वृत्त क्र. 54
रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत ऊस वाहतूक
करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टव टेप लावण्यात आले
§ रस्ता सुरक्षेविषयी माहूर येथे मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न
नांदेड (जिमाका) दि. 18 :- प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान 2024 दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने 17 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील कृषी मालाची व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर /ट्रेलर तसेच कचरा वाहतुक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टव टेप लावण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कुंटूरकर शुगर्स लि. येथील 70 ट्रॅक्टर व ट्रेलर तसेच शहर व परिसरातील 30 कचरा वाहतुक करणारी वाहने व इतर 40 मालवाहू व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव टेप लावण्यात आले. या कार्यक्रमास मोटार वाहन निरीक्षक गणेश तपकीरे, मंजुषा भोसले, सहायक मोटार वाहन निरीक्षक चेतन अडकटलवार, नंदकुमार सावंत व आशिष जाधव यांनी परिश्रम घेतले.
तसेच रस्ता सुरक्षा अभियान-2024 अंतर्गत श्रीक्षेत्र माहूर येथील श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक व शिक्षक आणि उपस्थित नागरिकांना वॉक ऑन राईट, अपघात होवू नये यासाठी व अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गुड सेमिरीटन व हेल्मेटयुक्त, अपघातमुक्त गाव संकल्पनांची उपस्थितांना ओळख देण्यात आली. विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबतची माहितीपुस्तिका व साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी असे एकूण 280 ते 300 नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, सहायक मोटार निरीक्षक सचिन मगरे, निलेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले. तसेच उपस्थित नागरिकांना /वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
00000
वृत्त क्र. 53
मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144
नांदेड (जिमाका) दि. 18 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 फेब्रुवारी 2024 चे मध्यरात्री पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पूर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूर कडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासूनते 19 फेब्रुवारी 2024 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे.
हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.
00000
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...