Thursday, March 2, 2017

जिल्ह्यात सर्व न्यायालयात
8 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत
नांदेड , दि. 2 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली तसेच राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्याकडून शनिवार 8 एप्रिल 2017 रोजी जिल्हा न्यायालय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत आपली जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढू आपला पैसा, वेळ वाचवावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्रन्यायाधीश  सविता बारणे यांनी केले आहे.
            मागील राष्ट्रीय लोकअदालतमध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील बऱ्या मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. आर. नरवाडे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड या कार्यालयाकडे फक्त एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही शुल्क आकारण्यात येणार नाही. या लोकन्यायालयाच्या रुपाने आपसातील वाद मिटविण्याची संधी चालून आली आहे. याचा लाभ संबंधीतांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्या. एस. आर. नरवाडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चेकबाऊंसची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंकरिकव्हरी, दिवाणी प्रकरणे : भूसंपादन, महसूल प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, ..पा. , .पा. प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, फायनान्स कंपन्यांची प्रलंबित दाखल पूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, ..पा. अधिकारी, र्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्यांचे अधिकारी, बॅंक अधिकारी संबंधित सर्व पक्षकार आदी या लोकअदालतीस उपस्थित राहणार आहेत.

0000000
ई-पीओएस मशिनद्वारे धान्‍य वाटपाचे
आज नांदेड तहसीलमध्ये प्रशिक्षण      
            नांदेड दि. 2 :- नांदेड तालुक्‍यातील 231 व लोहा तालुक्‍यातील नांदेड गोदामास सलंग्‍न  असलेले 36 रास्‍तभाव दुकानदारांसाठी राज्य शासनामार्फत e-POS मशिन हाताळणीचे प्रशिक्षण शुक्रवार 3 मार्च 2017 रोजी सकाळी 9 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे आयोजीत करण्‍यात आले आहे. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे.
  मुंबई मंत्रालय येथून तांत्रिक अधिकारी हे प्रशिक्षण देणार आहे. संबंधीत रास्तभाव दुकानदारांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...