Saturday, January 21, 2017

टपाल खात्याच्या पीए-एसए पदासाठी
29 जानेवारी रोजी टायपिंग-डाटाएन्ट्रीची पुनर्परीक्षा
नांदेड, दि. 21 :-  भारतीय टपाल खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या पीए-एसए संवर्गातील भरती चाचणीतील सर्व उमेदवारांची ( जे यापुर्वी पी.ए. / एस. ए. टायपिंग व डाटा इंट्री परीक्षेला बसले होते ) टायपिंग व डाटाएन्ट्री परीक्षा पुन्हा रविवार 29 जानेवारी 2017 रोजी घेण्यात येणार असल्याचे नांदेड डाक अधीक्षक एस. एम. अली यांनी कळविले आहे. आहे.
ही रविवार 29 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ही परीक्षा पाच गटात होणार आहे. या परीक्षांसाठीची केंद्र पुढील प्रमाणे केंद्र- ए  भारतीय विद्यापीठ प्रौद्योंगिकी संस्थान- आयआयटी, सेक्टर 7 बेलपाडा, खारघर रेल्वे स्टेशन जवळ नवी मुंबई-400614,  केंद्र – बी - पिल्लाइज सूचना प्रौदयोगिकी संस्थान सेक्टर 16 नवीन पनवेल नवी मुंबई- 410 206. केंद्र – सी - एन. जी. एम. इंजीनियरी एवं प्रौदयोगिकी विद्यालय कामोठे, नवी मुंबई- 410 206 येथे घेण्यात येणार आहे.
इच्छूक उमेदवारांनी  http://www.pasadreexam2017.in या संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाउनलोड करुन घ्यावी. परीक्षेला बसण्यापुर्वी उमेदवारांनी दोन्ही परीक्षेसाठी अभ्यासासाठी पुढील युआरएल 23 ते 25 जानेवारी 2017 पर्यंत या कालावधीत उपलब्ध राहील. युआरएल अशी - cbtdemo.quizky.net
संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य पोस्ट मास्टर जनरल (भरती) मुंबई यांच्यावतीने डाक अधीक्षक नांदेड यांनी केले आहे.

00000000
स्तब्धता पाळण्याचे आवाहन
नांदेड, दि. 21 :- देशाच्‍या स्‍वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्‍या हुतात्‍म्‍यांच्‍या स्‍मरणार्थ आदर व्‍यक्‍त करण्‍यासाठी 30 जानेवारी रोजी दरवर्षी देशभर 2 मिनिटे मौन (स्‍तब्‍धता) पाळून त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात येते. त्‍यानुसार यावर्षीही सोमवार 30 जानेवारी 2017 रोजी सकाळी 11 वा. दोन मिनिटे मौन स्‍तब्‍धता पाळून हा दिवस हुतात्‍मा दिन म्‍हणून पाळण्‍यात येणार आहे.
मौन स्‍तब्‍धताची सुरुवात होण्‍यापुर्वी सकाळी 10.59 पासून 11 वाजेपर्यंत इशारा भोंगा वाजविण्‍यात येईल. इशारा भोंगा संपल्‍यानंतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, आस्‍थापना, शैक्षणिक संस्‍था, विद्यापीठे यामधील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्‍तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्‍तब्‍धता) पाळावे. सकाळी 11.02 मिनिटांनी मौन (सतब्‍धता) संपल्‍यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी 11.03 मिनीटांपर्यत वाजविण्‍यात येईल. जेथे भोंग्‍याची व्‍यवस्‍था नसेल तेथे वरीलप्रमाणे 11 वा. मौन (स्‍तब्‍धता) पाळण्‍याबाबत योग्‍य ते निर्देश संबंधितांना देण्‍यात आले आहेत. हुतात्‍म्‍यांना आदरांजली गंभीरपणे व योग्‍य त्‍या आदराने मौन (स्‍तब्‍धता) पाळून देण्‍यात येईल याची दक्षता घेण्‍यात यावी, असे जिल्‍हा प्रशासनाकडून कळ‍वण्‍यात आले आहे.

00000000
भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदाच्या
पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
नांदेड, दि. 21 :-  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये  अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी मंगळवार 14 फेब्रुवारी 2017 ते गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 40 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे बुधवार 8 फेब्रुवारी 2017 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC Training च्या Google Plus पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्या संकेतस्थळावर www.mahasainik.com वरील Recruitment Tab ला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध Cheek List आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊल लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावे.
केंद्रामध्ये एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एकझामिनेशन (युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एकझामिनेशन (युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी  प्रमाणपत्र किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक यांचा दूरध्वनी नंबर 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000
हरभरा पीक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 21 :- हरभरा पिकावरील घाटे अळीसाठी इमामेक्टीन बेन्जोएट 5 टक्के 0.4 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. कामगंध सापळ्यामध्ये सापडलेला पतंग रोज काढावेत. हा कृषि संदेश वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्याकडून देगलूर, मुखेड, नायगाव, बिलोली, धर्माबाद या तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, असे उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांनी कळविले आहे.

0000000
विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा केंद्र
परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, दि. 21 :- महाराष्ट्र  लोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा-2016  ही  रविवार 29 जानेवारी 2017 रोजी  होणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी  नांदेड  यांनी  कळवले  आहे.  
नांदेड  जिल्ह्यात रविवार 29 जानेवारी 2017 रोजी विविध 42 परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत  एका  सत्रात ही परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज स्वच्छ व  सुसंगत  पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास याद्वारे प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000000
समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना आवाहन
 नांदेड दि. 21 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण फी, परिक्षा फी या योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्यास विभागाच्या https://mahaeschol.maharasthra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेनंतर विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र , जात वैधता प्रमाणपत्र, वय, उत्पन्न व रहिवास दाखला, मागील वर्षाचा उत्तीर्ण दाखला इत्यादी कागदपत्रे, शाळा / महाविद्यालयास सादर करणे बंधनकारक आहे.
पात्र विद्यार्थ्यास मिळणारी शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यावर आणि शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयाच्या बॅक खात्यावर परस्पर जमा केली जाते. अधिकृत बॅक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणेसाठी पुढील बाबींची पुर्तता विद्यार्थी, पालक यांनी त्यांच्या शाळा, महाविद्यालयाकडे करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्याचे आपल्या आधार क्रमांकाची खात्री पटविणेसाठी आधारकार्डची प्रत प्रस्तावासोबत जोडावी. ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे त्या बँकेच्या खाते क्रमांकाची खात्री होणेसाठी पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जोडावी. आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न केले असलेबाबतचा पुरावा म्हणून बँकेकडून आधार संलग्नता केलेबाबतची पावती (आधार सिडींग स्लीप ) सोबत जोडावी.  विद्यार्थी / पालकांनी प्रस्तावासोबत आधार क्रमांक आणि बँकेशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा जोडला आहे, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम तसेच महाविद्यालयाच्या खात्यावर शिक्षण शुल्काची रक्कम प्राधान्याने जमा केली जाईल. लाभार्थी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही त्याच्याच खात्यात जमा व्हावी व त्या खात्याचा गैरवापर इतरांनी करु नये या हेतूने प्रत्येकांना आपला आधार क्रमांक हा बँकेच्या खात्याशी संलग्न करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोणालाही कोणत्याही प्रकारची अनियमितता व बोगसगिरी करण्यास वाव राहणार नाही. तेव्हा सर्व विद्यार्थी, पालक व महाविद्यालयांनी आपापल्या बँकेत जावून आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावेत. त्यासाठी आवश्यक तो अर्ज भरुन बँकेकडे द्यावा आणि त्याची पोच पावतीची प्रत आपल्या स्कॉलरशिप अर्जाबरोबर जोडण्यासाठी सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्यावतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांनी केले आहे.

00000000
धर्माबाद येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न
 नांदेड दि. 21 :- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लालबहादुर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद व तहसील कार्यालय धर्माबाद यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा  घेण्यात आल्या. निवडणूक जनजागृती विषयक मस्ती-दोस्तीद-मतदान हा लघुचित्रपट दाखवण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेत लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाचा धनराज बापुराव कदम हा प्रथम, जिजामाता कन्या शाळेची नेहा दिगांबर कदम ही द्वितीय  तर लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाची अनुज शेषेराव मुंडकर ही तृतीय आली आहे. रांगोळी स्पर्धेत-  लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाची कु. सुस्मिता दिक्षीत द्वितीय तर हुतात्मा पानसरे हायस्कुलची प्रतिक्षा जाधव तृतीय आली आहे. चित्रकला स्पर्धेत- लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाचा  मंगेश दिलीप फुलारी हा प्रथम तर  शुभमकुमार मधुकर जाधव या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळवला.
यावेळी प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, नायब तहसीलदार सुनिल माचेवाड, गटशिक्षणाधिकारी  डॉ. डी. एस. मठपती, उपप्राचार्य जी. एच. मिरकुटे, प्रा. एस. एल. लोनकर, डॉ. शिवाजी जाधव, प्रा. राजेंद्र साळी, प्रा. एम एच. शिवशेट्टे, प्रा. एस. बी. मनुरकर व केंद्रप्रमुख एन. पी. पांचाळ, अरुण  ऐनवाले, रमेश इटलोड, आनंद यडपलवार, उदय शिल्लारे, साहेबराव कदम, प्राध्यापक, युवक-युवती उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. बालाजी श्रीगीरे यांनी केले. आभार मिलींद टोणपे यांनी मानले. या  कार्यक्रमास उपस्थित होते.

0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...