Friday, February 4, 2022

 

नांदेड जिल्ह्यात 177 व्यक्ती कोरोना बाधित

तर 242 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 749 अहवालापैकी 177 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 156 तर अँटिजेन तपासणीद्वारे 21 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 233 एवढी झाली असून यातील 97 हजार 557 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 997 रुग्ण उपचार घेत असून यात 6 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 80 वर्षाच्या एका महिलेचा, खाजगी रुग्णालयात श्रीनगर नांदेड येथील 63 वर्षाच्या एका महिलेचा 3 फेब्रुवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 679 एवढी आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 93, हिमायतनगर 6, लोहा 4, उमरी 2, उत्तर प्रदेश 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 13, हदगाव 2, मुदखेड 1, परभणी 4,पंजाब 1, दिल्ली 1, अर्धापूर 1, कंधार 1, मुखेड 2, वाशीम 2, मुंबई 1, औरंगाबाद 1, देगलूर 3, किनवट 8, नायगाव 1, हिंगोली 4, जालना 1, अकोला 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा  12, नायगाव 1, देगलूर 1, किनवट 5, मुखेड 2, नायगाव 1 असे एकुण 177 कोरोना बाधित आढळले आहे.

 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 197, देगलूर कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 35 असे एकुण 242 कोरोना बाधितांना औषध उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

 

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, देगलूर कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 161, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 769, खाजगी रुग्णालय 33, असे एकुण 1 हजार 997 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 51 हजार 746

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 33 हजार 330

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 266

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 97 हजार 557

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 679

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.42 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-34

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 997

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-6.

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

000000

 

 रेल्वे अंडर ब्रिज कामासाठी भोकर शहरातील रस्त्याचा पर्यायी मार्ग  

 नांदेड (जिमाका) दि. 4 :- रेल्वे अंडर ब्रिज कामासाठी भोकर शहरातील आंबेडकर चौक ते नवीन प्रफुल्लनगर (मुदखेड रोड) दरम्यानचा रेल्वे गेट नं. 3 मधून जाणारा रस्ता शुक्रवार 4 फेब्रुवारी  ते गुरुवार 24 फेब्रुवारी 2022 या कालावधीसाठी तात्पुरत्या  स्वरुपात सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी प्रतिबंध केला आहे. जाण्या-येण्यासाठी पर्यायी मार्ग रस्त्याचा वापर आंबेडकर चौक (भोकर) नवीन प्रफुलनगर (मुदखेड रोड) दरम्यानच्या रस्त्यावरील ओव्हर ब्रिजचा वापर करावा. 

या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही पात्र राहील, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे.

0000

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 4 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 7 फेब्रुवारी 2022 दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 

यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील. ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या होणाऱ्या लोकशाही दिनात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...