Saturday, November 29, 2025

 वृत्त क्रमांक 1247


मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधीत आदेश

 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- जिल्‍ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायत बिलोली, देगलुर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा निवडणूक मुख्‍यालयी मतमोजणी केंद्र परिसरात बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेशास प्रतिबंधीत करण्‍यात येत आहे.

 

याबाबतचा आदेश भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केला आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यातील नप/नपं-बिलोली, देगलुर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा निवडणूक 2025 च्‍या अनुषंगाने मतमोजणीच्‍या दिवशी बुधवार 3 डिसेंबर2025 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यन्‍त अंमलात राहणार आहे.

0000 

 वृत्त क्रमांक 1246

मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

नांदेड दि. 29 नोव्हेंबर :- जिल्‍ह्यात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थेच्‍या नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवस मंगळवार 2 डिसेंबर 2025  रोजी सर्व मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे प्रतिबंधात्‍मक आदेश जिल्‍हादंडाधिकारी राहूल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत. या नगरपरिषद/ नगरपंचायत निवडणूक मतदानाच्‍या दिवशी 2 डिसेंबर रोजी मतदान सुरु झाल्‍यापासून ते मतदान संपेपर्यन्‍त हा आदेश अंमलात राहणार आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील नगरपरिषद/ नगरपंचायत-बिलोली, देगलुर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, कुंडलवाडी, मुदखेड, मुखेड, उमरी, भोकर, किनवट, लोहा या निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधीत राहण्‍यासाठी ज्‍या ठिकाणी मतदान होणार आहे त्‍या ठिकाणापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरिक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्‍याकरीता मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

00000

  वृत्त क्रमांक दुष्काळी परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना गती प्रत्येक ग्रामपंचायतीत दर १५ दिवसांनी रोजगार मा...