Sunday, November 18, 2018


महावॉकेथॉनद्वारे रस्ता सुरक्षा जनजागृती
नांदेड दि. 18 :- रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधनासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, CASI CSR Diary यांच्या संयुक्त विद्यमाने "रस्ता सुरक्षा महावॉकेथॉन"  आयोजन आज करण्यात आले होते. या महावॉकेथॉनला कॅम्ब्रीज स्कूल शिवाजीनगर नांदेड येथे प्रभारी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त लहुराज माळी, अपर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी हिरवी झेंडी दाखवली.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, कार्यकारी अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, मोटार ड्रायव्हींग स्कूलचे संचालक, प्रतिनिधी, पोलीस विभागाचे कर्मचारी तसेच शहरातील कॅम्ब्रीज स्कुल, पॅनेसिया इंटरनॅशनल स्कुल, ग्यानमाता विद्या विहार आदी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. तसेच नांदेड रोटरी क्लबचे श्री. देशमुख, त्यांचे पदाधिकारी, नागरिकांनी सहभाग घेतला.  सदर महावॉकेथॉनला सुमारे 450 विद्यार्थी सहभागी झाले होते.
महावॉकेथॉन ही शहरातील कॅम्ब्रीज स्कूल शिवाजीनगर नांदेड येथून यशवंत अर्बन सोसायटी-आयटीआय पेट्रोलपंप-कुसुम सभागृह-यशवंत कॉलेज रोड-सार्वजनिक बांधकाम विभाग ते आयटीआय येथे संपन्न झाली. या महावॉकेथॉनमध्ये सहभागी व्यक्तीनी 2 किमी अंतर चालले आहेत. या मार्गावर पोलीस विभागाच्या वाहतुक शाखेने वाहतुक सुरळित होण्याकरिता सहकार्य केले.
या महावॉकेथॉनद्वारे सुरक्षात्मक जबाबदार ड्रायव्हींगद्वारे रस्ता सुरक्षा, ध्वनीप्रदूषणावर निर्बंध याबाबत संदेश देऊन जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्याच्या हातामध्ये रस्ता सुरक्षाबाबतचे स्लोगनचे हॅन्डबिलचे फलक बॅनर प्रर्दशित करण्यात आले होते.
महावॉकेथॉन परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग CASI CSR Diary यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरित्या पार पाडली असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...