सकारात्मक विचार व कृतीतच
सन्मानाने जगण्याचा मार्ग
सकारात्मक विचार व कृतीतच
सन्मानाने जगण्याचा मार्ग
वेतन देयकासाठी कर्मचाऱ्यांची माहिती
ऑनलाईन आज्ञावलीत नोंदविणे आवश्यक
नांदेड (जिमाका) दि. 18 :- शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष 2023 तयार करण्याचे काम जिल्हा सांख्यिकी कार्यालय नांदेड मार्फत सुरू करण्यात आले आहे. नियोजन विभागाचे शासन परिपत्रक क्र. असांसं-1323/प्र.क्र.71/का.1417 दि. 8 ऑगस्ट 2023 नुसार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील व त्यांच्या आस्थापनेवरील नियमित, नियमितेतर, रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी व तदर्थ तत्वावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2023 या संदर्भ दिनांकाची माहिती ऑनलाईन आज्ञावलीमध्ये नोंदविणे आवश्यक आहे.
ही माहिती ऑनलाईन नोंदवून जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रमाणपत्र-1 जोडल्याशिवाय वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व राज्य शासकीय आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी. तसेच ज्या शासकीय कार्यालयांची वेतन देयके कोषागारात सादर होत नाहीत, अशा सर्व कार्यालयांनी सुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांची व रिक्त पदांची माहिती ऑनलाईन आज्ञावलीद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, नांदेड 02462-252775 ई-मेल dso.nanded88@gmail.com येथे संपर्क साधावा. कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2023 बाबत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक निखील बासटवार यांनी केले आहे.
000000
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी
ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 18 :- महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून “प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार 2024” हा शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्यांना देण्यात येतो. या पुरस्कारासाठी अर्ज प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक वर्षाच्या दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.
नांदेड जिल्ह्यातील वर नमूद क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेल्या बालकांनी या पुरस्काराकरीता मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात विनावेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्ती तसेच बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्था यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.
00000
समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी
21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन
नांदेड, (जिमाका) दि. 18:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000
वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...