Friday, August 18, 2023

 समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी

21 ऑगस्ट रोजी महिला लोकशाही दिन 

 

नांदेड, (जिमाका) दि. 18:-  समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित केला आहे. या लोकशाही दिनात समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  


दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण केंद्र, एसबीआय एटीएमच्या मागे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक  436 जल व्यवस्थापन पंधरवड्यानिमित्त पाणी वापराबाबत चर्चा नांदेड, दि. २६ एप्रिल:- कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (...