Wednesday, November 22, 2017

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतले गुरुद्वारात दर्शन
नांदेड, दि. 23 :- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिध्द हजूरसाहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा पारंपारिक पध्दतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सन्मान करण्यात आला. यावेळी देगलूर उपविभागीय अधिकारी व्ही.एल. कोळी, नांदेड तहसीलदार किरण अंबेकर, मंडळ अधिकारी श्री. पांचाळ हे उपस्थित होते. हजूरसाहेब सचखंड गुरुद्वाराचे अधीक्षक श्री. नारायणसिंगजी यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा गुरुद्वाराची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला. तसेच गुरमितसिंग महाजन, राजेंद्रसिंग पुजारी, गुरुप्रितसिंग सुखी , पीआरओ श्री. वाधवा तसेच आदिंची यावेळी उपस्थिती होती.
***



विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा सुधारीत दौरा
नांदेड, दि. 22 :- महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.  
गुरुवार 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.15 वा. शासकीय वाहनाने विश्रामगृह नांदेड येथुन फुलेनगर नांदेडकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. फुलेनगर येथे राजेश पवार यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10 वा. वाहनाने फुलेनगर नांदेड येथुन हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा. हुजूर साहिब गुरुद्वारास भेट. सकाळी 11 वा. हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथुन देगलूरकडे प्रयाण. दुपारी 1 वा. शासकीय विश्रामगृह देगलूर येथे आगमन व राखीव. दुपारी 3.50 वा. शासकीय विश्रामगृह देगलूर येथुन श्री गुंडागुरुधाम देगलूरकडे प्रयाण. सायं. 4 वा. आगमन व श्री गुंडामहाराज देगलूरकर-द्विशताब्दी पुण्यस्मरण महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- श्रीगुंडागुरुधाम (बालाजी व लक्ष्मी जिनींग उदगीर रोड ) देगलूर. सायं. 5.30 वा. मोटारीने श्री गुंडागुरुधाम देगलूर येथुन कासराळी ता. बिलोलीकडे प्रयाण. सायं. 6.30 वा. कासराळी येथे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या नातवाच्या विवाह समारंभास उपस्थिती. कासराळी येथुन सोईनुसार वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री 11.15 वा. शासकीय विश्रामगृह येथुन वाहनाने नांदेड रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.35 वा. अजिंठा एक्सप्रेसने औरंगाबादकडे प्रयाण करतील.  

000000
केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत
विविध व्यवसायासाठी प्रशिक्षण
नांदेड, दि. 22 :- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2017-18 या वर्षातील केंद्रीय अर्थसहाय्य योजनेंतर्गत  संगणक, ब्युटी पार्लर, फॅशन डिझाईन, मोबाईल दुरुस्ती, ॲटो मोबाईल, टीव्ही, रेडीओ, फेब्रीकेशन, वेल्डींग वर्कशॉप, ड्रॉव्हींग पेंटीग, मोटार रिवायडींग आदी व्यवसायासाठी प्रशिक्षणासाठी शुक्रवार 24 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे.
अर्जदार अनु. जाती, नवबौद्ध संवर्गातील असावा. अर्जासोबत शाळा सोडल्याचे मुळ प्रमाणपत्र, तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला शहरी भागासाठी 50 हजार 500 तर ग्रामीण भागासाठी 40 हजार 500 पेक्षा जास्त नसावा. पासपोर्ट आकाराची दोन छायाचित्रे, रॅशन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. अधीक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

000000
खड्डे भरण्याच्या अभियानासोबत
रस्ते, पुल, इमारतींची कामे वेळेत पुर्ण करावीत     
- सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील
नांदेड, दि. 22 :- रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या अभियानासोबत विभागातील इतर रस्ते, पुल व इमारतींची कामे विहित कालावधीत पुर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.     
यावेळी आ. हेमंत पाटील, आ. तुषार राठोड, उपसचिव के. टी. पाटील, औरंगाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मुकूंद सुरकुटवार, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, नांदेड कार्यकारी अभियंता विवेक बडे, भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर तोटावार, माधव शंखपाळे तसेच उपअभियंता व त्यांचे अधिपत्याखालील सर्व शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बांधकाम मंत्री श्री. पाटील म्हणाले की , रस्ते बांधकामासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन रस्ते बांधणीची कामे जास्तीतजास्त टिकाऊ राहतील व वाहतूकीस सोईचे होईल यादृष्टीने कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित झालेले रस्ते यापुर्वी रोहयो योजनेतून लोकांना रोजगार देण्याच्या हमीपोटी बांधण्यात आली आहेत. बहुतांश रस्ते काळ्या मातीतुन जाणारी असून मर्यादेपेक्षा जास्त वजनाची वाहने रस्त्यावरुन जात असल्याने रस्ते खराब होतात. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरुन रस्ते अधिक टिकाऊ राहतील. त्यादृष्टीने बांधकाम करणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी आढावा बैठकीतून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात येत आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या भेटी नोव्हेंबर 2017 अखेर पुर्ण होतील. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळेल. प्रत्येकांनी स्वत:ची जबाबदारी समजून चांगल्या प्रकारे काम करावे, असे निर्देशही बांधकाम मंत्री श्री. पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता व  कर्मचाऱ्यांची  रिक्त पदे भरण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही सुरु असून लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रस्ते, इमारती कामांची देखभाल व दुरुस्ती सन 2014-2015 ते 2016-2017 पर्यंतची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तर सन 2014 पुर्वीचे प्रलंबित देयकाबाबत संबंधित कंत्राटदारास देयके अदा करण्याचीही कार्यवाही करण्यात येईल. खात्यामार्फत पुर्ण करण्यात आलेल्या इमारती उपभोक्ता खात्यास तात्काळ हस्तांतरित करण्याचे, खड्डे भरण्यापलीकडील हाताबाहेर दुरुस्ती असलेल्या रस्त्यासाठीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. तसेच अशा कामांची निविदा लगेच काढून ही कामे हाती घेण्यात यावीत. यासाठी सिलेक्टिव्ह टेंडर पध्दतीचा अवलंब करण्याबाबत संबंधितांना मंत्री श्री. पाटील यांनी सुचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. पाटील यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता व रस्ते, पुल व इमारती यांची प्रगती, प्रस्तावित कामांची सद्यस्थितीबाबत चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली.

**** 

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...