Thursday, February 23, 2023

वृत्त क्रमांक 82

 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग

मंत्री नितीन गडकरी यांचा नांदेड दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

 

शुक्रवार 24 फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून हेलिकॉप्टरने सकाळी 10.45 वा. असर्जन नांदेड येथे आगमन. सकाळी 10.50 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाकडे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिक्षांत समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वा. विद्यापीठ परिसरातून शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून गोकुळनगरकडे प्रयाण. दुपारी 4 वा. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.30 वा. गुरुद्वारा बोर्ड मैदान येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या कोनशिला कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 6.50 वा. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानाकडे प्रयाण व सायं 7 ते 7.30 वाजेपर्यंत राखीव. सायं. 7.45 वाजता कमल किशोर कदम यांच्या निवासस्थानी भेट. रात्री 8.30 ते 9 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा व विश्रांती.  

 

शनिवार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून नांदेड विमानतळाकडे प्रयाण. सकाळी 10 वा. नांदेड विमानतळ येथून हेलिकॉप्टरने परभणीकडे प्रयाण करतील. दुपारी 3.45 वा. हिंगोली येथून हेलिकॉप्टरने नांदेड विमानतळ येथे आगमन. दुपारी 3.50 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000

 माजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत

क्षेत्रीय कार्यालयात आठ सेवा उपलब्ध


औरंगाबाद, दि.21, (विमाका) :- जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र दिले जात असून अशा एकूण आठ सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेवा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत पुरवल्या जात आहेत, अशी माहिती प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रशासकीय अधिपत्याखाली समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग, औरंगाबाद यांच्या अधिनस्त सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण औरंगाबाद,जालना,बीड व परभणी यांच्या अंतर्गत शासकीय वसतीगृह व शासकीय निवासी शाळा या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते.

 

जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद, औरंगाबाद,जालना,बीड व परभणी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली दिव्यांगांसाठी दिव्यांग ओळखपत्र, शासनमान्य शाळेत प्रवेश , दिव्यांगाच्या अनुदानीत विशेष शाळा. मतिमंद बालगृहे कर्म शाळा तसेच दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी देण्यात आलेल्या नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण अनुदानीत दिव्यांग शाळा, कर्म शाळेतील रिक्त पदे भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे इत्यादी योजनांची अंमलबजावणी केली जाते.

 

दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसन विषयक कार्य करण्यासाठी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणे. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत अनुसूचित जाती विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते अशा एकूण आठ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत सेवा प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, औरंगाबाद या कार्यालयामार्फत पुरवल्या जातात, अशी माहिती प्रादेशिक समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनकवडे यांनी दिली आहे.

 

*****

 वृत्त क्रमांक 81   

 

नांदेड जिल्ह्यात पाचशे आपदा मित्रांना प्रशिक्षण 

 

नांदेड, (जिमाका) दि. 23 :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणनवी दिल्ली पुरस्कृतराज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड यांचे मार्फत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात 12 दिवसांच्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचची सुरुवात 26 डिसेंबर 2022 पासून झाली. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्‍ह्यातील 500 स्वयंसेवकांना 12 दिवसांची एक बॅच याप्रमाणे सात बॅचमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

 

या योजनेअंतर्गत आपदा मित्रांना 12 दिवसांचे निवासी आपत्कालीन प्रशिक्षण विनामुल्य देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 7 दिवसाची थेअरी व 5 दिवसाचे प्रात्यक्षिक या गोष्टींचा समावेश होता. 18 फेब्रुवारी 2023 रोजी हा आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षित 500 आपदा मित्रांना  ओळखपत्र,  गणवेशआपत्कालीन प्रतिसाद किट व शासनाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठविष्णुपुरी नांदेड व जिल्हा प्रशिक्षण केंद्रहोमगार्ड कार्यालयनांदेड या ठिकाणी घेण्यात आला.

 

कोणतीही आपत्ती आल्यावर पहिल्या एका तासात जर मदत कार्यास सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होण्याचा धोका टळतो. हीच गोल्डन अवरची गरज व आपत्ती व्यवस्थापनात जनतेचा सहभाग लक्षात घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016 मध्ये देशातील 25 राज्यातील 30 जिल्ह्यांमधून प्रायोगिक तत्वावर आपदा मित्र या योजनेची सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यामधून 200 याप्रमाणे एकूण 6 हजार आपदा मित्र प्रशिक्षित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश होता. या योजनेची सफलता लक्षात घेऊन 28 सप्टेंबर 2021 रोजी देशातील 350 जिल्ह्यांमधून ही योजना राबवून त्यातून 1 लाख आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट होते.

 

यामध्ये महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील नांदेड व परभणी या दोन जिल्ह्यांचा समावेश होता. यामध्ये काही जिल्ह्यांना 200 तर काही जिल्ह्यांना 300 व काही जिल्ह्यांना 500 आपदा मित्रांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले होते. यामध्ये 500 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्याने पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण वेळेवर पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकरनिवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरीउप विभागीय अधिकारी विकास मानेजिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे तसेच महसूल सहाय्यक पिंटू सपकाळबालाजी चौहाण यांनी काम पाहिले.

0000    

 उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2022 करिता

प्रवेशिकांना 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

 मुंबईदि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिताउत्कृष्ट लेखनउत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथाउत्कृष्ट छायाचित्रकारसमाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार देण्यात येतात. सन 2022 च्या पुरस्कारासाठी दिनांक 1 जानेवारी, 2022 ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका दि. 31 जानेवारी 2023 पर्यंत मागविण्यात आल्या होत्यातथापि, प्रवेशिका पाठविण्यास 8 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2022 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनामाहिती व जनसंपर्क महासंचालनालयतळमजलाहुतात्मा राजगुरु चौकमादाम कामा मार्गमंत्रालयमुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल.

००००

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...