Wednesday, June 7, 2017

जिल्हा वार्षिक योजना निधीच्या विनीयोगासाठी
काटेकोर नियोजन करा - जिल्हाधिकारी डोंगरे
बैठकीत सर्वंकष आढावा , दर्जेदार कामांचा आग्रह

नांदेड, दि. 7 :- जिल्हा नियोजन समितीच्या विविध योजनांसाठी प्राप्त होणाऱ्या विकास निधीच्या खर्चाचे काटेकोर नियोजन करा. हा निधी वेळेत आणि दर्जेदार कामांवर खर्च होईल याकडे लक्ष द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजना निधीच्या विनियोगाबाबत जिल्हाधिकारी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा. तुकाराम मोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. बालाजी शिंदे, कार्यकारी अभियंता व्ही. पी. शाहू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर भातलंवडे, सहायक प्रकल्प संचालक प्रवीणकुमार घुले, सहायक नियोजन अधिकारी एस. एस. राठोड तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. डोंगरे म्हणाले की,  जिल्हा वार्षिक निधी जिल्ह्यातील विविध विकास कामांवर वेळेत खर्च झाला पाहिजे यासाठी आतापासून नियोजन करा. हा निधी वेळेत खर्च न झाल्यास, योजना अपूर्ण राहील्याने अनेक पात्र लाभार्थी त्यापासून वंचित राहतात. जलयुक्त शिवार अभियानासाठीच्या नियतव्यय निधीची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे अभियानातील कामांना गती द्या आणि ते वेळेत पुर्ण करा. गाव घटक म्हणून, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करा. या कामांसाठी लोकसहभागही घ्या. ज्यामुळे जिल्ह्याचाही विकास चांगल्यारितीने करणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा वार्षिक योजना निधीच्या विनीयोगात तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता वेळेत घेणे महत्त्वपुर्ण असते. त्यामुळे या मान्यता घेण्याबाबत संबंधित कार्यान्वयन यंत्रणांनी सुनियोजन करावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
यावेळी झालेल्या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान, माहूरगड विकास प्राधीकरण, स्वच्छता अभियान यासह अनेकविध योजना, कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.
00000


समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...