Wednesday, November 16, 2016

कापुस, तुर पिक संरक्षणासाठी
कृषि कार्यालयाचा संदेश
नांदेड दि. 16 :- जिल्ह्यात कापुस व तुर पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे. कपाशीवरील फुले येणाच्या व बोंडे निर्मितीच्या अवस्थेत जर पाने लाल पडत असतील तर मॅग्नेशिअम सल्फेट 0.2 टक्के 20 ग्रॅम प्रती 10 लिटर किंवा युरीया 2 टक्के पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी बोंड आळीसाठी सायपरमेथ्रीन 10 टक्के प्रती 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 टक्के सायपरमेथ्रीन 5 टक्के ईसी 20 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
तुरीवरील शेंगा खाणाऱ्या अळ्यासाठी प्रोफेनोफॉस 50 टक्के 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. घाटेअळीसाठी प्रती हेक्टर 5 कामगंध सापळे लावावेत, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
केळी पिक संरक्षणासाठी
कृषि कार्यालयाचा संदेश
नांदेड दि. 16 –  कृषि कार्यालयांतर्गत मुदखेड व अर्धापूर तालुक्यात केळी पिकासाठी कीड व रोग सर्वेक्षण प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भावग्रस्त भाग काढून टाकावा. झाडावर प्रोपीकोनेझॉल 0.05 टक्के (0.5 मि.ली.) मिनरल ऑईल 1 टक्के (10 मि.ली.) प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

0000000
बालदिनानिमित्त कायदेविषयक शिबीर संपन्न
नांदेड, दि. 15 :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण मुंबई यांच्या वार्षीक सर्व सामान्य किमान कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधीकरण नांदेड कार्यालयातर्फे नुकतेच सहकार महर्षी श्यामरावजी कदम होमिओपॅथीक वैद्यकिय महाविद्यालय सिडको नांदेड येथे ‘‘बालदिन’’ साजरा करण्यात आला. यावेळी रॅगिंग, सायबर क्राईम्स शिक्षणाचे अधिकार या कायद्यांची माहिती देण्यात आली.
अध्यक्षस्थानी न्या. . आर. कुरेशी होती. त्यांनी अध्यक्षीय भाषणात विधी सेवेबाबत मार्गदर्शन केले. तत्पुर्वी न्या. व्ही. के. मांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अॅड. विजय मालामनवर यांनी शिक्षणाचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. राणा सारडा यांनी सद्याच्या इंटरनेट युगात वाढत असलेल्या सायबर क्राईम्स याबाबत मार्गदर्शन केले. अॅड. विशाखा जाधव यांनी रॅगींगबाबत मार्गदर्शन करून त्यासंबंधी असलेल्या कायद्यांची माहिती दिली. अॅड. विजय गोणारकर यांनी भा..वि.कलम 304- ग्राहक संरक्षण कायदाविषयी आवश्यकती माहिती दिली. अॅड. जगजीवन भेदे, अॅड. मो. शाहेदव अॅड. प्रविण अयाचित यांनी विविध कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ॉ. हंसराज वैद्य, सकाळचे वार्ताहार प्रल्हाद कांबळे तसेच वैद्यकिय महाविद्यालयातील कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जटाळे यांनी केले. सुत्रसंचालन सौ. रेखा बच्चेवार यांनी केले तर शेवटी डॉ. जोंधळे यांनी आभार व्यक्त केले.

0000000
हवामानावर आधारित फळपिकांसाठी
 विमा भरण्यास 31 डिसेंबर पर्यंत मुदत
नांदेड, दि. 15 :-  प्रधानमंत्री फसल बिमा योजना हवामनावर आधारित द्राक्ष, मोसंबी, केळी आणि आंबा या फळपिकांसाठी अस शेतकऱ्यांनी बँकेत विमा हप्ता भरण्याची अंतिम तारिख 31 डिसेंबर 2016 आहे. या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीतजास्त संख्येने शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी नजीकच्या बँकेशी तसेच संबंधित विमा कंपनीशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
कृषि पदुम विभागाचा शासन निर्णय दि. 29 ऑक्टोबर 2016 अन्वये नांदेड जिल्ह्यातील सन 2016-17 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित पीक विमा योजना अंबिया बहाराकरीता लागु करण्यात आली आहे. योजना कार्यन्वयीत करणारी यंत्रणा, कंपनी ही बजाज अलायझ इन्शुरन्स कंपनी, येरवाडा पुणे 411006 आहे. ही योजना अधिसुचित पीकांसाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठी सक्तीची राहील आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  एैच्छिक राहिल. दि. 8 नोव्हेंबर 2016 च्या शासन निर्णयानुसार सदरच्या पिक विम्याची मदत वाढव ती दि. 31 डिसेंबर 2016 पर्यंत करण्यात आली आहे.
विमा हप्ता दर
अ. क्र.
फळपिक
विमा संरक्षित रक्कम
(नियमित) रुपये
गारपीट विमा संरक्षित
रक्कम रुपये
शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता
रक्कम रु.
नियमित
गारपीट
1
द्राक्ष
243000
93335
12150
4667
2
मोसंबी
70000
23300
3500
1165
3
केळी
115000
38300
5750
1915
4
आंबा
110000
36700
5500
1835

योजना अंमलबजावणी वेळापत्रक अधिसुचित मंडळे
            कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2016 आहे. सदरची योजना जिल्ह्यामध्ये खाली दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लाग राहिल.
अ. क्र.
अधिसुचित फळपिक
तालुके
अधिसुचित महसुल मंडळे
1
द्राक्ष
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबग, विष्णुपूरी.
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
2
मोसंबी
नांदेड
लिंबगाव, विष्णूपूरी
मुदखेड
बारड
अर्धापूर
मालेगाव
3
केळी
नांदेड
तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपूरी
अर्धापूर
अर्धापूर, दाभड, मालेगाव
मुदखेड
मुदखेड, मुगट, बारड
हदगाव
हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी
लोहा
शेवडी बा.
भोकर
भोकर
देगलूर
मरखेल, हाणेगाव
किनवट
किनवट, बोधडी
4
आंबा
अर्धापूर
मालेगाव, दाभड


0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...