नेदरलँडच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित ;
ब्रॉयलर संगोपनावरील व्यावसायिक प्रशिक्षणात
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले मार्गदर्शन
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद झडके, बिलोलीचे तहसिलदार विक्रम राजपूत, संस्थेचे
संचालक श्री. देशमुख व कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती
होती.
या कार्यक्रमाचा भाग म्हणून युरोप
खंडातील नेदरलँड् या देशातील "एरिस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण संस्थेच्या"वतीने
नांदेड जिल्ह्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक
प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे 4 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आले आहे.
वातावरण
बदलाचा शेतीवर होत असलेला अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसायांना चालना
मिळावी व शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देता यावे यासाठी
संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी मार्फत विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात येत
आहेत.
पहिल्या
दोन आठवड्यात ब्रॉयलर व्यवस्थापनाविषयी सखोल प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात येत असून
यामध्ये जैवसुरक्षा, उन्हाळ्यातील
अतिउष्ण तापमानात पक्ष्यांची घ्यावयाची काळजी, खाद्य
व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन, तुसाचे
व्यवस्थापन, रोगनियंत्रण, लसीकरण व
महत्वाच्या बाबींच्या नोंदी ठेवणे इत्यादी विषयांचा समावेश आहे. त्यानंतर येत्या
फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित दोन आठवड्याचे प्रशिक्षण घेण्यात
येणार असून त्यासाठी सुद्धा याच प्रशिक्षण संस्थेचे तज्ज्ञ भारतात पुन्हा एकदा
येऊन पुढील प्रशिक्षण देणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी या स्वरूपाचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय
प्रशिक्षण असून त्याकरिता नेदरलँड शासनाचे सहकार्य मिळविण्यासाठी संस्थेचे संचालक रोहित देशमुख व कृषि
विज्ञान केंद्राचे प्रा.व्यंकट शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. हे प्रशिक्षण यशस्वी व्हावे म्हणून पशुसंवर्धन
विभागाचे सहकार्यही मिळत आहे.
000000