बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती रॅली संपन्न
नांदेड
दि. 15 :- बालकामगार
प्रथे विरुद्ध नांदेड मुख्य बाजारपेठेत सहाय्यक कामगार आयुक्त नांदेड कार्यालयाच्यावतीने
आयोजित रॅलीस जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी हिरवी झेंडी दाखवून महात्मा गांधी
पुतळ्यापासून प्रारंभ केला.
ही रॅली
गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी पुतळ्यापासून मार्गस्थ होऊन महावीर चौक,
वजिराबाद बाजारपेठ ते बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सांगता झाली.
रॅलीच्या प्रारंभी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाच्यावतीने पथनाट्याचे आयोजन
करण्यात आले होते.
या रॅलीत उपजिल्हाधिकारी श्रीमती देवकुळे, नायब
तहसिलदार श्रीमती मोपडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती रेखा काळम, सहाय्यक
कामगार आयुक्त मोहसिन सय्यद, सरकारी कामगार अधिकारी अ.अ.देशमुख व निरिक्षक श्रीकांत भंडारवार यांचा सहभाग
होता.
रॅलीचे मुख्य आयोजन सहाय्यक कामगार आयुक्त
मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच कार्यालयाच्यावतीने
दिनांक 7 नोव्हेंबर पासून 7 डिसेंबर 2019 या कलावधीत नांदेड जिल्ह्यात बालकामगार
प्रथेविरुद्ध विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सहाय्यक कामगार
आयुक्त मोहसिन सय्यद यांनी सांगून आभार मानले तर सूत्रसंचालन अॅड. विष्णु गोडबोले यांनी
केले.
रॅलीत गुजराती शाळा, होलिसिटी
शाळा व आंध्रा शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांचा
मोठ्या प्रमाणात सहभाग होता. अशोक
कांबळे, शैलेश जुगदार, परिवार प्रतिष्ठान नांदेडचे डॉ. पी.
डी. जोशी पाटोदेकर तसेच नवजीवन बहूउदेशीय संस्थेच्या श्रीमती अपर्णा सावळे आणि
रमेश सावळे, श्रीमती कल्पना
राठोड यांचाही सहभाग होता.
000000
No comments:
Post a Comment