Thursday, November 14, 2019


तुर, हरभरा, कापूस पिकांसाठी कृषि संदेश
नांदेड दि. 14 :- तुर सध्या लवकर पक्व होणाऱ्या तुरीचे वाण शेंगाच्या अवस्थेत असुन तो त्यास फायदेशीर आहे. तर मध्यकालावधीत पक्व् होणाऱ्या अवस्थेतील वाणांसाठी सुध्दा फायदेशीर आहे. ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली असेल त्या ठिकाणी  मुळकुज रोग होऊ नये म्हणुन पाणी त्वरीत काढुन  द्यावे. 
शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या बंदोबस्त करण्यासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अथवा अझाडारिक्टीन (300 पीपीएम) 50 मि.ली. किंवा एच.. एन. पी. व्ही. 500 एल. . 10 मिली किंवा किवनॉलफॉस 20 टक्के प्रवाही 16 मिली किंवा एन्डॉक्झाकार्ब 14.5 टक्के 14.5 टक्के प्रवाही 7 मिली. किंवा फलुबेंडामाईड 20 टक्के दाणेदार 5 ग्रॅम किंवा क्लोरॅनिलीप्रॉल 18.5  टक्के प्रवाही 3 मिली यापैकी कोणतेही एक किटकनाशक फवारावे गरज पडल्यास दुसरी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.
हरभरा पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहु / बागायती हरभरा पेरणी केली आहे. अशा ठिकाणी सततच्या पावसाने  पाणी साठले आहे अशा ठिकाणी पिकाची  उगवण  झाली नाही किंवा पीक उबळुन गेले आहे. अशा ठिकाणी हरभऱ्याची दुबार पेरणी करावी. तसेच ज्या ठिकाणी हरभरऱ्याची उगवण झाली आहे अशा ठिकाणी पीक वापशावर आल्यावर कोळपणी करुन 2 टक्के युरीयाची फवारणी करावी. घाटेअळीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास पिकास कामगंध सापळे प्रति एकर दोन लावुन किडींचे सर्वेक्षण करावे. तसेच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. अथवा अझाडीरॅक्टींन (1500 पीपीएम) 5 मिली प्रति लिटर पाण्यात फवारणी करावी अथवा एच.. एन. पी. व्ही. 500 एल. . 1.5 मिली प्रती लिटर या जैविक विषाणुची फवारणी करावी .
            कापुस पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचुन राहिले असल्यास पाणी दंडाच्या सहाय्याने पिक  क्षेत्राबाहेर काढुन दयावे. कपाशीचे पाने लालसर झाली असतील तर नत्राची कमतरता असण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाढीच्या काळात 2 टक्के डीएपी खतांच्या दोन फवारणी 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात. आकस्मिक मर आढळुन आल्यास 1.5 किलो युरीया + 1.5 किलो पालाश 100 लिटर पाण्यात मिसळुन 150 ते 200 मि. ली. प्रति झाड दयावे. पिकावर बोंड अळयांचा प्रादुर्भाव आढळल्यास एच.एन. पी. व्ही. 500 एल. / हेक्ट्र अथवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 8 मि. ली. किंवा प्रोफेनोफॉस 50 .सी. 30 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...