Thursday, November 14, 2019


मधुमेह, मानसिक आजार
रोखण्यासाठी व्यायाम महत्वाचा
-         जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर
नांदेड दि. 14 :- मधुमेह व इतर मानसिक आजार रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने दिवसातून कमीत कमी तीस मिनिट चालणे किंवा व्यायाम करणे महत्वाचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. वाय. भोसीकर यांनी केले आहे.   
जागतिक मधुमेह दिन दिनानिमित्त नांदेड जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मधुमेह दिन जनजागृती कार्यक्रम आज 14 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला. त्यावेळी डॉ. भोसीकर बोलत होते.  
डॉ. भोसीकर पुढे म्हणाले, एकविसाव्या शतकात व्यक्तीने इंटरनेटच्या माध्यमातून कामे करणे ही विकासाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी यापुढील परिस्थिती बघितली तर व्हाटस्अप्प, फेसबुक, विविध प्रकारचे गेम्स याचा अतिवापर हा मधुमेह व इतर मानसिक अजारचे मोठे कारण असल्याचे दिसून आले आहे.
या कार्यक्रमास निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. ये.पी. वाघमारे, डॉ.एच.के.साखरे, डॉ. लोकडे डॉ. दीपक गोरे, डॉ. पवार, डॉ. खान, डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. साईप्रसाद शिंदे, अधिपरिसेविका राठोड तसेच रुग्ण व त्यांची नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एन. हजारी यांनी केले तर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिरसीकर यांनी उपस्थित रुग्णांना मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची करणे कोणती याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समुपदेशक सुवर्णकार सदाशिव व बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...