Wednesday, September 9, 2020

 

नीट परीक्षेतील विद्यार्थी-पालकांच्या सोईसाठी

13 सप्टेंबर या एक दिवसासाठी ताळेबंदीमधून मुभा

-         जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 9 :- प्रतिक्षेत असलेल्या नीट परीक्षा रविवार  13 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 2 ते 5 या कालावधीत होत आहेत. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी  एकूण 62 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह कोविड-19 सुरक्षिततेच्या कारणामुळे पालकही परीक्षा केंद्रांवर सोबत येण्याची शक्यता लक्षात घेऊन वेळेवर अत्यावश्यक ठरणाऱ्या उपहारगृह, ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स व इतर अनुषंगिक व्यवहार सुरु ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी एक दिवसासाठी टाळेबंदीतून मुभा दिली आहे. तसेच आदेश आज दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी निर्गमीत केले आहेत.   

या आदेशातील नियमावलीसह 30 सप्टेंबर 2020 पर्यंत जिल्ह्यात नागरी, ग्रामीण व औद्यागिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधिन राहून आस्थापना व दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी, सुनिल श्रीवास्त व भुवना बार्शिकर यांनी पालकांच्यावतीने 13 सप्टेंबर 2020 रोजी नीट (युजी) परीक्षेसाठी गैरसोय होऊ नये म्हणून उपहारगृह, ऑटोरिक्षा, जनरल स्टोअर्स, व इतर अनुषंगिक व्यवहार सुरळीत राहण्याबाबत जिल्हाधिकारी यांना विनंती केली होती.  फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 नुसार अधिकाराचा वापर करुन जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊन फौजदारी प्रक्रीया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संपुर्ण जिल्ह्यात नीट (युजी) 2020  ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी रविवारी या दिवशी असल्याने केवळ या एका रविवारसाठी ताळेबंदीमधून मुभा देण्यात आली आहे. 

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. 

या आदेशाची अंमलबजावनी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही. हे आदेश 9 सप्टेंबर 2020 रोजी माझे सही शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आली आहे.

00000

 

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश 9 सप्टेंबर पासून लागू

नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 9 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 21 सप्टेंबर मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

 जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात बुधवार 9 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते सोमवार 21 सप्टेंबर 2020 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

केळी पिकासाठी कृषि संदेश

नांदेड (जिमाका) दि. 9 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड, अर्धापूर या तालुक्यात केळी पिकांसाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम राबविण्यात येत असून केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे. 

केळी पिकांवरील फुलकिडे नियंत्रणासाठी केळीच्या घडावर व्हीर्टीसिलियम लेकॅनी  (2x108 cfu/gm) 3 ग्रॅम लि. पाणी अधिक स्टीकर 1 मिल किंवा निंबोळी अर्क 5 टक्के स्टीकर 1 मिली फवारणी करावी. फुलकिडे नियंत्रणासाठी केळ फुलबाहेर पडल्यावर त्यांना पॉलीथीनची पिशवी घालावी.

केळीच्या पानावरील ठिपके नियंत्रणासाठी ठिपके आढल्यास तो भाग काढुन बागेच्या बाहेर नेऊन नष्ट करावा. केळीचा प्लॉट स्वच्छ तणविरहीत  ठेवावा. तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित  करावा. पाणी साचणार नाही. याची काळजी घ्यावी असे आवाहन आर. टी. सुखदेव उप विभागीय कृषि अधिकारी , नांदेड यांनी केले आहे.

00000

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ऐवजी

आत जिल्हा ग्राहक निवारण आयोग  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे नावात बदल करुन जिल्हा ग्राहक निवारण आयोग असे करण्यात आले आहे. सर्व संबंधितानी यांची नोंद घ्यावी, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी प्रबंधक वि.ग.आचेवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा दि. 15 जुलै 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. या कायद्यातील कलम 28 (1) च्या अनुषंगाने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे नावात बदल करण्यात आला आहे यांची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी असेही कळविले आहे.

00000

 

विकेल ते पिकेल अभियानाच्या शुभारंभानिमित्त

मुख्यमंत्री साधणार शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद  

नांदेड (जिमाका) दि. 9 :- राज्यातील शेतकरी चिंतामुक्त व्हावा व शेतकरी केंद्रीत कृषि विकास साधल्या जावा या उद्देशाने विकेल ते पिकेल अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व परिवर्तन अभियानाच शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री श्रीमती आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक विकास चंद्र रस्तोगी, कृषि आयुक्त धीरजकुमार यांची उपस्थित असेल. या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शासनाच्या विविध कृषि विषयक योजनासंदर्भात उद्या गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता राज्यातील शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.

हा कार्यक्रम ऑनलाईन असुन तो कृषि विभागाच्या यु-ट्युब चैनल http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM वर दुपारी 12 ते 1.30 यावेळेत लाईव्ह प्रसारीत होईल. राज्यातील शेतकरी, महिला नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केली आहे. विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत बाजारातील मागणीनुसार पिकेल व कृषिपुरक उत्पादनाचे नियोजन, विविध पिकांच्या कार्यक्षम मुल्यसाखळीचा विकास, शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडण्यासाठी करार शेती, निर्यातक्षम पिकाचे उत्पादन व निर्यातवाढ, शेतीमालाच्या काढणी पश्चात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक याचा अंर्तभाव असेल. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) या जागतिक बँक आर्थसहाय्यीत प्रकल्पामध्ये लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषि नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतीमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मुल्यसाखळी विकासासाठी शासनातर्फे मदत करणे, ग्रामविकास समिती स्थापन करुन गावपातळीवर कृषि विकासाचे सुक्ष्म नियोजन व अंमलबजावणी, कृषि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी जमिनीचे आरोग्य व सेंद्रीय शेती धोरण अंतर्गत कार्यक्रम आदी बाबी राज्याच्या कृषि विभागातर्फे घेतल्या गेल्या आहेत.  

 

या ऑनलाईन संवादात मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून चिंतामुक्त शेतकरी शेतकरी केंद्रीत कृषि विकास विचार मांडतील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. ज्या शेतकरी बांधवांकडे नेट आहे अशा शेतकरी बांधवांनी या लाईव्ह संवादास आवर्जून हजेरी द्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी केले आहे.

0000

 

246 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

408 बाधितांची भर तर चार जणांचा मृत्यू   

 

नांदेड (जिमाका) दि. 9 :- बुधवार 9  सप्टेंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 246 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 408 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 132 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 276 बाधित आले. 

आजच्या एकुण 1461 अहवालापैकी  990 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 9 हजार 986 एवढी झाली असून यातील 6 हजार 363 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेल्याची टक्केवारी 65.96 एवढी आहे. एकुण 3 हजार 283 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 39 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.  

मंगळवार 8 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यातील किशोरनगर नांदेड येथील 52 वर्षाची महिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, वाडी बुद्रुक नांदेड येथील 48 वर्षाची महिला खाजगी रुग्णालय येथे तर बुधवार  9 सप्टेंबर 2020 विजयगड कंधार येथील 65 वर्षाचा एक पुरुष शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे, गणेशनगर नांदेड येथील 72 वर्षाची एक महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे  उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

 आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 9, मुखेड कोविड केंअर सेंटर 4, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर 15, खाजगी रुग्णालय 10, कंधार कोविड केंअर सेंटर 3, धर्माबा कोविड केंअर सेंटर 10, नायगाव कोविड केंअर सेंटर 11, मुदखेड कोविड केंअर सेंटर 11, पंजाब भवन कोविड केंअर सेंटर 133, किनवट कोविड केअर सेंटर 6, हदगाव कोविड केंअर सेंटर 11, माहूर कोविड केंअर सेंटर 1, लोहा कोविड केंअर सेंटर 22 असे असे 246 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे

 

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपाक्षेत्र 50, अर्धापूर तालुक्यात 2, देगलूर 2, हिमायतनगर 7, किनवट 6, लोहा 6, उमरी 1, नांदेड ग्रामीण 9, हदगाव 2, मुखेड 11, नायगाव 17, कंधार 1, बिलोली 12, बीड 1 असे एकुण 123 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र, 111, बिलोली तालुक्यात 2, अर्धापूर 4, किनवट 7, नायगाव 37, मुखेड 15, धर्माबाद 2, भोकर 8, परभणी 1, नांदेड ग्रामीण 12, मुदखेड 29, लोहा 17, कंधार 2, हदगाव 1, माहूर 6, उमरी 19, हिमायतनगर 2, लातूर 1 असे  एकुण 276 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 3 हजार 283 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 276, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन, होम आयसोलेशन एकत्रित 1 हजार 652, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 92, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 132, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 100, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 143,  देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 50, लोहा कोविड केअर सेंटर येथे 117, हदगाव कोविड केअर सेंटर 143, भोकर कोविड केअर सेंटर 15,  कंधार कोविड केअर सेंटर येथे 52,  किनवट कोविड केअर सेंटर येथे 128, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 39, मुदखेड कोविड केअर सेटर 50,  माहूर कोविड केअर सेंटर येथे 51, आयुर्वेदिक शासकिय रुग्णालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 51, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 45, उमरी कोविड केअर सेंटर 56, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 5, खाजगी रुग्णालयात 334 बाधित, औरंगाबाद येथे संदर्भित 7, निजामाबाद येथे 2 बाधित, मुंबई येथे 1 बाधित तर हैद्राबाद येथे 4, लातूर 1 बाधित  संदर्भित झाले आहेत.  

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

घेतलेले स्वॅब- 59 हजार 228,

निगेटिव्ह स्वॅब- 46 हजार 985,

आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 408,

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 9 हजार 986,

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 12,

एकूण मृत्यू संख्या- 280,

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 6 हजार 363,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 3 हजार 283,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 523, 

आज रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- 39. 

 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.   

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...