Sunday, July 9, 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याच्या हस्ते
नांदेड जिल्ह्यातील 17 गावाचा ई-भुमीपुजन कार्यक्रम

  नांदेड दि. 9:- – नांदेड जिल्ह्यातील जलस्वराज-२  या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांसाठी साठवण टाक्‍या उभारणीचे प्रकल्प, पाणी गुणवत्ताबाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र उभारणीचे १७ गावातील प्रकल्पाच्या योजनांचे भुमीपुजन कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याच्या हस्ते आज संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला पाणी व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पाणी व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची उपस्थिती राहणार आहे. पाणी  सगरोळी येथील कार्यक्रमाचे ई-भुमीपुजन कार्यक्रम दोन्ही बाजुनी प्रेक्षपण केला जाणार आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याव्दारे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम व जागतिक बॅक अर्थसाहायित जलस्वराज्य – २ योजनेतील महाराष्ट्रातील १७० प्रकल्पाचा ई-भुमीपुजन सोहळा सोमवार दिनांक १० जुलै २०१७ रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यात नांदेड जिल्हयातील १७ गावांचा समावेश आहे. पाणी गुणवता बाधीत १० गावे - किनवट तालुक्यातील दूधगाव, यंदा, शनिवारपेठ, सिरमेटी, देगलूर तालुक्यातील मूजळगा, धर्माबाद तालुक्यातील रामपूर, रामेश्वर, बिलोली तालुक्यातील कोळगाव, व माहूर तालुक्यातील अंजनखेड, वाई, पाणी टंचाई ग्रस्त ५ गावे - किनवट तालुक्यातील आमरसिंग नाईक तांडा, मुखेड तालुक्यातील फत्तु तांडा, मानसिंग तांडा, व लोहा तालुक्यातील चित्रा तांडा, सोनमांजरी तांडा,शहरालगतची पाणी पुरवठा योजना प्रकल्पातील २ गावे बिलोली तालुक्यातील अर्जापूर व सगरोळी या गावांचा ई-भुमीपुजन कार्यक्रमत समावेश करण्यात आला आहे.
सगरोळी ता. बिलोली येथिल पाणी पुरवठा योजनेच्या कार्यक्रमाचे ई-भुमीपुजन कार्यक्रम दोन्ही बाजुनी प्रेक्षपण केला जाणार आहे. तर अर्जापूर येथे व जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ई-भुमीपुजन कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पाहता येणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी आधिकारी अशोक शिनगारे, उप मुख्य कार्यकारी आधिकारी जी.एल. रामोड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. बोडके, जिल्हा वरिष्ठ भू-वैज्ञानिक श्रीमती सांळुके मॅडम यांनी दिली आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...