Wednesday, October 5, 2016

उज्ज्वल नांदेड यशस्वी करण्यासाठी
येणाऱ्या संधीला ध्येय माना - काकाणी
यशस्वी उमेदवारांचाही मार्गदर्शन शिबीरात सत्कार संपन्न

नांदेड, दि. 5 :-  उज्ज्वल नांदेड ही यशस्वी परंपरा ठरविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संधीला ध्येय माना, त्यासाठी एकाग्रता, अभ्यासाचे नवीन तंत्र आत्मसात करा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी आज येथे केले. उज्ज्वल नांदेड या संकल्पनेतील जिल्हाधिकारी कार्यालय सेतू समिती व  नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्यावतीने आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मार्गदर्शन शिबीर दर महिन्याच्या 5 तारखेला आयोजित करण्यात येत आहे.
डॉ. शंकरराव  चव्हाण  प्रेक्षागृह स्टेडियम परिसर नांदेड येथे आयोजित शिबीरासाठी महापालिका आयुक्त समीर उन्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती माधवी मारकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची उपस्थिती होती. यावेळी उज्‌जवल नांदेड संकल्पनेमुळे यशस्वी झालेले आणि सहायक सरकारी अभियोक्ता वर्ग-1 पदी निवड झालेले यशस्वी मनोज देशपांडे, विशाल परदेशी आणि व्यंकटेश पोटफोडे यांचाही सत्कार करण्यात आला. सहायक आयुक्त श्रीमती मारकड  यांनी भारतीय राज्यव्यवस्था (UPSC व  MPSC) या विषयावर मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, स्पर्धा आयुष्यातही असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली, तर ती आयुष्याच्या वाटचालीतही उपयुक्त ठरते. त्यामुळे स्पर्धा तयारीचे हे पाऊल नेहमीच पुढचं पाऊल ठरते. त्यासाठी एकाग्रता, जिद्द-चिकाटी आणि नव-नवीन तंत्र आत्मसात करण्याची वृत्तीही वाढते. यातूनच तुमच्यासाठी यशाचे नवे मार्ग खुले होत राहतील. त्यामुळे उज्ज्वल नांदेडच्या उपक्रमाची ही परंपरा यशस्वी ठरविण्यासाठी प्रत्येकाने ध्येय छोटे-मोठे न मानता येणाऱ्या प्रत्येक संधीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरते.
मनपा आयुक्त श्री. उन्हाळे म्हणाले की, स्पर्धेत टीकण्याची, भाग घेण्याची आणि प्रत्येक क्षेत्रातील क्षमता विकासाची संधी स्पर्धा परीक्षामुळे अंगी येते. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही या वृत्तीचा कस लागतो, कसोटी पाहिली जाते.
यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता वर्ग-1 पदी निवड झालेले मनोज देशपांडे यांनी स्वतःला ओळखून स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करा, असा सल्ला दिला. आपल्या यशात जिल्हा ग्रंथालय तसेच या उपक्रमाचे मोठे योगदान असल्याचेही सांगितले. सुरवातीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय करून दिला. आरती कुकलवार यांनी सुत्रसंचालन केले. शिबीरासाठी सभागृहात विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000000
फटाका विक्री स्टॉलसाठी  
10 ऑक्टोंबर पर्यंत मुदवाढ
नांदेड, दि. 5 :- तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीस सोमवार 10 ऑक्टोंबर 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
सन 2016 मध्ये दिपावली उत्सव 29 ऑक्टोंबर 2016 ते 31 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत साजरा होत आहे. त्याअनुषंगाने  नांदेड  महानगरपालिका  हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्यामार्फत व जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज  विस्फोटक अधिनियम 2008 नुसार 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत विक्री व स्विकारले जाणार  होते. दि. 14 सप्टेंबर 2016 नुसार केलेल्या जाहीर प्रगटनामध्ये दिलेल्या अटी व शर्ती कायम राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

                                                                     000000       
नांदेड जिल्‍हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण
अनुसचित जाती
अनुसचित जाती (महिला)
अनुसुचित जमाती
अनुसुचित जमाती (महिला)
21 लिंबगाव
18- मालेगाव
36- बरबडा
50- पेठवडज
11 निवघा (बा.)
19- वाडी (बु.)
23-बारड
57-बा-हाळी
13 रुई (धा.)
42 – उमरा
14 – आष्‍टी
55-येवती
12 पळसा
9- सरसम(बु.)



16 मनाठा
54- एकलारा


49 फुलवळ
15- तामसा



नागरिकाचा मागासवर्ग (प्रवर्ग)
नागरिकाचा मागासवर्ग (महिला)
सर्वसाधारण
सर्वसाधारण (महिला)
2- वानोळा
40-सोनखेड
1- वाई(बा.)
44-कलंबर (बु.)
22- बळीरामपूर
29- तळेगाव
4- मांडवी
53- चांडोळा
25-पाळज
33-सगरोळी
8- ईस्‍लापुर
3- उमरी (बा.)
30- करखेली
5- गोकुंदा
10- दुधड
6-बोधडी (बु.)
35-लोहगाव
63-हणेगाव
20- वाजेगाव
7- जलधारा
38-नरसी
28-गोरठा
26- भोसी
24- मुगट
61-करडखेड
31-येताळा
27- पिंपळढव
34- रामतीर्थ
17- येळेगाव
43- सावरगाव (न.)
32- आरळी
37- कुंटुर

51- कुरुळा
45- माळाकोळी
39- मांजरम


47- शिराढोण
41- वडेपुरी


48- कौठा
46- बहाद्यरपुरा


52- जांब (बु.)
56- सावरगाव (पिर)


60- शहापुर
58- मुक्रामाबाद


62- मरखेल
59-खानापुर


किनवट आदिवासी प्रकल्पस्तरीय
क्रिडा स्पर्धांचे शुक्रवारपासून आयोजन
नांदेड, दि. 5 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांसाठी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन शुक्रवार 7 ऑक्टोंबर ते रविवार 9 ऑक्टोंबर 2016 या कालावधीत करण्यात आले आहे.
किनवट प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा बोधडी, सारखणी, उमरी बा., सहस्त्रकुंड या केंद्रावर 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत पार पडल्या आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून 7 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर या कालावधीत प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा किनवट येथे करण्यात आले आहे.
या क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन 7 ऑक्टोंबर रोजी  सकाळी 11 वा. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या हस्ते  होणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे संचलन होईल. तसेच या स्पर्धा दरम्यान 8 ऑक्टोंबर रोजी सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. भारुड यांचे हस्ते सायंकाळी 8 वा. करण्यात येईल.
या क्रिडा स्पर्धासाठी बोधडी, सारखणी, उमरी बा. व सहस्त्रकुंड या चार केंद्रातील एकूण 300 मुले व 300 मुली  सहभागी  होतील स्पर्धाचे नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी  ए. व्ही. आगळे, ए. न. झाडे, एन. आर. जाधव, यु. एम. बनसोडे, बी. एस. बोंतावार, एम.  एम. कांबळे यांच्या विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धा शिक्षक, प्रशिक्षण, खेळाडू व पंच यांनी  खिलाडू वृत्तीने  सहभागी  होण्याचे आवाहन डॉ. भारुड यांनी केले आहे. तसेच क्रिडा प्रेमीने या स्पर्धांना उपस्थित राहून आदिवासी खेळाडुंना प्रोत्साहन दयावे, असेही म्हटले आहे.
0000000
पाऊस, पुराने बाधित पिकांच्या
विमा संरक्षणाबाबत शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड, दि. 5 :- खरीप हंगाम 2016 अंतर्गत पंतप्रधान पीक विमा योजना आणि पीक विमा संरक्षणाबाबत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिपाऊस व पुरामुळे झालेल्या नुकसानीबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली आहे. पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे व त्यासाठी विमा कंपन्याशी संपर्क साधण्याच्या प्रक्रियेचेही माहिती निवेदनात दिली आहे.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यावर्षी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात पिकांचा विमा काढलेला आहे. पावसाच्या पाण्यामुळे नुकसान झाल्यामुळे आपल्या शेताचा पंचनामा करावा व विमा कंपनीस कळवावे म्हणून शेतकरी कृषि विभाग, महसूल विभाग व बँकाकडे अर्ज करत आहेत. परंतू सदर नुकसानीच्या बाबतीत सर्वांनी अर्ज करणे अपेक्षीत नाही. जेथे स्थानिक आपत्ती झालेली आहे म्हणजे नदी, नाल्याचे पुराचे पाणी शेतात घुसून पिकाचे जर नुकसान झाले असेल तरच वैयक्तिक  पंचनाम्यासाठी  शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, विमा हप्ता भरल्याची पावती, सात-बारा इत्यादी  माहिती  तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सादर करावयाची आहे. स्थानिक आपत्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भारतीय कृषि विमा कंपनीचा टोल फ्री नंबर 1800 103 0061 वर 48 तासात माहिती दयावयाची आहे. याचबरोबर  तालुका कृषि अधिकारी किंवा बँकाकडे प्राप्त झालेल्या स्थानिक आपत्तीच्या अर्जाची माहिती विमा कंपनीस पाठवून नुकसानीचा अंदाज बांधण्यासाठी विमा कंपनीने आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती करावयाची आहे.
पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी घटकामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे पीक कापणी प्रयोग लक्षात आले आणि उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान असेल तर अशा महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनी नुकसान भरपाई देणार आहे. यासाठी वैयक्तिक अर्ज करण्याची गरज नाही. पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेले उत्पन्न जर उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा कमी असेल तर त्या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे याबाबीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याची गरज नाही.
पीक काढल्यानंतर सुकविण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. परंतू हे नुकसान चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे झाले असेल तर नुकसान भरपाई देय आहे. परंतू आताचा पाऊस अवेळी नसल्यामुळे काढणी पश्चात नुकसानीसाठी वैयक्तिक पंचनाम्याची गरज नाही.
विमा कंपनीचे नाव व पत्ता पुढील प्रमाणे आहे. भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई दूरध्वनी नंबर 022-61710900 / 901, टोल फ्री क्र. 1800 103 0061, ईमेल आयडी ro.mumbai@aicofindia.com जिल्हा प्रतिनिधी आय. जी. मठपती, लाहोटी कॉम्प्लेक्स प्रभात टॉकीज जवळ वजिराबाद नांदेड दूरध्वनी क्र. 02462-238927 मो. 9403636900. विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक नितीनकुमार स्वर्णकार दूरध्वनी क्र. 022-7307571488 आहे.

000000


जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
सहकारी सोसायट्यांचे सभासद करणार
सहकार विभागाची गावपातळीवर युद्ध पातळी मोहिम  
नांदेड, दि. 5 :- गाव पातळीवरील सर्व पात्र खातेदार यांना विकास सहकारी संस्थांचे सभासद करुन घेणेसाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली असून पात्र खातेदारांना 31 डिसेंबर 2016 पर्यंत प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सभासद व्हावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नांदेड यांनी केले आहे.
नांदेड  जिल्ह्यातील  महसुली  गावातील  लोकसंख्या  विचारात घेता जिल्ह्यातील अजूनही बहुतांश गावातील बरेचशे शेतकरी खातेदार असे आहेत की ते सेवा सहकारी संस्थेचे सभासद झालेले नाहीत. त्याकरीता संस्थांचे गावातील वंचीत शेतकरी पात्र खातेदारांना प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी  संस्थाचे सभासद करुन घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे सहकार मंत्री यांनी सुद्धा सहकार खात्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आवाहन केले की, त्यासाठी कार्यक्षेत्रातील गाव पातळीवरील सर्व पात्र खातेदार यांना विकास सहकारी संस्थांचे सभासद करुन घेणेसाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली आहे. संपर्कासाठी पत्ता पुढील प्रमाणे आहे. प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, उपनिबंधक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिल्ह्यातील सर्व तालुके.

0000000
जिल्ह्यात हंगामात 108.30 टक्के पाऊस
           नांदेड, दि. 5 :- जिल्ह्यात  बुधवार 5 ऑक्टोंबर 2016 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात एकूण 54.23 मिलीमीटर पाऊस  झाला असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात सरासरी 3.39 मिलीमीटर पावसाची  नोंद  झाली  आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत सरासरी 1034.81 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  जिल्ह्याची यंदाच्या हंगामातील आतापर्यंत पावसाची टक्केवारी  108.30 इतकी झाली आहे.    
जिल्ह्यात बुधवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात  झालेला  पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुकानिहाय  पुढीलप्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- निरंक (1165.91), मुदखेड- 4.33 (856.35), अर्धापूर-निरंक (1106.00), भोकर-14.75 (1246.50), उमरी-निरंक (911.60), कंधार-निरंक (974.97), लोहा-0.50 (1248.67), किनवट-9.43 (1021.75), माहूर-2.00 (1235.50), हदगाव-00.29 (1079.41), हिमायतनगर-7.00 (920.64), देगलूर-निरंक (827.00), बिलोली-6.00 (1064.00), धर्माबाद-9.33 (888.71), नायगाव-0.60 (950.14), मुखेड-निरंक (1059.85) आज  अखेर  पावसाची सरासरी 1034.81 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 16557.00) मिलीमीटर आहे. 

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...