Thursday, April 16, 2020

बाहेरुन येणाऱ्या लोकांची जिल्हा सिमेवर तपासणी ;
विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्या हस्ते इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे वाटप

नांदेड दि. 16 :- इतर जिल्ह्यातून व राज्य सिमेवरुन कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण नांदेड जिल्हयात प्रवेश करु नये म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून नांदेड जिल्हयाच्या जिल्हा व राज्य सिमेवर लावण्यात आलेल्या 25 चेकपोस्टवर देण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे (ताप तपासणी उपकरण) वाटप नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केलेली असल्याने नांदेड जिल्हयाच्या सिमावर्ती भागातून नांदेड जिल्हयात विनाकारण कोणतेही वाहन व लोक प्रवेश न करण्यासाठी नांदेड जिल्हयाच्या सिमेवर 10 अंतर जिल्हा चेकपोस्ट व 15 अंतर राज्य सिमा बंद करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे या अंतर जिल्हयातून किंवा अंतर राज्यातून नांदेड जिल्हयात प्रवेश करणाऱ्या अत्यावश्यक सेवेमधील लोकांचे चेक पोस्टवर या मशीनने शरीराचे तापमान तपासणी करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हा सध्या कोरोना मुक्त असून बाहेर राज्यातून किंवा इतर जिल्हयातून येणाऱ्या लोकांना तपासण्यात येणार असून चेक करते वेळी कोणास तापाचे लक्षण असल्यास त्यांना नांदेड जिल्हयात प्रवेश नाकारला जाणार असल्याचे सांगितले आहे.

नांदेड जिल्हयातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये.

शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीचा कालावधी वाढविलेला असल्याने जनतेने त्यांच्या घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, बाळासाहेब देशमुख, किशोर कांबळे, मंदार नाईक, विलास जाधव, रमेश सरवदे, बी.मुदीराज, सुनिल पाटील व पोनि देशपांडे, चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.















सुधारित बातमी

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने
रक्तपेढीने  राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनांचे पालन करावे

नांदेड दि. 16 :- कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्तपेढीने घ्यावयाची काळजी याबाबत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन नांदेड जिल्हयातील रक्तपेढयांनी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त मा. ज. निमसे यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरावेळी (सोशल डिस्टंसिंगचे) सामाजिक अंतराचे तंतोतंत पालन करावे. परदेश प्रवासाचा इतिहास, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीशी संपर्क, कोरोना झालेल्या व्यक्ती यांच्याकडून केलेले रक्तदान शिबिरात तसेच रक्तपेढीत रक्त संकलित करू नये. रक्तसंकलानावेळी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे वापरापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करावे.

रक्तपेढीचे कर्मचारी, अधिकारी यांनी नियमितपणे साबणाने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करावे. रक्तपेढीचे काम करतेवेळेस हात मोजे व मास्क यांचा वापर करावा. रक्तपेढीत येणाऱ्या व्यक्तींना मास्क वापरण्यांची सक्ती करावी. त्यांच्या वापरासाठी रक्तपेढीच्या प्रवेशद्वारात हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे. रक्तदान शिबिराच्यावेळी याप्रमाणे सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

कोणत्याही परिस्थितीत शिबिराच्यावेळी गर्दी होणार नाही, याची पूर्ण दक्षता घ्यावी. कॅम्प ,जागा व परिसर स्वच्छ असावा. रक्तपेढीद्वारे कोविड-19 बाबत कॅम्पच्या ठिकाणी जनजागृती करावी. सध्या उन्हाळयाचे दिवस असल्याने रक्ताचा तुटवडा होऊ नये, यासाठी रक्तपेढयांने विशेष काळजी घेऊन अधिकाधिक रक्त संकलन करावे, असेही आवाहन जिल्हयातील सर्व रक्तपेढयांना करण्यात आले आहे.

गुटखा विक्री : दोघांविरुद्ध गुन्हा
नांदेड दि. 16 :- गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणारे कंधार भवानीनगर येथील राहुल बन्सीलाल व्यास व कंधार छोटी गल्ली येथील शेख मतीन शेख नजीर या दोघांनी मोटार सायकल क्र. एम.एच. 26, बि.एम. 6830 या वाहनाद्वारे कंधार तालुक्यातील कुरळा येथे प्रतिबंधीत अन्न पदार्थ 11 हजार 880 रुपयांचा साठ्याची विक्रीसाठी वाहतूक करत होते. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी या दोन्ही आरोपी विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणुक, वाहतुक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरटया पद्धतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची  विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाहीस समोर जावे लागेल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.    
00000


कोरोना विषाणू संसर्गाबाबत
 जिल्ह्यात दिलासादायक परिस्थिती
            नांदेड दि. 16 :- जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाच्या संसर्गाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसून ही नांदेड जिल्ह्यातील दिलासादायक परिस्थिती आहे. आतापर्यंत एकूण क्वारंटाईन असणाऱ्या नागरिकांची संख्या 556 आहे. यामधील क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेली 169 असून सध्या निरीक्षणाखाली असलेले 60 नागरिक आहेत. यापैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 नागरिक आहेत. तसेच घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 517 अशी संख्या आहे.
आज तपासणीसाठी 22 नागरिकांचे नमुने घेतले होते. आजपर्यंत एकुण 296 नमुने तपासणी झाली आहेत. यापैकी 226 नमुने निगेटीव्ह आले असून 65 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तसेच 5 नमुने  नाकारण्यात आली आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकूण प्रवासी 74 हजार 326 असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत. यामध्ये कंधार तालुक्यात- 9481, किनवट- 2526, देगलूर- 7195, धर्माबाद- 1505, बिलोली- 4413, लोहा- 4963, उमरी- 1938, हदगाव- 5982, भोकर- 2220, मुखेड- 11637, मुदखेड- 1780, अर्धापूर- 2356, माहूर-3437, हिमायतनगर- 1979, नायगाव- 6383, नांदेड तालुका- 2442 तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड- 4089 यानुसार जिल्ह्यात एकुण प्रवासी संख्या 74 हजार 326 एवढी आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.     
000000

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
आकाशवाणीवरुन श्रोत्याशी साधणार संवाद
नांदेड दि. 16 :- उद्या शुक्रवार 17 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वा. नांदेड आकाशवाणी केंद्रवरुन जिल्हाधिकारी डॉविपिन यांची मिलिंद व्यवहारे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनावैद्यकीय  सुविधाकायदा सुव्यवस्था आणि इतर केलेल्या उपाययोजना, नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयीची  माहितीपर मुलाखत  प्रसारित होणार आहे.
नांदेड जिल्ह्यासह परभणीहिंगोलीउमरखेडबीडलातूर या जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच तेलंगणा या राज्याच्या सीमावर्ती भागातील काही भागांमध्ये ही मुलाखत नागरिकांना ऐकायला मिळणार आहे. सुमारे 40 लाख श्रोत्यांपर्यत आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम पोहोचत असून या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासन कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करीत असलेल्या कार्याची  माहिती देण्यासाठी आकाशवाणी नांदेड केंद्रवरुन संवाद साधणार आहेत. श्रोत्यांनी या संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन  करण्यात आले आहे.
000000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...