Thursday, April 16, 2020

बाहेरुन येणाऱ्या लोकांची जिल्हा सिमेवर तपासणी ;
विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्या हस्ते इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे वाटप

नांदेड दि. 16 :- इतर जिल्ह्यातून व राज्य सिमेवरुन कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण नांदेड जिल्हयात प्रवेश करु नये म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून नांदेड जिल्हयाच्या जिल्हा व राज्य सिमेवर लावण्यात आलेल्या 25 चेकपोस्टवर देण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे (ताप तपासणी उपकरण) वाटप नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केलेली असल्याने नांदेड जिल्हयाच्या सिमावर्ती भागातून नांदेड जिल्हयात विनाकारण कोणतेही वाहन व लोक प्रवेश न करण्यासाठी नांदेड जिल्हयाच्या सिमेवर 10 अंतर जिल्हा चेकपोस्ट व 15 अंतर राज्य सिमा बंद करण्यात आलेले आहे. या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनचे या अंतर जिल्हयातून किंवा अंतर राज्यातून नांदेड जिल्हयात प्रवेश करणाऱ्या अत्यावश्यक सेवेमधील लोकांचे चेक पोस्टवर या मशीनने शरीराचे तापमान तपासणी करण्यात येणार आहेत. नांदेड जिल्हा सध्या कोरोना मुक्त असून बाहेर राज्यातून किंवा इतर जिल्हयातून येणाऱ्या लोकांना तपासण्यात येणार असून चेक करते वेळी कोणास तापाचे लक्षण असल्यास त्यांना नांदेड जिल्हयात प्रवेश नाकारला जाणार असल्याचे सांगितले आहे.

नांदेड जिल्हयातील नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वासू ठेवू नये.

शासनाने लॉकडाऊन व संचारबंदीचा कालावधी वाढविलेला असल्याने जनतेने त्यांच्या घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) डॉ. धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के, धनंजय पाटील, बाळासाहेब देशमुख, किशोर कांबळे, मंदार नाईक, विलास जाधव, रमेश सरवदे, बी.मुदीराज, सुनिल पाटील व पोनि देशपांडे, चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी रामेश्वर कायंदे व अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.















No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...