Thursday, November 18, 2021

 जिल्हास्तरीय समितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका), दि. 18 :- राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती स्थापन करावयाची असल्याने सदर समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदाकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे. 

या समितीच्या अध्यक्ष पदासाठी नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजातील व्यक्ती, तर सदस्य म्हणून विमुक्त जाती प्रवर्गातील 1 व्यक्ती, भटक्या जामाती प्रवर्गातील 1 व्यक्ती आणि विमुक्ती जाती / भटक्या जमाती प्रवर्गातील 1 महिला सदस्य यांच्याकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात येत आहे. 

या प्रस्तावासोबत त्यांनी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक कार्याचे वर्तमानपत्रातील कात्रणे व इतर अनुषंगिक कागदपत्रे जोडून सदर समिती अध्यक्ष व सदस्य पदासाठी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

0000000

 नांदेड जिल्ह्यात 8 व्यक्ती कोरोना बाधित तर 4 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 709 अहवालापैकी 8 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 457 एवढी झाली असून यातील 87 हजार 777 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 27 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, परभणी 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, हिंगोली 1 असे एकुण 8  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 4 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 27 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालयात 3 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 66 हजार 671

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 62 हजार 800

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 457

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 777

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-27

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 कौमी एकता सप्ताहात 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ 

नांदेड (जिमाका) दि. 18 :- कौमी एकता सप्ताह हा 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या 16 नोव्हेंबर रोजीच्या शासन शुद्धीपत्रकानुसार यावर्षी दिनांक 19 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखाली सर्व कार्यालय प्रमुखांना सूचना द्याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास व जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

0000

 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्याचे निर्देश   

नांदेड (जिमाका) दि. 18 :- भारतीय संविधानाची नागरिकांना माहिती असावी व त्यासंबंधी जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी हा दिवस साजरा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी  दिले आहेत. 

या दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन शासकीय कार्यालये, महामंडळे, शाळा, महाविद्यालये इत्यादी ठिकाणी करण्यात यावे. तसेच वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित कराव्यात. विद्यापीठामधून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात यावे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाची ओळख व्हावी यासाठी संविधानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रभात फेऱ्यांचे आयोजन करावे. संविधानातील महत्वाची कलमे ठळकरित्या दिसतील असे बॅनर्स, पोस्टर्स वापरण्यात यावे. 

जिल्ह्यात कोविड-19 चा प्रादुर्भाव असल्यामुळे सुरक्षा उपाययोजनाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करूनच कार्यक्रमाचे आयोजन सर्व विभाग प्रमुखांनी करावे, असेही निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत.

0000

 राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा 16 जानेवारी रोजी घेण्यात येणार 

नांदेड (जिमाका), दि. 18 :- इयत्ता दहावीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेमार्फत राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती (NTS) परीक्षा राज्यस्तर ही 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज परिषदेच्या www.mscepune.in  http://ntsemsce.in या संकेतस्थळावर 16 नोव्हेंबरपासून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा.) प्रशांत दिग्रसकर यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. सर्व शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करणे बंधनकारक असल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...