Tuesday, September 25, 2018


आस्थापनांनी कर्मचाऱ्यांची
माहिती सादर करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25 :- मासिक वेतन सप्टेंबर 2018 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आवाहन असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी केले आहे.
माहिती बाबतचे सप्टेंबर 2018 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र बुधवार 31 ऑक्टोंबर 2018 पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी केले आहे.
000000



अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचा लिलाव
नांदेड, दि. 25 :- मोटार वाहन कायदा उल्लंघन करताना आढळलेली व अटकावून ठवेलेल्या वाहनाच्या मालकास थकीत कर व दंड भरण्याबाबत नोटीस देण्यात आल्या तसेच विना दावा केलेल्या कर व दंड भरणा न केल्याने सदर वाहनांचा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जाहीर लिलाव 11 ऑक्टोंबर 2018 रोजी दुपारी 1 वा. करण्यात येणार आहे. अधिक माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.  
000000


मुग, उडीद, सोयाबीनची आधारभूत दराने खरेदी;  
शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन  
नांदेड, दि. 25 :- राज्यात खरीप हंगाम 2018-19 मध्ये विविध जिल्ह्यात नाफेड या संस्थेच्यावतीने मुग, उडीद व सोयाबीन खरेदीची केंद्रे सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्रे शासनाच्या आधारभूत दराने करण्यात येणार आहे. सर्व खरेदी नलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी ज्या तालुक्यात त्यांची जमीन आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
मुग, उडीद व सोयाबीनचे आधारभूत दर खालील प्रमाणे आहेत :-
तपशिल
आधारभूत दर हंगाम 2018-19
नोंदणी कालावधी
मुग
6975/-
25/09/2018 ते 09/10/2018
उडीद
5600/-
25/09/2018 ते 09/10/2018
सोयाबीन
3399/-
01/10/2018 ते 31/10/2018

नोंदणीचा प्रारंभिक कालावधी 15 दिवसांचा असेल. तसेच अपवादात्मक प्रकरणी त्यांनतर आलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जाची नोंदणी खरेदी सुरु झाल्याच्या पहिल्या 15 दिवसांत करण्यात येईल. त्यानंतर नोंदणी होणार नाही. नोंदणीकरिता आधारकार्डची प्रत व मुग/उडीद/सोयाबीन या पिकानोंद असलेला 7/12 उतारा सादर करावयाचा आहे. शेतकऱ्याचा कार्यरत असलेला मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर द्यावयाचा आहे.  नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार माल आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. शेतकऱ्यांनी ज्या केंद्रावर नोंदणी केलेली आहे. त्याच केंद्रावर माल आणावयाचा आहे. एसएमएस शिवाय आणलेला माल परत पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी एफएक्यु दर्जाचा माल म्हणजेच काडीकचरा नसलेला, चाळणी करुन व सुकवून 12 % पेक्षा जास्त आर्द्रता नसलेला माल आणावा. तसा माल नसल्यास परत पाठविण्यात येईल.
खरेदी संस्था माल आणल्यानंतर खालील बाबी तपासून त्याची होत असेल तरच खरेदी बाबत निर्णय घेईल:- शेतकरी नोंदणीकृत आहे किंवा कसे, एसएमएस दिल्यानंतर माल आणला किंवा कसे, शासनाने निश्चित केलेल्या उत्पादकतेनुसार व खरेदीच्या मर्यादेनुसार माल आणला किंवा कसे, 7/12 च्या पिकपेऱ्याची नोंद, खरेदी करावयाच्या पिकाची नोंद आहे किंवा कसे, गुणवत्ता नियंत्रकाच्या मते माल एफएक्यु दर्जाचा आहे किंवा कसे, इलेक्ट्रनिक वजनकाट्यावर मोजणी झाल्यानंतर मालाची नोंद वजनासह करुन काटापट्टी शेतकऱ्यांना देण्यात येईल. खरेदी केलेल्या मालाची एनईएमएल पोर्टलवर त्याच दिवशी नोंद करण्याचे बंधन सबएजन्ट / खरेदी संस्थेवर राहील. शेतकऱ्यांना शेतमालाची रक्कम त्यांच्या आधार कार्डाशी संलग्न बँक खात्याद्वारेच देण्यात येईल. त्यामुळे आपले बॅक खाते आधार कार्डशी संलग्न  असल्याची त्यांनी खात्री करावी.पोर्टलवर नोंदविलेल्या पिकाखालील क्षेत्राची 7/12 व स्थळ पाहणी करुन महसुल व कृषि विभागाकडून पडताळणी करण्यात  येईल. या योजनेचा लाभ सर्व शेतकरी बांधवानी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000


 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी
15 ऑक्टोंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत
नांदेड, दि. 25 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज 15 ऑक्टोंबर पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड येथे कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागाकडुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी  शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणन भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये खालील प्रमाणे रक्कम थेट वितरीत करण्यात येणार आहे. खर्चाची बाब नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरातील महाविद्यालये / क्षणिक संस्था याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम पुढील प्रमाणे आहे. भोजन भत्ता- 28 हजार. निवास भत्ता-15 हजार. निर्वाह भत्ता- 8 हजार रुपये याप्रमाणे प्रति विद्यार्थी एकुण 51 हजार रुपये देय रक्कम राहील. या रकमेव्यतिरीक्त वैद्यकीय अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष 5 हजार रुपये अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2 हजार रुपये इतकी शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकष - विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा.
शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांस इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी, पदवीकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असेलली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करावा.
विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के जास्त असणे बंधनकारक असेल. अर्जाचा नमुना, आवश्यक कागदपत्रे व संकेतस्थळ- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना खालील संकेतस्थळात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. गरजु विद्यार्थ्यानी तो संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावा. संकेतस्थळ http:sjsa.maharashtra.gov.in & http://maharashtra.gov.in योजनेच्या अटी व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्राची यादी संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जासोबत जोडली आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड येथे कार्यालयीन 02462-220277 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क  साधावा, असेही आवाहन केले आहे.
000000


स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत
माजी सैनिकांचा जाहूर येथे गुरुवारी मेळावा  
नांदेड, दि. 25 :- स्वच्छता ही सेवा अभियान पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने माजी सैनिकांचा स्वच्छता जागरुकता मेळावा गुरुवार 27 सप्टेंबर रोजी मुखेड तालुक्यातील जाहूर येथे सकाळी 10 वा. आयोजित केला आहे. माजी सैनिकांनी जाहूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.  
महात्मा गांधी यांची 150 वी जयंती निमित्त  संपुर्ण देशात  स्वच्छता अभियान ही मोहीम 15 सप्टेंबर 2018 ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड यांच्यावतीने जिल्हयातील माजी सैनिकांना या अभियानात समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक तालूक्यातील  माजी सैनिक  संघटनेच्यावतीने  हे अभियान राबविण्यात येत आहे. जाहूर येथील  मेळाव्यात जिल्हयातील सर्व माजी सैनिकांनी सहभागी होउन स्वच्छतेविषयीची  शपथ घेणे, आपल्या गावातील परिसर स्वच्छता विषयी कार्यक्रमाचे आयोजन करणे व हा कार्यक्रम निरंतर पुढे सुरु ठेवण्याविषयी  मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.   
यावेळी  नांदेड ईसीएचएस अधिकारी मेजर बिक्रमसिंह थापा,  सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक कमलाकर शेटे, जाहूर गावचे सरपंच माजी सैनिक नामदेव पाटील,  माजी सैनिक सार्जेन्ट संजय पोतदार, पठाण हयुन, व्यंकट देशमुख, देगलूर सुभे. हिंगोले, माजी सैनिक रमेश कांबळे,  कंधार येथील उत्तम केन्द्रे आदी उपस्थित राहणार आहेत. 
00000


लोककला आणि पथनाट्य निवडसुचीसाठी
नांदेड येथे शनिवारी मुलाखतीचे आयोजन
नांदेड, दि. 25 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने लोककला आणि पथनाट्य सादर करणाऱ्या कलापथक / संस्थांची निवडसूची तयार करण्यासाठी इच्छूकांकडून 15 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. गठीत निवड समितीकडून नांदेड जिल्ह्यातील पात्र अर्जानूसार संस्थांच्या प्रमुखांच्या मुलाखतीचे आयोजन शनिवार 29 सप्टेंबर 2018 रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे करण्यात आले आहे. पात्र अर्जदार पथकाच्या प्रतिनिधींना नोंदणी, कागदपत्रे तपासणीची कार्यवाही व मुलाखतीसाठी पत्राद्वारे निमंत्रित करण्यात आले आहे. तरी त्यानुसार मुळ कागदपत्रासह दुपारी 1  वा. संबंधितांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले आहे.
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...