आस्थापनांनी
कर्मचाऱ्यांची
माहिती सादर
करण्याचे आवाहन
नांदेड दि. 25
:- मासिक वेतन सप्टेंबर 2018 चे देयक दाखल करताना सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालयांना तसेच खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र नांदेड यांचेकडे आपल्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची माहिती सादर
करावी, असे आवाहन असे सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेड यांनी
केले आहे.
माहिती बाबतचे सप्टेंबर 2018 अखेरचे इ-आर-1 त्रैमासिक विवरणपत्र बुधवार 31
ऑक्टोंबर
2018
पर्यंत भरावयाची मुदत आहे. www.mahaswayam.gov.in ऑनलाईन इ.आर-1 भरुन
दिल्याचे ऑनलाईनचे प्रमाणपत्र देयकासोबत जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय वेतन देयके
स्विकारले जाणार नाहीत याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
सर्व कार्यालयांना
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयामार्फत युजर आयडी व
पासवर्ड यापुर्वीच कळविण्यात आले आहेत. तसेच सर्व कार्यालयांनी आपले ई-मेल आयडी व
फोन नंबर, पत्ता टाकून आपली प्रोफाईल अपडेट करावी, असेही आवाहन सहायक संचालक यांनी
केले आहे.
000000
No comments:
Post a Comment