Saturday, April 10, 2021

निजामकालीन संक्रमण काळातील अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो - पालकमंत्री अशोक चव्हाण

 


निजामकालीन संक्रमण काळातील अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

नांदेड (जिमाका) दि. 10 :- निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्ती मिळावी यासाठी  जो मराठवाडा मुक्ती संग्राम झाला, त्या संक्रमण काळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून, एक साक्षीदार म्हणून जेष्ठ साहित्यिक तु.ष. कुलकर्णी यांच्याकडे पाहिले जायचे. मराठी साहित्याच्या कवितेपासून ललित लेखनापर्यंत व समिक्षेचाही प्रांत त्यांनी समन्वयाच्या भुमिकेतून हाताळत मराठी साहित्यात वेगळी प्रतिभा निर्माण केली. नांदेड येथील रहिवासी असल्याने स्वाभाविकच त्यांचा सर्वांना अभिमान राहिला. प्रज्ञा भास्कर आचार्य नरहर कुरुंदकर , जेष्ठ संपादक स्व. अनंतराव भालेराव, वा. ल. कुलकर्णी, स.मा.गर्गे अशा मराठवाड्यातील सारस्वतांच्या प्रवाहातील ते एक प्रवाही व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने निजामकालिन संक्रमण काळातील अभ्यासू साक्षीदाराला आपण मुकलो आहोत. या शब्दात नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शोक संदेशात आपल्या भावना व्यक्त केले आहेत.

00000

 

 

 

 

 

10 एप्रिलपासून खालील बाबींना असेल परवानगी

                                       10 एप्रिलपासून खालील बाबींना असेल परवानगी

 

नांदेड, (जिमाका) दि. 10 :- आपत्ती विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गंत दि. 5 व 6 एप्रिल च्या आदेशान्वये नांदेड जिल्ह्यात 5 एप्रिलपासून सायंकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी आदेश लागू करण्यात आले. यांची मुदत 30 एप्रिल च्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या 9 एप्रिलच्या आदेशान्वये कोविड-19 विषाणुच्या संक्रमन खंडीत करण्याच्या जागेवर पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच यापुर्वीच्या आदेशात नमूद करण्यात आलेल्या प्रतिबंधित /बंद क्षेत्र व सूट/ वगळण्यात आलेले क्षेत्र कायम ठेवण्यात आलेले आहेत.

 

आरटीपीसीआर चाचणी आयोजित करण्याच्या संदर्भात सार्वजनिक परिवहन/खाजगी वाहतूक/चित्रपट, मालिका, जाहिराती, घरपोच सेवेशी संबंधित कर्मचारी,परीक्षा घेणारे कर्मचारी , लग्नाच्या ठिकाणी कर्मचारी, यासह विविध क्षेत्राकरिता लसीकरण न करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी 15 दिवसांची मुदत आहे. अंत्यसंस्कार स्थळावर, खाण्यायोग्य विक्रेते, कामगार/उत्पादन क्षेत्रातील कर्मचारी, ई-कॉमर्स कर्मचारी, परवानगी असलेल्या बांधकाम कार्यात सहभागी कर्मचारी, आरबीआय आणि आरटीपीसीआर चाचणी आवश्यक असणाऱ्या आदेशात नमूद केलेल्या इतर कोणत्याही क्षेत्रात आरटीपीसीआर चाचणीला एक पर्याय म्हणून रॅपीड ॲटीजन टेस्टला परवानगी दिली जात आहे. हे आदेश 10 एप्रिल पासून अंमलात येतील. आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र, सेतु केंद्र, पासपोर्ट सेवा केंद्र इत्यादी जे शासकीय सेवेसाठी एक खिडकी योजना अंतर्गत सेवा पुरवितात ते केंद्र सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील.

 

वर्तमानपत्राच्या संज्ञेमध्ये मासिके, जर्नल्स आणि नियतकालिके यांचा समावेश राहील. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंध कायदा 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र ठरतील असे जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 759 व्यक्ती कोरोना बाधित 27 जणांचा मृत्यू जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

                                                नांदेड जिल्ह्यात 1 हजार 759 व्यक्ती कोरोना बाधित

27 जणांचा मृत्यू

जनसहयोगातून आरोग्य जागराच्या मोहिमेत सहभाग घ्या

नांदेड (जिमाका) दि. 10 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 6 हजार 37 अहवालापैकी 1 हजार 759 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 685 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 हजार 74 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 55 हजार 751 एवढी झाली असून यातील 42 हजार 762 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 11 हजार 687 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने अधिक सुरक्षितता बाळगून शासनाने वेळोवेळी जाहिर केलेल्या आदेशाचे पालन करणे सर्वांच्या हिताचे आहे. आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 6 ते 9 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 27 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 50 एवढी झाली आहे.   दिनांक 6 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पुणेगाव नांदेड येथील 65 वर्षाचा पुरुष, मुदखेड तालुक्यातील इजळी येथील 85 वर्षाची महिला, सिडको नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील 35 वर्षाची महिला, नायगाव येथील 74 वर्षाची महिला, धनेगाव नांदेड येथील 46 वर्षाचा पुरुष , तेहरानगर नांदेड येथील 35 वर्षाचा पुरुष, उमरी येथील 30 वर्षाचा पुरुष, खडकपुरा येथील 70 वर्षाचा पुरुष, नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, 7 एप्रिल रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे गोकुळनगर देगलूर येथील 50 वर्षाचा पुरुष, व्हिजन कोविड रुग्णालय येथे नायगाव तालुक्यातील हंगरगा  येथील 79 वर्षाचा पुरुष, 8 एप्रिल रोजी हदगाव कोविड रुग्णालय येथे हिमायतनगर तालुक्यातील चाकरी येथील 64 वर्षाची महिला, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे मंत्री नगर नांदेड येथील 74 वर्षाचा पुरुष यशोसाई रुग्णालय नांदेड येथे जुना कौठा नांदेड येथील 79 वर्षाचा पुरुष,  व्हिजन कोविड रुग्णालय येथे देगलूर तालुक्यातील वझर येथील 55 वर्षाचा पुरुष, 9 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे प्रभात नगर नांदेड येथील 74 वर्षाची महिला, अर्धापूर येथील 58 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील 71 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 66 वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर नांदेड येथील 64 वर्षाची महिला, देगलूर कोविड रुग्णालय येथे सुगाव येथील 58 वर्षाचा पुरुष, कोत्तेकल्लूर येथील 64 वर्षाचा पुरुष, भगवती कोविड रुग्णालय येथे कौठा येथील 83 वर्षाचा पुरुष असे एकूण 27 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 314 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 20, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 870, कंधार तालुक्याअंतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालय 24, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 24, खाजगी रुग्णालय 125जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 17नायगाव तालुक्याअंतर्गत  47 मुखेड कोविड रुग्णालय 41अर्धापूर तालुक्याअंतर्गत  19शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 20हदगाव कोविड रुग्णालय 18माहूर तालुक्याअंतर्गत  3धर्माबाद तालुक्याअंतर्गत  10लोहा तालुक्याअंतर्गत  38बिलोली तालुक्यातर्गंत 34 असे एकूण 1 हजार 314 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 330, देगलूर 1कंधार 39मुदखेड 2हिंगोली 5नांदेड ग्रामीण 14धर्माबाद 30किनवट 1मुखेड 31, , अर्धापूर 21हदगाव 28लोहा 32नायगाव 1भोकर 52हिमायतनगर 33परभणी 1, लातूर 1, उमरी 47, बिलोली 16 असे एकूण 685 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 389, बिलोली 85हिमायतनगर 1मुदखेड 25कंधार 49नांदेड ग्रामीण 55देगलूर 54किनवट 97मुखेड 30नायगाव 35अर्धापूर 74 धर्माबाद 19लोहा 48उमरी 39हिंगोली 1भोकर 52हदगाव 15परभणी 5,अहमदनगर 1 असे एकूण 1 हजार 74 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 11 हजार 687 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 262, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 118, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 221, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 171, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 188, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 196, देगलूर कोविड रुग्णालय 54, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 134बिलोली कोविड केअर सेंटर 336हिमायतनगर कोविड केअर सेंटर 25नायगाव कोविड केअर सेंटर 107, उमरी कोविड केअर सेंटर 20, माहूर कोविड केअर सेंटर 22, भोकर कोविड केअर सेंटर 20, हदगाव कोविड रुग्णालय 37, हदगाव कोविड केअर सेंटर 98, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 126, कंधार कोविड केअर सेंटर 31धर्माबाद कोविड केअर सेंटर 110मुदखेड कोविड केअर सेंटर 11अर्धापूर कोविड केअर सेंटर 41, बारड कोविड केअर सेंटर 45, मांडवी कोविड केअर सेंटर 14, महसूल कोविड केअर सेंटर 105, एनआरआय कोविड केअर सेंटर 121, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 146, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 812, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 610खाजगी रुग्णालय 1 हजार 506 असे एकूण 11 हजार 687 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 68 हजार 294

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 6 हजार 296

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 55 हजार 751

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 42 हजार 762

एकुण मृत्यू संख्या-1050

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.70 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-72

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-389

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 हजार 687

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...