Friday, March 26, 2021

 

नांदेड जिल्ह्यात आज 970 व्यक्ती कोरोना बाधित

14 जणांचा मृत्यू

नांदेड (जिमाका) दि. 26 :- नांदेड जिल्ह्यात गुरुवार 26 मार्च रोजी 970 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल 4 हजार 275 तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 369 तर अँटिजेन तपासणीद्वारे 601 अहवाल बाधित आहेत. आजचे 970 बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 37 हजार 525 एवढी झाली आहे. 

बुधवार 24 मार्च रोजी मुखेड तालुक्यातील हसनल येथील 60 वर्षाचा पुरुष, देगलूर तालुक्यातील अंतापूर येथील 55 वर्षाचा पुरुष तर गुरुवार 25 मार्च रोजी भगवाननगर नांदेड येथील 52 वर्षाचा पुरुष, कौठा नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 45 वर्षाची माहिला, शिवाजी चौक लोहा येथील 60 वर्षाच्या महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर मोंढा नांदेड येथील 55 वर्षाचा पुरुष, शुक्रवार 26 मार्च रोजी दत्तनगर नांदेड येथील 70 वर्षाची महिला, माहूर तालुक्यातील हिवळनी येथील 62 वर्षाचा पुरुष, विनायकनगर नांदेड येथील 80 वर्षाचा पुरुष, इतवारा नांदेड येथील 75 वर्षाचा पुरुष, तिरुमलानगर नांदेड येथील 68 वर्षाच्या पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर 24 मार्च रोजी अंबिकानगर नांदेड येथील 59 वर्षाचा पुरुष व 25 मार्च रोजी लेबर कॉलनी नांदेड येथील 61 वर्षाच्या महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 697 एवढी झाली आहे. 

आजच्या 4 हजार 275 अहवालापैकी 2 हजार 442 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 37 हजार 525 एवढी झाली असून यातील 27 हजार 880 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 8 हजार 715 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 93 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 21, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 381, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 15, कंधार तालुक्यांतर्गत 5, मुखेड कोविड रुग्णालय 17, देगलूर कोविड रुग्णालय 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत 8, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 35, हदगाव कोविड रुग्णालय 14, किनवट कोविड रुग्णालय 2, बिलोली तालुक्यांतर्गत 5, उमरी तालुक्यांतर्गत 2, माहूर तालुक्यांतर्गत 2, खाजगी रुग्णालय 35 असे एकूण 552 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 211, लोहा तालुक्यात 25, कंधार 21, मुदखेड 16, लातूर 1, नांदेड ग्रामीण 23, देगलूर 4, भोकर 3, नायगाव 3, हिंगोली 2, बारड 1, धर्माबाद 5, बिलोली 1, हिमायतनगर 1, यवतमाळ 1, हदगाव 38, मुखेड 6, किनवट 6, उमरी 1 असे एकूण 369 बाधित आढळले. 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 340, नांदेड ग्रामीण 18, अर्धापूर 14, भोकर 13, बिलोली 13, हिमायतनगर 5, माहूर 11, उमरी 13, देगलूर 16, कंधार 11, मुदखेड 1, वाशीम 1, धर्माबाद 9, किनवट 41, मुखेड 24, मुंबई 1, हदगाव 35, लोहा 17, नायगाव 18 असे एकूण 601 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 8 हजार 715 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 234, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 100, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 90, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 174, देगलूर कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, जैनम-देगलूर कोविड केअर सेंटर 87, बिलोली कोविड केअर  सेंटर 143, नायगाव कोविड केअर सेंटर 53, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 38, भोकर कोविड केअर सेंटर 3, हदगाव कोविड रुग्णालय 61, लोहा कोविड रुग्णालय 116, कंधार कोविड केअर सेंटर 23, महसूल कोविड केअर सेंटर 121, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, धर्माबाद कोविड केअर सेंटर 52, मुदखेड कोविड केअर सेंटर 28, अर्धापूर कोविड केअर सेंटर 50, बारड कोविड केअर सेंटर 15, मांडवी कोविड केअर सेंटर 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 5 हजार 31, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 588, खाजगी रुग्णालय 482, लातूर येथे संदर्भीत 1 आहेत. 

शुक्रवार 26 मार्च 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 9, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 93 हजार 255

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 49 हजार 521

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 37 हजार 525

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 27 हजार 880

एकुण मृत्यू संख्या-697

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.29 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-20

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-69

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-8 हजार 715

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-93. 

शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसारअली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

00000

 

 

 

विषय शिक्षकांसाठी प्रशिक्षण

28 मार्चपर्यंत ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 26 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या क. महाविद्यालय व उच्च माध्यमिक इयत्ता 11 वी व 12 वीच्या विषय शिक्षकांसाठी शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण घेणे सर्व संबंधित शिक्षकांना अनिवार्य आहे.   

या प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविदयालयातील सर्व विषय शिक्षकांची ऑनलाईन नाव नोंदणी करुन घेण्यात येत आहे. उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी प्रशिक्षणास प्रविष्ठ होण्यासाठी मंडळाच्या evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रात/ फार्म मध्ये आपली माहिती 28 मार्च 2021 पर्यंत भरावयाची आहे. त्यानंतर लगेच प्रशिक्षणाचे आयोजन केले जाईल. 

उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी इयत्ता बारावी मुल्यमापन आराखडा व तद्नुषंगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विहित मुदतीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

आरोग्य आणि शारीरीक शिक्षण (विषय सांकेतांक-30), चित्रकला (विषय सांकेतांक-57), संकल्पचित्र व रंगकाम (विषय सांकेतांक-58), चित्रात्मक संकल्प (विषय सांकेतांक-59), कलेचा इतिहास व रसग्रहण (विषय सांकेतांक-60), भारतीय संगीताचा इतिहास व विकास (विषय सांकेतांक-65), कंठ सुगम संगीत (विषय सांकेतांक-66), संठ शास्त्रीय संगीत (विषय सांकेतांक-67), वाद्यसंगीत (विषय सांकेतांक-68), तालवाद्य  (विषय सांकेतांक-69) या विषयांच्या विषय शिक्षकांसाठी हे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

00000

 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय रुग्णालयात

खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु

नांदेड (जिमाका) दि 26:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात कोविड-19 चौकशी कक्ष 24 तासासाठी सुरु करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार असून येथील दूरध्वनी क्रमांक 02462-229221 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती येथे उपलब्ध करुन दिली जाईल. 

जिल्ह्यासह, शहरातील तसेच इतर ठिकाणाहून किंवा रुग्णालयातून संदर्भीत होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी 02462-229221 या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क करुन खाटा उपलब्ध असल्यास रुग्णाला येथे संदर्भीत करावे. रुग्ण संदर्भीत करतांना रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्यास संदर्भीत करणाऱ्या रुग्णालयाने सांगावे जेणेकरुन रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देता येईल. कोरोनामुळे मृत्त पावलेल्या व्यक्तीच्या देहाच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे यांचा भ्रमणध्वी क्रमांक 9527895183 येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषधवैकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी केले आहे.

00000

 

नांदेडमध्ये पुरेसे बेड उपलब्ध
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि 26:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड-19 रूग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन केले असून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात असून याला लागणारी पुरेशी व्यवस्था याबाबत नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सिद्ध असून जनतेने आरोग्याची त्रीसूत्री काटेकोर पाळावी असे आवाहन त्यांनी केले. 

बेडसंदर्भात अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पुरेशा बेडसह औषध व इतर उपचार साहित्याची नांदेड जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धी आहे. मी स्वत: विविध हॉस्पिटलला जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आलो आहे. काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आवश्यकता नसतांना अनेकांनी दवाखाण्यातील बेड अडवून ठेवले आहेत. केवळ भितीपोटी जर कोणी हे कृत्य करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. मी अनावश्यक जे दवाखाण्यात भरती झाले आहेत त्यांना घरी उपचार घेण्यास सांगून 10 ते 12 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देऊन आलो आहे. त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार होणे शक्य असल्याची खातरजमा घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जनतेने आजार न लपविता सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. माञ कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करणे यातच हित असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...