Friday, March 26, 2021

 

नांदेडमध्ये पुरेसे बेड उपलब्ध
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही
- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि 26:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोविड-19 रूग्णांची संख्या वाढत आहे. ही संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन केले असून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य विभागाकडून वेळोवेळी सर्व बाबींचा आढावा घेतला जात असून याला लागणारी पुरेशी व्यवस्था याबाबत नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सिद्ध असून जनतेने आरोग्याची त्रीसूत्री काटेकोर पाळावी असे आवाहन त्यांनी केले. 

बेडसंदर्भात अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पुरेशा बेडसह औषध व इतर उपचार साहित्याची नांदेड जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्धी आहे. मी स्वत: विविध हॉस्पिटलला जाऊन भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आलो आहे. काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर दबाव आणून आवश्यकता नसतांना अनेकांनी दवाखाण्यातील बेड अडवून ठेवले आहेत. केवळ भितीपोटी जर कोणी हे कृत्य करत असेल तर त्याचे समर्थन करता येणार नाही. मी अनावश्यक जे दवाखाण्यात भरती झाले आहेत त्यांना घरी उपचार घेण्यास सांगून 10 ते 12 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देऊन आलो आहे. त्यांच्यावर सहजपणे घरी उपचार होणे शक्य असल्याची खातरजमा घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जनतेने आजार न लपविता सौम्य लक्षणे आढळली तरी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहून उपचार करवून घ्या. आवश्यकता असल्यास आपल्याला रूग्णालयात दाखल करून घेऊन उपचार केले जातील. अनावश्यक काळजी करू नका. माञ कोरोनापासून बचावासाठी मास्क वापरणे, इतरांपासून शारिरीक अंतर राखणे आणि सतत सॅनिटायजरचा वापर करणे यातच हित असल्याचे त्यांनी सांगितले.

00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...