Thursday, October 6, 2022

 उर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूर धरणातून

रब्बी हंगामात पाणी पाळी साठीच्या उपाययोजना

 

नांदेड, (जिमाका) दि. 6:- इसापूर धरणांचे मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ऑक्टोंबर अखेर धरणाची पाणीपातळी 441 मी (100 टक्के) ठेवण्याचे निर्धारीत आहे. धरणात 15 ऑक्टोंबर 2022 रोजी 100 टक्के पाणी साठा होणार असूनउपलब्ध पाणीसाठ्याच्या अनुषंगाने उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात रब्बी व उन्हाळी हंगाम पुर्ण क्षमतेने राबविण्याचे नियोजन आहे. या नियोजनास कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पुढील पाणीपाळी सोडण्याची कार्यवाही करण्यात येईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या (इसापूर धरणाच्या) लाभ क्षेत्रांतर्गत नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व लाभधारकांनी यांची नोंद घ्यावी असे असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता अ.बा.जगताप यांनी कळविले आहे.

 

हंगाम सुरु होण्यापूर्वी पुढील अटी व शर्तीची पुर्तता होणे आवश्यक आहे. रब्बी हंगामीदुहंगामी व इतर बारमाही पिकांसाठी कालव्याचे प्रवाही/मंजूर उपसा/मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी/नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे. त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहित नमुन्यात 31 ऑक्टोंबर 2022 पुर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरुन सादर करावेत. पिकाचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसार पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकांस सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रीक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामूळे पाणी नदी नाल्यास वाया जावुन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास कार्यालयाची जबाबदारी राहणार नाही. सन 2022-23 च्या शासन निर्णयातील प्रचलित दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरावी. शेत चारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभ धारकांची राहील. उडाप्याच्या/अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरु असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारीट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा करणे अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जे लाभक्षेत्र पाणी वापर संस्थेस हस्तांतरीत करण्यात आले आहे त्या लाभक्षेत्रावर नियमानुसार पाणी मागणीवसुली आणि सिंचनाचे नियंत्रण पाणी वापर संस्थेने करावे अन्यथा पाणी पुरवठा केला जाणार नाही असे उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 1 चे कार्यकारी अभियंता कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

वृत्त

 शिपाई पदासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- सहाय्यक संचालकनगररचना कार्यालयात वर्ग-4 शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्य यंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्या कडून कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता आहे.  मान्यताप्राप्त संस्था / कंपनीकडून या कार्यालयास एक (1)वर्ग-4 शिपाई पदासाठी (किमान 4 थी पास असणे आवश्यक आहे. ) उमेदवारांची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत.

 

दरपत्रके सिलबंद पाकीटात बातमी प्रसिध्दी झाल्यापासून दहा दिवसाच्या आत कार्यालयीन वेळेत कार्यालयाकडे पोहचतील याबेताने पाठवावेत. प्राप्त दरपत्रके दुसऱ्याच दिवशी सकाळी 11.30 वा. उघडण्यात येईल. अटी व शर्ती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेल्या आहेत. संबंधितानी सहायक संचालकनगररचनानांदेड शाखा कार्यालयनांदेड श्री. घोडजकर इमारतदुसरा मजलामहाराणा प्रताप चौकगांधी नगरहिंगोली नाका नांदेड -431605 या पत्त्यावर संपर्क साधावाअसे आवाहन नगर रचना विभागाचे सहायक संचालक प. ला. आलूरकर यांनी केले आहे.

00000

 जिल्ह्यातील 376 गायवर्ग पशुधनाला लम्पी बाधा

लाख 75 हजार 839 पशुधनाचे लसीकरण

नांदेड (जिमाका) दि. 6 :- लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत व्यापक लसीकरणावर भर देण्यात आला आहे. आजच्या घडीला लाख 75 हजार 839 पशुधनाचे लसीकरण पुर्ण झाले आहे. 376 गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे तर आज पर्यंत 25 पशुधन लम्पी आजारामुळे मृत पावले आहेत. लम्पी चर्म रोगाने मृत झालेल्या जनावराच्या पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे हे अर्थसहाय्य 29 सप्टेंबर 2022 रोजी जमा करण्यात आले आहेत. इतर प्रकरणाचे प्रस्ताव जसे येत आहेत त्याप्रमाणे निकषानुसार प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी दिली.

 

लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छतापशुधनाच्या अंगावरील गोचिड व इतर किटकांमुळे होण्याचा संभव अधिक असतो. हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर जाऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

 

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील 58 गावे लम्पी बाधित आहेत. या 58 गावातील एकुण गाय वर्ग पशुधन हे 27 हजार 900 एवढे आहे. यातील 376 बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. बाधित गावाच्या किमी परिघातील गावांची संख्या 328 एवढी आहे. एकुण गावे 386 झाली आहेत. या बाधित 58 गावांच्या किमी परिघातील 386 गावातील (बाधित 58 गावांसह) एकुण पशुधन संख्या ही 1 लाख 7 हजार 809 एवढी आहे. लम्पीमुळे मृत पशुधनाची संख्या 25 एवढी झाली आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशुची स्वच्छतागोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...