Wednesday, May 7, 2025

 वृत्त क्रमांक :07 दिनांक: 8 मे, 2025

वापरात नसलेल्या व कालबाहय फ्रँकिंग मशिन

खरेदीसाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

लातूर(विमाका),दि.-08: विभागीय माहिती कार्यालयाच्या जडसंग्रह विभागातील फ्रँकिंग मशिन (स्टॅबिलिझर व बॅग सह) या वस्तूंची विक्री करावयाची आहे, त्यासाठी इच्छुक खरेदीदारांनी खरेदीबाबतची दरपत्रके विभागीय माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, उत्तरबाजू तळमजला, लातूर येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत दिनांक 13/05/2025 पर्यंत सादर करावीत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयात येऊन या वस्तुंची पहाणी करावी तसेच अटी व शर्तीची माहिती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

0000

वृत्त क्रमांक 481

बारावी परीक्षेच्या निकालानंतरही 

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा सुरू 

नांदेड दि. 7 मे :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वी परीक्षेच्या निकालानंतर राज्यमंडळ स्तरावर नियुक्त केलेल्या समुपदेशकांची समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. 

समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक 

9011302997, 8263876896, 9960644411, 7208775115, 8329230022, 9552982115, 8767753069, 7387400970, 8169202214, 9834084593 या भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील याची विद्यार्थी, पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

या परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्यमंडळ स्तरावरुन अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात येत आहे. 

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. 12 वीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली होती.

00000

 वृत्त क्रमांक 480

मिनी ट्रॅक्टर, उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत

अर्जदारांची निवड शुक्रवारी लॉटरी पद्धतीने होणार

नांदेड दि. 7 मे :- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेतंर्गत पात्र झालेल्या बचत गटाची संख्या उपलब्ध तरतुदीच्या अनुषंगाने अर्जदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने शुक्रवार 9 मे 2025 रोजी सकाळी 10 वा. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात येणार आहे. संबंधितांनी या निवडीसाठी ‍उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची योजना शासनाने सुरु केली आहे. शासन निर्णयान्वये या योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत.

000000

 वृत्त क्रमांक 479

100 दिवस कार्यालयीन सुधारणा;  जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सन्मान

 जिल्हाधिकारी नांदेड कार्यालय राज्यात पाचवे पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय राज्यात दुसरे

नांदेड दि. 7 मे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व कार्यालयांना 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने चांगले कार्य करून विभागात अव्वल रहात नावलौकिक मिळवलेला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात विविध सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वोत्तम कामगिरी बजावत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला.  या कामगिरीबाबत आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसात कार्यालयाचे रूप पालटले आहे. ई-फायलिंग पासून तर नागरिकांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे . याशिवाय या कार्यालयातील अंतर्गत स्वच्छता व नीटनेटकेपणा यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातले आहे .याची नोंद गेल्या महिन्यात तपासणी करता आलेल्या तटस्थ पथकाने देखील घेतली होती. विशेष म्हणजे विभागात हा पुरस्कार नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे. शंभर दिवसांच्या उपक्रमात एक टीम बनून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामाला हा  पुरस्कार मिळाला आहे.

 जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे.

 मंत्रालयात मंत्रिमंडळ कक्षात झालेल्या या पुरस्काराच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध विभागाचे मान्यवर उपस्थित होते. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात 9 विभागातील प्रथम क्रमांक आलेल्या कार्यालयांनी सादरीकरण केले. यावेळी गुणानुक्रमे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पहिल्या 5 क्रमांकाने आलेल्या सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वोत्तम जिल्हाधिकारी, सर्वोत्तम पोलीस अधिक्षक, सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त, सर्वोत्तम पोलीस आयुक्त, सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम आयुक्त, संचालक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.

हा कार्यक्रम नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड कार्यालयास पुरस्कार मिळाल्याबाबत व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना हा सन्मान प्राप्त झाल्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी टाळया वाजवून आनंद व्यक्त केला.

00000











  वृत्त क्रमांक   506   शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत  विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक   द्वितीय क्...