Monday, May 7, 2018


मंगळवारी पेन्शन अदालत

 

नांदेड,दि.7:-  शासनाच्या सुचनेनुसार मे, 2018 च्या दुसऱ्या मंगळवारी, दिनांक 8 मे, 2018 रोजी पेन्शन अदालत जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यामधील महसूल विभागातून सेवा निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11-00 ते दुपारी 1-30 वाजेपर्यंन्त हजर राहून तक्रारींचे निवेदने द्यावीत, असे जिलहाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

****  

लाभार्थ्‍याचे  गाव पातळीवर आधार कार्ड काढणे व अद्ययावत करण्यासाठी

14 ते 23 मे या कालावधीत कॅम्‍पचे आयोजन

 

            नांदेड , दि. 7:- नांदेड तालूक्‍यातील संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्‍ट्रीय वृध्‍दापकाळ योजना,  इंदिरा गांधी राष्‍ट्रीय विधवा योजना व श्रावण बाळ योजनेच्‍या लाभार्थ्‍याचे तालूकास्‍तरीय गाव निहाय गांवातील ग्राम पंचायत येथे विशेष मोहिमे अंतर्गत कॅम्‍प आयोजीत करून लाभार्थ्‍यांचे आधार क्रंमाक अद्यावत करणे, ज्‍या लाभार्थ्‍यांचे अद्याप पर्यंत आधार कार्ड काढले नाही किंवा आधार क्रमांक येत नाही अशा लाभार्थ्‍याचे सदर कॅम्‍प व्‍दारे आधार कार्ड तयार करण्‍याचे योजीले आहे. तसेच मंजुर लाभार्थ्‍यांचे आयसीआयसी बँकमध्‍ये खाते उघडण्‍याचे राहीले आहे त्‍या लाभार्थ्‍यांचे खाते काढण्‍यात येणार आहे.

            त्‍या अनुषंगाने खालील दिनांका प्रमाणे नांदेड ग्रामीण तालुक्‍यातील  लाभार्थ्‍याचे  गाव पातळीवर आधार कार्ड काढण्‍याकरिता कॅम्‍प आयोजीत करण्‍यात आला आहे. दिनांक 14 ते 23 मे, 2018 या कालावधीत या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पुढील दिनांकाप्रमाणे संबंधीत गांवच्‍या लाभार्थ्‍यांनी सदर ठिकाणी आधार अद्यावत व नविन आधार कार्ड काढण्‍याकरिता उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड तहसीदार किरण अंबेकर यांनी केले आहे.

दिनांक 14 मे, 2018 रोजी गावाचे नाव बळीरामपुर गोपाळचावडी बाभुळगांव नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय बळीरामपुर येथे वेळ 09 ते 05, दिनांक 15 मे, 2018 रोजी गावाचे नाव तुप्‍पा, धनेगांव, कांकाडी, मुजामपेठ, राहेगाव, भायेगांव नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय तुप्‍पा येथे वेळ 09 ते 05, दिनांक 16 मे, 2018 रोजी विष्‍णुपुरी, खुपसरवाडी, मार्कंड, पिपंळगाव नि. गंगाबेट, वाहेगाव व नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय विष्‍णुपुरी येथे वेळ 09 ते 05, दिनांक 17 मे, 2018 रोजी गावाचे नाव मरळक, तळणी पिपंरी (महि) निळा नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय मरळक बु येथे वेळ संकाळी 10 ते 02, नेरली, चिमेगांव, बोढार त नेरील चिखली खु कासारखेडा एकदरा पासदगाव नांदुसा नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय नेरली  येथे वेळ दुपारी 03.ते 06 , दिनांक 18 मे, 2018 रोजी गावाचे नाव लिंबगाव वडवणा ढोकी सायाळ वरखेड वानेगाव भानपुर नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय लिंबगाव येथे वेळ 09 ते 05 , दिनांक 19 मे, 2018 गावाचे नाव बोरगाव (तेलंग) सोमेश्‍वर, वाघी, सुगाव, थुगाव, नाळेश्‍वर, नसरतपुर व हस्‍सापुर जैतापुर नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय वाघी येथे वेळ 09 ते 05, दिनांक 21 मे, 2018 गावाचे नाव वाडी व पुयणी नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय वाडी बु येथे वेळ 09 ते 05, दिनांक 22 मे, 2018 गावाचे नाव वाजेगाव,वडगाव,इंजेगाव,सिध्‍दनाथ,पुणेगांव व नागापुर फत्‍तेपुर नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय वाजेगांव येथे वेळ 09 ते 05, दिनांक 23 मे, 2018 रोजी गावाचे नाव ब्राम्‍हणवाडा,कामठा खु, गाडेगांव,खडकुत, त्रिकुट, बोंढार त हवेली नेमुन देण्‍यात आलेले ठिकाण ग्राम पंचायत कार्यालय तहसिल कार्यालय नांदेड येथे वेळ 09 ते 05 यावेळेत राहील.   

****

नांदेड मध्ये विक्रमी 17 हजार 106 विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

होरायझन आणि जिल्हा प्रशासनातर्फे सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट नियोजन, विनात्रुटी सुरळीत परीक्षा

नांदेड,दि.7:- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सी.बी.एस.ई) घेण्यात येणारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2018 आज सुरळीत पार पडली,गेल्या चार दिवसापासून या कार्यासाठी होरायझन आणि जिल्हा प्रशासन यांची टीम प्रयत्न करीत होती. नीट परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यामुळे होरायझन आणि जिल्हा प्रशासनाच्या सुयोग्य नियोजन व व्यवस्थापनाला यश मिळाले आहे.

            सलग दुसऱ्यांदा या परीक्षेची जबाबदारी होरायझन डिस्कवरी अकॅडमी व जिल्हा प्रशासनाने पेलली आहे. या परीक्षेचे समन्वयक म्हणून होरायझनचे प्राचार्य फनिंद्र बोरा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, होरायझनचे अध्यक्ष व्ही.बी.चारी, सचिव अॅड.संजय रुईकर आणि होरायझन टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या अथक परिश्रमाला यश आले आहे.

            नांदेड केंद्राअंतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 17 हजार 400 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 44 केंद्रावर विक्रमी 17 हजार 106 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त,आरोग्य पथके, वाहतूक सुविधा, वीज पुरवठा यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध संस्था,स्वयंसेवी संघटना आदींनी हि सहकार्य केले अशी माहिती नीट परीक्षा शहर समन्वयक प्राचार्य फनिंद्र बोरा यांनी दिली आहे.

****  

जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या विद्यमाने

आजिवीका कौशल्य विकास  दिवस  उत्साहात साजरा

            नांदेड,दि.7:- ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार दिनांक 14 एप्रिल, 2018 ते 5 मे, 2018 दरम्यान जिल्हयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामी जिवनोन्नती अभियानांतर्गत आजिवीका कौशल्य विकास दिवस दिनांक 5 मे, 2018 रोजी जिल्हा स्तरावर सहयोग कॅम्पस, विष्णुपूरी नांदेड येथे साजरा करण्यात आला.

       दिनदयाल उपाध्याय ग्रामिण कौशल्य योजने अंतर्गत पेस आय टी एज्युकेशनल इन्स्टीटयुशनल सोसायटीचे महेश हिंगोले यांनी संस्थेमार्फत देण्यात येणा-या विविध अभ्यासक्रमांची माहिती उपस्थितांना दिली तसेच  विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. कांही यशस्वी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.

            आरसेटी अंतर्गत शेळीपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या स्वरोजगारींना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर आरसेटी मार्फत देण्यात येणा-या विविध प्रशिक्षणाची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.

            या आजिवीका दिवस कार्यक्रमात स्वयंसहायता समूहातील 215 महिलांनी आपला सहभाग नोंदविला. स्वंयसहायता समूहासाठी काम करणाऱ्या सी.आर.पी.नी आपले मनोगत व्यक्त केले.

            बार्टीच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती पोहरे यांनी महिला सक्षमीकरणा बाबत मार्गदर्शन केले. तसेच जे.जे. चे           श्री. संगमेश्वर श्री. संजय संकपाल रिजनल एज्यूकेशनल सोसायटी हैद्राबाद यांनी सहभाग नोंदविला.       

            सदरील कार्यक्रमास भारत सरकारचे केंद्रिय निरिक्षक सुब्रमण्यम रेड्डी,यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अखिल सक्सेना वाणिज्य विभाग भारत सरकार उपसचिव मुरलीधर मिश्रा यांनी स्वयंसहायता समुहांना विद्यार्थ्यांना  भावी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.

            कार्यक्रमाचा समारोप करताना जिल्हा रिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी यांनी नवयुवकांनी नोकरीच्या मागे लागता व्यवसायात उतरावे असे अवाहन केले. जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी .का.अ.(पं.) व्हि.आर.कोंडेकर, यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन केल्यामूळे जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जि.ग्रा.वि.यं. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ.प्रविणकुमार घुले यांनी केले.

तसेच वि.अ. जी.व्हि.पातेवार, जि.ग्रा.वि.यं. धनंजय देशपांडे, गंगाधर राऊत, (एमएसआरएलएम)  तालुकाव्यवस्थापक श्रीमती प्रणिता जाधव, महेश हिंगोले इतर कर्मचारी पेस आय. टी. एज्युकेशनल इन्स्टीटयुशनल सोसायटी यांनी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी  परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपूरी  नांदेड यांनी सभागृह उपलब्ध करुन देवून सहकार्य केले.

 

****





समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...