Monday, May 7, 2018


नांदेड मध्ये विक्रमी 17 हजार 106 विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

होरायझन आणि जिल्हा प्रशासनातर्फे सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट नियोजन, विनात्रुटी सुरळीत परीक्षा

नांदेड,दि.7:- केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (सी.बी.एस.ई) घेण्यात येणारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) 2018 आज सुरळीत पार पडली,गेल्या चार दिवसापासून या कार्यासाठी होरायझन आणि जिल्हा प्रशासन यांची टीम प्रयत्न करीत होती. नीट परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्यामुळे होरायझन आणि जिल्हा प्रशासनाच्या सुयोग्य नियोजन व व्यवस्थापनाला यश मिळाले आहे.

            सलग दुसऱ्यांदा या परीक्षेची जबाबदारी होरायझन डिस्कवरी अकॅडमी व जिल्हा प्रशासनाने पेलली आहे. या परीक्षेचे समन्वयक म्हणून होरायझनचे प्राचार्य फनिंद्र बोरा, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी  जयराज कारभारी, होरायझनचे अध्यक्ष व्ही.बी.चारी, सचिव अॅड.संजय रुईकर आणि होरायझन टीम आणि जिल्हा प्रशासन यांच्या अथक परिश्रमाला यश आले आहे.

            नांदेड केंद्राअंतर्गत या परीक्षेसाठी सुमारे 17 हजार 400 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 44 केंद्रावर विक्रमी 17 हजार 106 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त,आरोग्य पथके, वाहतूक सुविधा, वीज पुरवठा यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध संस्था,स्वयंसेवी संघटना आदींनी हि सहकार्य केले अशी माहिती नीट परीक्षा शहर समन्वयक प्राचार्य फनिंद्र बोरा यांनी दिली आहे.

****  

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...