Tuesday, October 15, 2024

 वृत्त क्र 943 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्‍यापासून

पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत आवाहन

 

नांदेड दि. 15 ऑक्टोबर :- महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्‍यात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे. नांदेड उत्‍तर व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ निवडणूकीची आदर्श आचारसंहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्‍यापासून पहिल्‍या 72 तासांत करावयाची कार्यवाहीबाबत पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात आले आहे.

 

आचारसंहिता लागू झाल्‍यापासून

पहिल्‍या 24 तासात करावयाची कार्यवाही

सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय/निमशासकीय कार्यालयातीलविभागातीलशाळामहाविद्यालयेशैक्षणिक संस्‍थेतील ठिकाणांवरीलमालमत्‍तेवरीलभुखंडजागाइमारती,संरक्षक भिंतीमैदानेरेल्‍वे स्‍टेशनबस स्‍थानकेहॉल्‍सप्रेक्षागृहे,नाट्यगृहेविमानतळशासकीय परिसररुग्‍णालयेदवाखाने सार्वजनिक उपक्रमाचे कार्यालये ठिकाणेयेथील तसेच वाहनेरुग्‍णवाहीकाशासकीय वाहने इत्‍यादीवरील राजकीय पक्षआजी-माजी राजकीय पदाधिकारीआजी माजी आमदारखासदारमंत्रीराजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पक्षराजकीय पदाधिकारी यांचे उभारलेलेस्‍थापित केलेलेप्रदर्शित केलेले नामफलकेकोनशिलाउद्घाटन फलकेउद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍यभित्‍तीपत्रकेबॅनर्सपोस्‍टर्सफ्लेक्‍सकट आऊट्सडिजीटलइलेक्‍ट्रॉनिक किंवा कोणत्‍याही स्‍वरुपातील प्रचार साहित्‍यजाहीराती किंवा इतर कोणत्‍याही स्‍वरुपातील तत्‍सम बाबी निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणेझाकणेआवेष्‍टीत करणे.

 

 

पहिल्‍या 48 तासात करावयाची कार्यवाही

सर्वच केंद्र शासनाचे व राज्‍य शासकीय,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांच्‍या मालकीचेसार्वजनिक ठिकाणांवरीलमालमत्‍तेवरीलभुखंडइमारतीजागासंरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरीलरुग्‍णालयेदवाखानेहॉल्‍सप्रेक्षागृहेनाट्यगृहेपरिसरपुलउड्डाणपुलविद्युत खांबटेलिफोनचे खांबबसरेल्‍वेविमानेहेलिकॉप्‍टरसर्व निमशासकीय वाहनेरुग्‍णवाहीका 2 इत्‍यादीवरील राजकीय पक्षआजी-माजी राजकीय पदाधिकारीआजी-माजी आमदारमा.खासदारमा.मंत्री महोदयराजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेलेस्‍थापित केलेलेप्रदर्शित केलेले नामफलकेकोनशिलाउद्घाटन फलकेझेंडेउद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍यजाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणेझाकणेआवेष्‍टीत करणे.

 

पहिल्‍या 72 तासात करावयाची कार्यवाही

सर्व खासगी ठिकाणांवरीलमालमत्‍तेवरीलभुखंडघरेकार्यालयेइमारतीदुकानेसंरक्षक भिंतीआस्‍थापना व सर्वच खाजगी ठिकाणेरुग्‍णालयेदवाखानेहॉल्‍सप्रेक्षागृहेनाट्यगृहेसर्व खाजगी वाहनेबसरेल्‍वेविमानेहेलिकॉप्‍टररुग्‍णवाहीका इत्‍यादी राजकीय पक्षआजी-माजी राजकीय पदाधिकारीआजी माजी आमदारखासदारमंत्रीराजकीय व्‍यक्‍ती इत्‍यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेलेस्‍थापित केलेलेप्रदर्शित केलेले नामफलकेकोनशिलाउद्घाटन फलकेझेंडेउद्घाटन शिला व इतर तत्‍सम प्रचार साहित्‍य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्‍यांचे विरुपण (defacement) करणेझाकणेआवेष्‍टीत करणेउपरोक्‍त नमूद कार्यवाही करण्‍यासाठीची वरील प्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्‍थ यंत्रणेमार्फत तात्‍काळ करण्‍यात यावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्‍या अनुषंगाने तात्‍काळ कार्यवाही करण्‍यात यावीअसे आवाहन 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे व 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.

0000

#विधानसभानिवडणूक२०२४

#विधानसभानिवडणूक२०२४

 वृत्त क्र 942 

आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

·         नांदेड जिल्ह्यामध्ये आजपासून आदर्श आचारसंहिता लागू

·         20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला निकाल लागणार

·         6 विधानसभा क्षेत्रात बोटाला एकदाच शाई मतदान मात्र विधानसभा व लोकसभेला

·         जिल्ह्यात 27 लक्ष 71 हजार एकूण मतदार

·         नऊ विधानसभा व एका लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

·         सोशल मीडियावर प्रचार प्रसार केल्यास सक्त कारवाई

·         72 तासात सर्व होर्डिंग व शासकीय कार्यालयातील प्रचार साहित्य साफ करा

·         मतदान करणे हा सुखद अनुभव बनविण्याचे प्रशासनाचे लक्ष्य 

नांदेड दि. 15 : नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदार संघात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबरला होत आहेत. तर नऊ पैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकही एकाच दिवशी 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन आज जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दोन्ही निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज असून आजपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले. नवी दिल्ली येथे भारतीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेनुसार महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यामध्ये तात्काळ आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याचे निर्देश दिले आहेत.  

नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून यामध्ये किनवट, हदगाव,भोकर,नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण,लोहा,नायगाव, देगलूर व मुखेड मतदार संघाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील तीन मतदारसंघ हे लोकसभेसाठी लातूर व हिंगोली मतदार संघात आहे. यामध्ये किनवट,हदगाव हे हिंगोली लोकसभा तर लोहा हा मतदार संघ लातूर मध्ये येतो. 

दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे आता विधानसभेसोबत लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.त्यामुळे लोहा, किनवट, हदगाव हे तीन मतदारसंघ वगळता अन्य सहा मतदार संघामध्ये यावेळी निवडणुकीसाठी मतदारांच्या बोटाला शाई एकदाच लागेल. मात्र त्यांना विधानसभा व लोकसभेसाठी मतदान करावे लागणार आहे. मतदान केंद्रामध्ये गेल्यानंतर विधानसभा व लोकसभा मतदान करण्यासाठी वेगवेगळ्या ईव्हीएम मशीन असतील व ४ ऐवजी ६ कर्मचारी तैनात असतील अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 3 हजार 88 केंद्र ; 5 संवेदनशील

जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण ३ हजार ८८आहे. मतदान केंद्रांचे ठिकाण 1992 आहे यामध्ये शहरी मतदान केंद्र 396 व ग्रामीण 1596 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100% मतदान अधिकारी महिला असलेले, 100% मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100% मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 9 आहेत. याशिवाय जिल्ह्यात ५ संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये किनवट मधील पांगरपाड, हदगाव मधील चोरंबा, भोकर मधील पाकी तांडा, देगलूर मधील रामतीर्थ, मुखेड मधील कोलेगाव केंद्रांचा समावेश आहे. या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाचे कर्मचारी तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी 21 हजारावर कर्मचारी तैनात केले गेले असून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लोकसभा पोटनिवडणूक लक्षात घेऊन या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे. 

कश्मीर पेक्षा अधिक मतदान व्हावे

निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जम्मू कश्मीर मधील दहशतवादी कारवाया असणाऱ्या भागात देखील नागरिकांनी अनेक ठिकाणी 60 ते 70 टक्के मतदान केल्याचे कौतुक केले. हे उदाहरण देऊन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी या निवडणुकीमध्ये आपले भविष्य ठरविण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे. मतदान करावे, असे आवाहन केले आहे. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांनी, तरूणांनी या संदर्भात जनजागरण करावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी मतदारांना मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा सावलीची व्यवस्था, रांगे विरहित मतदान करण्याची व्यवस्था, व्हीलचेअरची व्यवस्था,महिलांसाठी हिरकणी कक्ष, पाळणाघर व आवश्यकता भासल्यास ॲम्बुलन्सची व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आजूबाजूचा प्रत्येक नागरिक मतदान करेल यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरुणांनी या संदर्भात जनजागरण करावे व आपल्या जिल्ह्याची मतदान टक्केवारी वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच माध्यमांनी देखील या काळामध्ये या संदर्भात प्रचार प्रसार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 छापेमारी अधिक कडक करणार

निवडणुकीत दारू, पैशांचा गैरवापर करणारे तसेच दांडगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यामुळे फिरत्या पथकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये उद्यापासूनच धडक कारवाईला सुरुवात होत असून पोलीस व संबंधित सर्व यंत्रणेला कडेकोट बंदोबस्त, नाकेबंदी आणि छापेमारी करायला सांगण्यात आले आहे. 

समाज माध्यमांचा गैरव्यवहार टाळा

आचारसंहिता लागू झाल्यामुळे समाज माध्यमांवर वाटेल तशी पोस्ट टाकणे, प्रतिमा मलिन करणे, आरोप प्रत्यारोप करणे व त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करणे उद्यापासून बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासंदर्भात सायबर सेल ला कार्यान्वित करण्यात आले असून पोलिसांची करडी नजर समाज माध्यमावर असणार असल्याचेही त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राजकीय जाहिराती पेड न्यूज गणल्या जाणार असून उमेदवाराच्या खात्यात किंवा पक्षाच्या खात्यात टाकल्या जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात निवडणूक आयोगाचे पेड न्यूज बाबतचे स्पष्ट निर्देश वृत्तपत्रांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, नांदेड उत्तरचे निवडणूक उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, नांदेड दक्षिणचे निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, व निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 असा आहे कार्यक्रम

अधिसूचना जाहीर             : 22 ऑक्टोबर 2024

नामांकनाची अंतीम तारीख : 29 ऑक्टोबर 2024

नामांकनाची छाणणी          : 30 ऑक्टोबर 2024

नामांकन मागे अंतीम तारीख : 4 नोव्हेंबर 2024

मतदान तारीख.                   : 20 नोव्हेंबर 2024

मतमोजणी तारीख.              : 23 नोव्हेंबर 2024.

00000










#विधानसभानिवडणूक२०२४#लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हिंदीतील निवेदन...




जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्र व #नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात
पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत.

 










 

 विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी
नवी दिल्ली, 15 : महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राजधानीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार , संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. 22 ऑक्टोंबर निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोंबर असून, 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येऊ शकेल. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी राज्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येईल.
महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी असून, अनुसूचित जमात प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार असून, यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात असतील.
यावेळी निवडणूक आयोगाने 530 मॉडेल मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती श्री. राजीव कुमार यांनी यावेळी दिली. या निवडणुकीत 18.67 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यातील निवडणुकीसाठी सखोल तयारी सुरू असून नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नांदेड, केरळ आणि उत्तराखंड यासाठी पोटनिवडणुकीची तारीख निश्चित
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ,मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. नांदेड मतदारसंघातील विद्यमान खासदर वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्य आयुक्तांनी दिली. यासोबतच, केरळमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तसेच, उत्तराखंडमधील एका विधानसभेच्या मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्यात येईल.
पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूका सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलेली दक्षता व राज्यांना याबाबत दिलेले निर्देश
भारत निवडणूक आयोगाकडून जिल्हा निवडणूक अधिकारी (DEOs) आणि पोलीस अधीक्षक (SPs) यांना विशिष्ट निर्देश दिले आहेत, ज्यायोगे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्व पक्षांसाठी समान पातळी निर्माण केली जावी. यात , पूर्ण निष्पक्षता राखून कार्य करण्याबाबत आणि सर्वांसाठी समान पातळी सुनिश्चित करणे , मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांच्या डेस्कच्या उभारणीसाठी क्षेत्राचे स्पष्ट चिन्हांकन करणे, शक्य असेल तिथे सर्व मतदान केंद्रांमध्ये 100% वेबकास्टिंग सुनिश्चित करणे, सर्व मतदान केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे- विशेषतः शहरी भागात लांब रांगा असतील तिथे वयस्करांसाठी बसण्याची सोय, मतदारांची सोय पाहता मतदान केंद्रे निवासस्थानापासून 2 किलोमीटरच्या आत असल्याची खातरजमा , 'पब्लिक डिफेसमेंट अॅक्ट' अंतर्गत लोकांचा अनावश्यक छळ टाळणे, केंद्रीय निरीक्षकांची माहिती सार्वजनिक करणे व सोशल मीडियावर लक्ष ठेवून,खोट्या बातम्यांवर त्वरीत प्रतिसाद देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित
भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक, वेगवान आणि तंत्रज्ञान आधारित बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. या बदलांमुळे मतदार आणि उमेदवारांना अधिक सोयी आणि सुलभता मिळणार आहे. मतदार नोंदणी प्रक्रिया डिजिटल झाली असून, मतदारांना घरबसल्या ऑनलाइन फॉर्म भरून नोंदणी करता येते. मतदान केंद्राची माहितीही ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, सी-विजिल अॅपच्या माध्यमातून मतदारांना कोणत्याही गैरकृत्यांची माहिती थेट आयोगाला देता येते, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येते.
उमेदवारांसाठीही आयोगाने सुविधा पोर्टल उपलब्ध केले आहे, ज्याद्वारे उमेदवार नामांकन आणि शपथपत्र ऑनलाइन दाखल करू शकतील. याशिवाय, उमेदवारांच्या KYC ची संपूर्ण माहिती, जसे की गुन्हेगारी नोंदी, आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रचारासाठी सभा, रॅलींसाठी ऑनलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.या नवीन तंत्रस्नेही पद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक बनली आहे. याबाबत, ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्यामुळे मतदार आणि उमेदवारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
************




  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...