Monday, April 15, 2024

 वृत्‍त क्र. 344 

उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा, 

महाविद्यालयांनी उपाययोजना करण्यात : जिल्हाधिकारी

नांदेड दि. 15 :- संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या होणाऱ्या उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांच्या प्रमुखांनी आवश्यक ती काळजी व उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. 

जिल्ह्यात परीक्षा संपलेल्या असताना सुध्दा काही शाळांमध्ये वर्ग सुरु असल्याच्या सूचना जिल्हा नियंत्रण कक्षास
प्राप्त झाल्या आहेत. काही सीबीएसई मंडळाच्या शाळा 30 एप्रिलपर्यत सुरु राहणार असल्याचे निदर्शनास आले आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढत असून तापमान 40 अंशाच्या वर जात आहे. संभाव्य उष्णतेच्या लाटेच्या उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतचे आदेश आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्गमित केले आहेत.

जिल्ह्यातील सर्व शाळा ,महाविद्यालयांनी शालेय परिपाठ सकाळी कमीत कमी वेळेत व राष्ट्रगीत ,प्रतिज्ञा असा मर्यादीत ठेवावा. परिपाठ शक्यतो सावलीच्या ठिकाणी घेण्यात यावा. शाळेची वेळ वर्ग खोल्याचे योग्य नियोजन करुन सकाळच्या सत्रात मध्यान्हापूर्वी ठेवण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ, खेळाच्या तासीका, पि.टी., कवायत इ. उन्हाच्या कालावधीत आयोजीत करण्यात येवू नये. शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या आवारात मुबलक प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोपचाराची सुविधा शाळा व्यतवस्थापनाने उपलब्ध करुन द्यावी. जे विद्यार्थी, स्कुल बस अथवा इतर वाहनांनी शाळेत ये-जा करतात त्यांच्यासाठी व पालकांसाठी वाहन येईपर्यंत थांबण्यासाठी शाळेच्या आवारात शेड,सावलीची व्यवस्था करावी. वाढते तापमान लक्षात घेता शाळेच्या दर्शनी भागात, स्कुलबसमध्ये आपत्कालीन वैद्यकीय सुविधा बाबतचे क्रमांक ठळक अक्षरात प्रदर्शीत करावे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी स्कुलबसद्वारे ये-जा करतात अशा सर्व स्कुलबस मध्ये चालकासोबत एक मदतनीस ठेवण्यात यावा, शालेय कालावधी दरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज लक्षात घेता कोणताही विद्यार्थी, शिक्षक अथवा कर्मचारी यांना उष्माघाताचा त्रास होणार नाही यादृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना शाळा व्यअवस्थापनाने कराव्यात. या व्यतिरिक्त उष्ण‍तेच्या लाटेच्या कालावधीत उष्माघातापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी आवश्यक असतील अशा उपाययोजना शाळा व्यवस्थापनाने कराव्यात. शक्य असल्यास मुख्याध्यापकांनी त्यांचे स्तरावर शाळेला सुट्टी देण्याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

0000

वृत्‍त क्र. 343

 दुसऱ्या प्रशिक्षणास आले 'देश का महात्यौहारचे स्वरुप' 

नांदेड दि. १५ एप्रिल – सकाळचे प्रसन्न वातावरण, विविध सूचना बँनरने अचूक सजलेले उपस्थिती टेबल, उत्साही व तत्पर कर्मचारी, भव्य एलईडी स्क्रीन सह हारीने मांडलेल्या खुर्च्यासह सुसज्ज झालेले सभागृह, अधिकारी, मतदान अधिकारी, स्क्रीनवर भारत निवडणूक आयोगाचे दाखविलेले चिन्ह व छायाचित्र, उपस्थिती नोंदविणारे मतदान अधिकारी व कर्मचारी, टपाली मतदानासाठी सज्ज झालेले केंद्र, प्रत्यक्ष मतदान यंत्र प्रशिक्षणासाठी योग्य पध्दतीने तयार करण्यात आलेले रुम्स, दुचाकी व चारचाकीची करण्यात आलेली सुटसुटीत रचना, वातावरणात थंडावा निर्माण होण्यासाठी लावण्यात आलेली कुलर यंत्रणा, ज्यामुळे प्रशिक्षण घेणे व देणेसाठी सुसह्यतीचे व समाधानाची भावना असे दुसऱ्या प्रशिक्षणास आले देश का महात्यौहारचे स्वरूप. 16 नांदेड लोकसभातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे द्वितीय प्रशिक्षण आज 15 व 16 एप्रिल रोजी गुजराती हायस्कूल, वजिराबाद, नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. 

सकाळ व दुपार अशा दोन सत्रात प्रशिक्षणाची आज सुरुवात झाली. यावेळी प्रशिक्षण मंचावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 087 नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार उमाजी बोथीकर, प्रशिक्षण प्रमुख तथा नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू व संघरत्न सोनसोळे, प्रशिक्षण सहाय्यक यांची उपस्थिती होती. 

प्रशिक्षणाची सुरुवात भारत निवडणूक आयोगाच्यावतीने तयार केलेल्या उपयुक्त अशा पिपिटीद्वारे करण्यात आली. या पिपिटीमध्ये संपूर्ण मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष विविध दाखले व उदाहरणे देवून समजून देण्यात आल्यामुळे प्रशिक्षणार्थांना प्रक्रिया योग्यप्रकारे समजण्‍यास सुलभ झाली. पिपिटी नंतर उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी अत्यंत सविस्तरपणे विविध क्लिपद्वारे मतदान साहित्य हस्तगत करण्यापासून मतदान घेवून परत येईपर्यंतचे मार्गदर्शन केले. इव्हिएम यंत्र, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपँटची जोडणी, सिलींग प्रक्रिया, आदर्श मतदान केंद्र रचना, विविध फाँर्म्‍स , माँकपोल, प्रदत्त मत, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, संवेदनशील केंद्र कोणती, अशा केंद्राची वेब कास्टिंग करणे, मतदार सहाय्यता कक्षाद्वारे मतदारास कशी मदत केली जाईल, किमान सुविधा कोणत्या, प्रत्यक्ष मतदान सुरु करण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहेत, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी डायरी,मतदान अधिकारी एक, दोन,तीनची कार्ये, विविध नमुने अशा अनेक बाबींवर भरीव मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये अनेक प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे अचूक निरसन केल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षिण देण्यात आले. हँन्ड्स आँन ट्रेनिंगच्या टप्प्यात मतदान यंत्र हाताळू देण्यात आल्यामुळे अनेक अडचणीवर मात करण्यात आली. सकाळ सत्रात 360 पैकी 351 मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या सत्राचे सुत्रसंचालन प्रशिक्षण विभागाचे सदस्य संजय भालके यांनी केले. 

87 नांदेड दक्षिण, 86 नांदेड उत्तर, 89 नायगाव 90 देगलूर 85 भोकर 91 मुखेड या सहा विधानसभा मतदारसंघाच्या इडीसीचे वाटप करण्यात आले. पोस्टल बँलटसाठी हदगाव व किनवट येथील कर्मचाऱ्यांचे मतदान कक्ष प्रभू कपाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारुन मतदान घेण्यात आले. यावेळी मतदानासाठी आवश्यक असलेले निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्राचे वितरण डॉ .संदीप शिंदे, डॉ. दिगंबर कदम, श्रीमती शुभांगी जोशी , श्रीमती मनिषा मोहिते इत्यादी कर्मचाऱ्यांनी केले. हे प्रशिक्षण यशस्वीतेसाठी राजकुमार कोटुरवार, राजेश कुलकर्णी, विजयकुमार चोथवे,साधना देशपांडे, निकीता मैड व तहसील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000











वृत्‍त क्र. 342

समाज कल्याण कार्यालयात 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

नांदेड दि. १५ एप्रिलः – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  133 वी जयंती 14 एप्रिल, 2024 रोजी उत्साहात साजरी करण्यात  आली . जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मनपाचे आयुक्त महेश डोईफोडे यांचे समवेत सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी सकाळी 10 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 तसेच उपस्थित नागरीकांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी  समाज कल्याण अधिकारी बी.एस.दासरी व कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त कार्यालयास व कार्यालय परिसरात रोषणाई करण्यात आली.  कार्यालयाच्या प्रागंणात रांगोळी काढण्यात आली. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महिंद्रकर व सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचे हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले .

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यालयात सामुहीक बौध्द वंदना घेण्यात आली. तसेच समाज कल्याण कार्यालयाच्‍या अधिनस्त कार्यरत अनु.जाती. मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करुन जयंती निमित्त अभ्यासवर्ग, निबंध ,चित्रकला , प्रश्न मंजूषा, वक्तृत्व स्पर्धा इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या 133 व्‍या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. 

00000




 


 

वृत्‍त क्र. 341

नमस्‍कार ! 26 एप्रिल च्‍या मतदानाच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !!

सीईओ यांच्‍या आवाजातील उद्घोषणेने नांदेड बसस्‍थानकावरील प्रवाशी स्तिमित

मनपा आयुक्‍त डॉ. डोईफोडे यांनी लोकशाहीच्‍या बसमध्‍ये मतदान करुन स्‍वार होण्‍याचे केले आवाहन

 नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीप अंतर्गत जनजागृतीला प्रवाशांचा प्रतिसाद

नांदेड, दि. 15 : बसस्‍थानकावरील 'फलाट क्रमांक 1 वर लागलेली गाडी .....', अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणा-या प्रवाशांना आज सकाळी 10.15 वाजताच्‍या सुमारास वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होती... लोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची तिकिट काढण्‍यासाठी, आपल्‍या पसंतीच्‍या उमेदवाराला 26 एप्रिलला मतदान करण्‍यासाठी विसरु नका !

जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे जिल्‍हास्‍तरीय स्‍वीप समीतीचे प्रमुख आहेत. आज या उपक्रमांतर्गत जनतेचे प्रबोधन करण्‍यासाठी दोन्‍हीही अधिका-यांनी सकाळीच बसस्‍थानक गाठले. सकाळी जवळपास तासभर स्‍वीपची समिती आणि हे दोनही अधिकारी बसस्‍थानकावरील विविध उपक्रमामध्‍ये सहभागी झालेत.

आज सकाळी नांदेडच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकावर उभय अधिका-यांनी ‘मी मतदान करणार’ या सेल्‍फी पॉईंटचे उद्घाटन केले. त्‍यानंतर त्‍यांनी नांदेड जिल्‍ह्यातील अनेक बसेसवर स्टिकर चिटकवून प्रचार मोहिमेत सहभाग घेतला. २६ एप्रिलला प्रत्येक नागरिकांनी मताधिकार बजावावा , असे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे. त्यांनी स्वतः बसमध्ये चढून प्रवाशांसी संपर्क साधला तसेच त्यांना गुलाब पुष्प देऊन 26 एप्रिलला मतदान करण्याचे आवाहन केले.

नांदेड जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्‍या मार्गदर्शनात यावर्षी ८० टक्‍के मतदानाचे उद्दिष्‍ट जिल्‍ह्यामध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. त्‍याअंतर्गत लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्‍यापुर्वीपासून जिल्‍ह्यामध्‍ये वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यात येत आहे. सर्व महाविद्यालयीन तरुणांना यामध्‍ये सहभागी करण्‍यात आले आहेत. याशिवाय ८ मार्च ला जागतिक महिला दिनी महिला रॅली काढून जनजागृती करण्‍यात आली होती. त्‍यानंतर युवकांमध्‍ये स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच मतदान जनजागृती अभियान राबविण्‍यात आले. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला. याशिवाय उमेदच्‍या २ लाख महिलांसोबत एकाचवेळी शपथ आणि संवाद, महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांशी संवाद असे विविध उपक्रम जिल्‍ह्यामध्‍ये सुरु आहे. त्‍याला उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे.

आजच्‍या बसस्‍थानकावरील उपक्रमामध्‍ये एसटीचे विभाग नियंत्रक चंद्रकांत वडजकर, शिक्षणाधिकारी माध्‍यमिक माधव सलगर, शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, यंत्र अभियंता मंगेश कांबळे, वाहतूक अधीक्षक कमलेश भारती, आगार व्‍यवस्‍थापक अनिकेत बल्‍लाळ, बसस्‍थानक प्रमुख यासीन खान यांच्‍यासह संगीता साळुंके, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुधीर शिंदे, रवी ढगे, डॉ. राजेश पावडे, सारीका अचमे, सुनील मुत्‍तेपवार, शंकरराव नांदेडकर, साईनाथ चिंद्रावार, आशा घुले, शुभम तेलेवार आदींचा समावेश होता.

०००००



वृत्‍त क्र. 340

महामानवास अनोखे अभिवादन

मी मतदान करणारच फलकावर अनेक मतदारांनी केल्या स्वाक्षऱ्या

 नांदेड, दिनांक १४: बोधीसत्व-महामानव-ज्ञानसूर्य-भारतरत्न  डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 16 नांदेड लोकसभा अंतर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदानजागृतीसाठी तालुका स्वीप विभागाच्यावतीने तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आवाहानानुसार विक्रीकर भवन, डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ  " मी मतदान करणारच..! "  असा स्वाक्षरी फलक लावण्यात आला आहे.   

सर्व युवक, युवती, स्त्री,पुरुष  अभिवादनकर्ते मतदार या फलकावर स्वाक्षरी करुन मतदान करण्यासाठी येत्या 26 एप्रिल रोजी सज्ज होत आहेत. या फलकावर जयंतीनिमित्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नितेशकुमार बोलेलू,नायब तहसीलदार,उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, स्वीप सदस्य संजय भालके, राजेश कुलकर्णी, प्रलोभ कुलकर्णी,बाबुराव जाधव तसेच असंख्य अभिवादनकर्ते यांनी स्वाक्षरी करुन मतदान करणारच ही मतदाराची प्रतिज्ञा घेतली. यावेळी बहुसंख्य उपस्थित मतदारांनी  स्वाक्षरी करुन मतदान करण्याचा संकल्प घेतला.

॰॰॰॰॰





  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...