Wednesday, April 28, 2021

सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

                                सिटीस्कॅनचा स्कोअर बरोबर पंचवीसवर

आत्मविश्वास व डॉक्टराचे प्रयत्नातून 65 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- लोहा तालुक्यातील जोमेगाव या लहानश्या गावातील सुमारे 65 वर्षाचे कोंडजी शिंदे हे शेतकरी. भौतिक सुविधा व आजच्या जगात हाती असलेल्या मोबाईलपासून कोसोदूर.  उगवत्या सुर्याला नमस्कार घालायचा आणि शेतीच्या कामात स्वत:ला दिवसभर झोकून द्यायचे असा या बाबाचा शिरस्ता. पंधरा दिवसापूर्वी  त्यांना त्रास व्हायला लागला. तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर थेट पंचवीसवर.जवळच्या नातलगांनी त्यांना उचलून नांदेड येथील जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील कोविड रुग्णालयात दाखल केले. वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.

 

एक आव्हान म्हणून जिल्हा रुग्णालयातील टिमने त्यांच्यावर उपचार सुरु केले. एरव्ही श्वास घ्यायला जिथे बाबांना त्रास होत होता तो हळूहळू काही दिवसांत फुलायला लागला. कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण बाबांचा स्कोअर ऐकून जीथे धास्तीत होते, तेवढेच हे बाबा निर्धास्त होते. मोबाईलपासून कोसोदूर, बाह्य जगात काय चालू आहे यांच्या फारश्या भानगडीत न पडता डॉक्टर जे काही सांगतात ते श्रध्दा ठेवनू ऐकायचे आणि कोणतेही प्रश्न न विचारता दिलेल्या गोळया घ्यायच्या या बाबाच्या स्वभावामूळे उपचार करणाऱ्या टिमलाही त्यांचे विशेष अप्रुप झाले.  

 

चौदा दिवसांचा कालावधी या  बाबाला खूप मोठा झाला. दोन दिवसापूर्वीच त्यांचे ऑक्सीजन जेव्हा काढले  तेव्हा हे बाबा आता मला घरी जावू द्या म्हणून डॉक्टराच्या मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना बळजबरी दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. आजवरच्या कोविड उपचारात जिल्हा रुग्णालयातील ही सर्वोच्य सिटीस्कॅनची स्कोअर असलेली केस यशस्वी झाल्याने इतर रुग्णांचे आणि वैद्यकीय टिमचे मनोबल वाढावे, त्यांच्या अथक प्रयत्नांना शाबासकी द्यावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी त्यांची भेट घेवून त्यांना रुग्णालयातून शुभेच्छासह निरोप दिला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे पालक अधिकारी तथा विभागीय उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सिरसीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदी यावेळी उपस्थित होते.

00000

 

   

1 हजार 232 कोरोना बाधित झाले बरे नांदेड जिल्ह्यात 769 व्यक्ती कोरोना बाधित 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

 1 हजार 232 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड जिल्ह्यात 769 व्यक्ती कोरोना बाधित

 24 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 662 अहवालापैकी 769 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 617 तर अँटिजेन तपासणीद्वारे 152 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 78  हजार 701 एवढी झाली असून यातील 65  हजार  14  रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला  11  हजार  917 रुग्ण उपचार घेत असून 192 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 26 ते 28 एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 24 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 507 एवढी झाली आहे. दिनांक 26 एप्रिल रोजी आश्विनी रुग्णालय येथे बिलोली येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 27 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे पावडेवाडी नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 81 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 60 वर्षाची महिला, कुष्णूर तालुका नायगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, चांभरा तालुका हदगाव येथील 55 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 50 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 88 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 26 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे नवीन मोंढा नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, चिकाळा तालुका मुदखेड येथील 65 वर्षाचा पुरुष, भोकर येथील 40 वर्षाचा पुरुष, खडकपुरा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, गाडीपुरा नांदेड येथील 60 वर्षाचा पुरुष, बारसगाव तालुका अर्धापूर येथील 60 वर्षाचा पुरुष, नारायण रुग्णालय येथे कहाळा तालुका नायगाव येथील 70 वर्षाची महिला, स्वामी विवेकानंद रुगणालय येथे बंजरंग कॉलनी नांदेड येथील 51 वर्षाचा पुरुष, आश्विनी रुग्णालय येथे कंधार येथील 56 वषार्चा पुरुष, संजिवनी रुग्णालय येथे कैलास नगर नांदेड येथील 71 वर्षाचा पुरुष, दिनांक 28 एप्रिल रोजी सांगवी नांदेड येथील 70 वर्षाची महिला, मालेगाव तालुका बिलोली येथील 48 वर्षाचा पुरुष, उमरी तालुका नांदेड येथील 65 वर्षाची महिला, इंदिरा रुग्णालय येथे सातेगाव तालुका नायगाव येथील 65 वर्षाचा पुरुष, साईकृपा रुग्णालय येथे समता नगर नांदेड येथील 50 वर्षाचा पुरुष,  यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.60 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 285, बिलोली 44, हिमायतनगर 13,उमरी 26, नांदेड ग्रामीण 30, अर्धापूर 40, भोकर 18, देगलूर 4, धर्माबाद 3, हदगाव 27, हिमायतनगर 13, कंधार 7, किनवट 1, लोहा 13, मुदखेड 17, मुखेड 6, नायगाव 47, परभणी 8, यवतमाळ 4, सोलापूर 1, असे एकूण 617 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात 24, बिलोली 2, माहूर 12, हिमायतनगर 8, नांदेड ग्रामीण 1, कंधार 12, मुदखेड 3, मुखेड 4, अर्धापूर 19, धर्माबाद 31, किनवट 19, नायगाव 7, उमरी 1, हदगाव 5, लोहा 2, नागपूर 1, उस्मानाबाद 1 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 152 बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 1 हजार 232 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 13, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 724, धमार्बाद तालुक्यातंर्गत 35, देगलूर कोविड रुग्णालय 9, अर्धापूर तालुक्यातंर्गत 10, उमरी तालुक्यातंर्गत 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 19, मुखेड कोविड रुग्णालय 47, बिलोली तालुक्यातंर्गत 100, किनवट कोविड रुग्णालय 23, हिमायतनगर तालुक्यातंर्गत 38, नायगाव तालुक्यातर्गत 6, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 10, हदगाव कोविड रुग्णालय 1, कंधार तालुक्यातंर्गत 1, माहूर तालुक्यातंर्गत 9, लोहा तालुक्यातंर्गत 41, खाजगी रुग्णालय 119 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .   

 

आज 11 हजार 917 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय 195, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 161, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 98, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 90, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 121, देगलूर कोविड रुग्णालय 48, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 45, बिलोली कोविड केअर सेंटर 87, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 12, नायगाव कोविड केअर सेंटर 33, उमरी कोविड केअर सेंटर 54, माहूर कोविड केअर सेंटर 27, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 58, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 77, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 87 , मुदखेड कोविड केअर सेंटर 17, अर्धापूर कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 10, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 15, मांडवी कोविड केअर सेंटर 17, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 50, एनआरआय कोविड केअर सेंटर 67, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 39 ,  नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 5 हजार 153, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 3 हजार 56 , खाजगी रुग्णालय 2 हजार 175, हैद्राबाद येथे संदर्भित 1 असे एकूण 11 हजार 917 उपचार घेत आहेत. 

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 10, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 35 खाटा उपलब्ध आहेत.

 

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 54 हजार 591

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 66 हजार 779

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 78 हजार701

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 65 हजार 14

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 507

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.60 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-19

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-35

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-380

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 11 हजार 917

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-192

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...