Wednesday, November 8, 2017

जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी बैठक संपन्न
नांदेड, दि. 8 :- जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीच्या अनुषंगाने आज पुर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, सहाय्यक आयुक्त भगवान वीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी व विविध विभागांच्या योजनांसाठी सन 2017-2018 या आर्थिक वर्षात करण्यात आलेली तरतूद, त्याचा विनीयोग यांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बाबनिहाय आढावा घेतला. मंजूर नियतव्यय आणि खर्चाचे तसेच पुनर्विनियोजन याबाबत उपस्थित विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी नियतव्यय मंजूर असलेल्या बाबींबाबत संबंधीत विभागांनी तांत्रिक मंजूरी आणि प्रशासकीय मंजुरीनुसार उपलब्ध निधीचा वेळेत विनियोग करावा, असे निर्देश दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यन्वयन यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. सहायक नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांनी बैठकीचे संयोजन केले.  
000000


आधारभुत किंमत योजनेंतर्गत
भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजुरी
         नांदेड दि. 8 :- येथील मार्केटिंग फेडरेशन यांनी प्रस्‍तावित केलेले 13 आधारभूत खरेदी केंद्रास व प्रादेशिक व्‍यवस्‍थापक यवतमाळ यांनी प्रस्‍तावित केलेल्‍या 4 आधारभूत खरेदी केंद्रास मान्‍यता देण्‍यात आली आहे. आधारभुत किंमत योजनेंतर्गत सन 2017-18 हंगामासाठी ज्‍वारी, बाजरी, मका भरडधान्‍याचे व धानाचे विनिर्देश व तसेच किमान आधारभुत किंमती जाहीर केलेल्‍या आहेत. या योजनेचा लाभ शेतक-यांना व्‍हावा व कमी किमतीने धान्‍य विकावे लागु नये यासाठी ही खरेदी केंद्र चालू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.
          जिल्ह्यातील मंजुर केंद्रे पुढील प्रमाणे आहेत. (सब एजंट संस्‍थेचे नाव) कंसाबाहेर केंद्र - (कंधार तालुका सह.शे.ख.वि.संघ.मर्या.)- कंधार, (लोहा तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- लोहा, (मुखेड तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- मुखेड, ( देगलूर तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- देगलूर, (नायगाव तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- नायगाव, (धर्माबाद तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- धर्माबाद, (हदगाव तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- हदगाव व हिमायतनगर, ( बिलोली तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.) बिलोली, ( कुंडलवाडी वि.का.से.सह.सो.मर्या.)- कुंडलवाडी, (उमरी तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- उमरी, (भोकर तालुका सह.ख.वि.संघ.मर्या.)- भोकर, (नांदेड जि.फळे व भाजीपाला स.ख.वि.संस्‍था.मर्या.) नांदेड. केंद्र - मांडवी, जलधारा, मांडवा (किनवट), वाई (बाजार).  
            याबाबत जिल्हाधिकारी नांदेड यांनी जिल्‍हा मार्केटिंग अधिकारी नांदेड, उपप्रादेशिक व्‍यवस्‍थापक, आदिवासी विकास महामंडळ, किनवट व सर्व तहसिलदार यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. भरडधान्‍य खरेदीचा कालावधी 1 नोव्‍हेंबर ते 31 डिसेंबर 2017 व धान खरेदीचा कालावधी 5 ऑक्‍टोबर 2017 ते 31 मार्च 2018 राहील. प्रत्‍यक्ष खरेदी प्रक्रिया बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्‍ट्र स्‍टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन, मुंबई व आदिवासी क्षेत्रासाठी आदिवासी विकास महामंडळ या अभिकर्त्‍यामार्फत करण्‍यात यावी. ज्‍वारी, बाजरी, मका या भरडधान्‍य खरेदीच्‍या स्‍तरापर्यंत कार्यवाहीची जबाबदारी मुख्‍य अभिकर्त्‍याची राहील. मार्केटिंग फेडरेशन, आदिवासी विकास महामंडळ यांनी आवश्‍यक त्‍याठिकाणी केंद्र उघडणे, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची व्‍यवस्‍था करणे, केंद्रावर धान्‍य वाळवणे, स्‍वच्‍छ करणे, मुलभूत सुविधा चाळणी, पंखे, ताडपत्री, पॉलिथिन शिट्स, आवश्‍यक ती वजनमापे आर्द्रता मापक यंत्रे, बारदाना, सुतळी व इतर आवश्‍यक ती साधने खरेदी केंद्रावर उपलब्‍ध करुन देण्‍याची जबाबदारी खरेदी अभिकर्त्‍या संस्‍थेने घ्‍यावी. एफ.ए.क्‍यु. दर्जाचेच धान्‍य खरेदी करण्‍याची जबाबदारी अभिकर्त्‍याची आहे. तसेच त्‍यासाठी प्रशिक्षित ग्रेडर्स नेमणे व खरेदीचा दर्जा टिकून राहील याची दक्षता घेणे आवश्‍यक आहे. शेतक-यांच्‍या हितासाठी असलेली योजना शासन निर्णयातील क्र.7 कार्यपद्धती प्रमाणे अवलंबावी. खरेदी झालेले धान (भात) खरेदी अभिकर्त्‍यांनी स्‍वतःच्‍या गोदामात किंवा आवश्‍यकतेनुसार भाडयाच्‍या गोदामात साठवणुक करुन त्‍याची भरडाई करावी. केंद्र शासनाने ठरविलेल्‍या परिशिष्‍ट क्र. अ, ब, क, ड, इ मधील विनिर्देशानुसार ( उताऱ्यानुसार व इतर अटी व शर्तीनुसार ) धान भरडाई करुन शासनाच्‍या गोदामात जमा करावे. जमा करण्‍यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी अभिकर्त्‍याची राहील. केंद्र शासनाने हंगाम 2017-18 साठी आर्द्रतेचे अधिकतम प्रमाण 14 टक्के ज्‍वारी, बाजरी, मका यासाठी व 17 टक्के धानासाठी विहित केले आहे. या प्रमाणापेक्षा जास्‍त आर्द्रता आढळल्‍यास धान, भरडधान्‍य खरेदी करु नये. भरडधान्‍य स्‍वच्‍छ व कोरडे असून ते विक्रियोग्‍य (मार्केटेबल) असल्‍याचे अभिकर्त्‍याने खातरजमा करावी. महाराष्‍ट्र कृषी उत्‍पन्‍न खरेदी (नियम 1963 च्‍या नियम 32 (क) अन्‍वये कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या क्षेत्रात केंद्र शासनाच्‍या किमान आधारभुत किंमत योजनेअंतर्गत जाहीर करण्‍यात आलेल्‍या उत्‍पन्‍नाची कमी भावाने खरेदी केली जाणार नाही, बाजार समितीने दक्षता घ्यावी. याबाबत बाजार समितीने आळा घातला नाही तर त्‍यांच्‍या विरुध्‍द उपरोक्‍त नियमांच्‍या नियम 45 अन्‍वये योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात येईल. शासनाने जाहीर केलेल्‍या भरडधान्‍य, धानाच्‍या किंमतीचे फलक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्‍यात यावे. कोणत्‍याही बाजार समित्‍यांनी त्‍यांच्‍या क्षेत्रात झालेल्‍या धान, भरडधान्‍याचे दर कोणत्‍याही माध्‍यमाद्वारे प्रसिध्‍द करताना किंवा कळविताना खरेदी विक्रीचे दराबरोबर FAQ Non FAQ दर्जाबाबतसुध्‍दा कोणत्‍याही परिस्थितीत उल्‍लेख करण्‍यात यावा. खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्‍या धान्‍याच्‍या किंमतीतून पुरवठा खरेदी अभिकर्ता सहकारी संस्‍थांच्‍या कर्जापोटी शेतक-यांकडून 40 टक्‍के पर्यंत कर्जाची रक्‍कम वसूल करुन घेता येईल. (टंचाई परिस्थितीत त्‍या संबंधातील शासनाच्‍या आदेशाच्‍या अधिनतेने), धान, भरडधान्‍यासाठी फक्‍त 50 किलो क्षमतेचा बारदाना वापरण्‍यात यावा. केंद्राच्‍या विनिर्देशाप्रमाणे गोणी वापरण्‍याबाबत शासनपत्र क्रमांक खरेदी 1806/479/प.क्र. 3779/ना.पु.29 दि.30 मे 2006 अन्‍वये दिलेल्‍या सुचना विचारात घेण्‍यात याव्‍यात. या गोणींच्‍या वजन व दर्जाबाबत खरेदी केंद्राला गोणी पुरवठा होत असतानाच जिल्‍हा पणन अधिकारी यांनी स्‍वतः खात्री करुन घ्‍यावी. धान्‍य साठवणुकीसाठी वखार महामंडळाची, सहकारी संस्‍थांची खाजगी गोदाम भाडयाने घेण्‍यात यावीत. साठा उघडयावर साठविण्‍याची गरज उद्भवल्‍यास ते साठवण्‍यापूर्वी अशा अन्‍न धान्‍याच्‍या थप्‍प्‍याखाली व आजुबाजूस ड्रेनेज पुरवुन त्‍यावरुन पुर्णपणे पुरेसे ताडपत्र्यांनी झाकून ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात यावी. त्‍याचप्रमाणे गरजेनुसार नियमित ठेकेदाराकडून वेळीच धुरीकरण करुन धान्‍याचे किडीपासून संरक्षण करण्‍यात यावे. पावसापासून अन्‍नधान्‍याचे रक्षणाची काळजी घेण्‍यात यावी. खरेदी केलेले धान व धान्‍य हे आधारभुत किंमत योजनेखाली खरेदी केलेले धान्‍य यापासुन वेगळे ठेवावे व त्‍याचे लेखेही स्‍वतंत्र ठेवावे. लाभार्थ्‍याचे प्रदान ऑनलाइन करण्‍याबाबत केंद्र व राज्‍य शासनाचे निर्देश आहेत. ही बाब विचारात घेता अभिकर्ता संस्‍थानी त्‍यांच्‍या मुख्‍यालयातून थेट शेतक-यांच्‍या खात्‍यामध्‍ये खरेदी केलेल्‍या धान, भरडधान्‍याची रक्‍कम अदा करावी. कोणत्‍याही परिस्थितीत सदर रक्‍कम धान/भरडधान्‍य खरेदी केलेल्‍या दिवसापासून पुढील 7 दिवसांपासून शेतक-यांच्‍या खात्‍यामध्‍ये जमा झाली पाहिजे. खरेदी अभिकर्त्‍यांनी या योजनेअंतर्गत खरेदी केल्‍या जाणा-या धान, भरडधान्‍यासाठी संबंधित शेतक-यांच्‍या 7/12 उता-यांची प्रती इतर मुळ अभिलेखे त्‍यांच्‍या कार्यालयात ठेवावे. धान, भरडधान्‍य खरेदी प्रदानाच्‍या संदर्भात अतिप्रदान किंवा चुकीची देयके सादर करुन रक्‍कमा अदा केल्‍या जाणार नाहीत याबाबतची सर्वस्‍वी जबाबदारी अभिकर्ता संस्‍थेची राहील. धान्‍याची खरेदी करीत असताना संबंधित तालुक्‍यातील तहसिलदारानी खरेदीच्‍या कालावधीत दर्जानियंत्रण व दक्षता पथकाची स्‍थापना करावी. दक्षता पथक म्‍हणून तहसिलदार यांनी काम पहावे. अभिकर्ता संस्‍थांनी दररोजचा केंद्रनिहाय खरेदी अहवाल सायंकाळी 5.30 पर्यंत कंट्रोल रुमला तसेच या कार्यालयास पाठवावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.   
           शासन निर्णय दि. 4 ऑक्‍टोबर 2017 मधील अटीच्‍या अधिन राहून खरेदी केंद्रांना मंजुरी देण्‍यात आली आहे. खरेदी अभिकर्ता व संबंधित तहसिलदार यांनी नियमांचे व शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तींचे काटेकोरपणे पालन करावे. खरेदी केंद्रावर खरेदीची प्रक्रिया पार पाडत असताना शासन निर्णयाची अंमलबजावणी करताना निष्‍काळजीपणा केल्‍यास व त्‍यामुळे शासनाचे नुकसान झाल्‍यास त्‍यांची सर्वस्‍वी जबाबदारी संबंधितांवर राहणार आहे. अधिनस्‍त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना याची नोंद घेण्‍यास लेखी कळवावे, असेही म्हटले आहे.

0000000
महिलांसाठी लवकरच नवीन उद्योग धोरण
- डॉ. हर्षदीप कांबळे
नांदेड, दि. 7 :-   राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, अधिकाधिक महिला उद्योजक तयार व्हाव्यात म्हणून राज्य शासन लवकरच महिलांसाठी नवीन उद्योग धोरण आणत आहे. येत्या तीन वर्षात पाच हजार महिला उद्योजक राज्यात तयार व्हाव्यात असा राज्य शासनाचा मानस आहे , अशी माहिती राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज येथे दिली.
येथील उद्योग भवनाच्या भेटीवेळी माजी समाज कल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, औरंगाबाद येथील माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे, उद्योग विकास विभागाचे अधिक्षकीय उद्योग अधिकारी यु. एस. पुरी , राज्य लघु उद्योग विकास मंडळाचे विभागीय व्यवस्थापक बी. डी. जगताप , महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड जी. बी. लाडे, फर्निचर , मुद्रणालय , प्रिंटींग , ज्वेलरी , लघुउद्योगाच्या संघटना आदी उद्योगाशी संबंधित उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील उद्योग विकास आणि जिल्ह्यात सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात तयार झालेल्या मुद्रण विषयक कलस्ट, ज्वेलरी क्लस्टर , फर्निचर क्लस्टर आदीबाबत चर्चा केली. त्यानंतर उद्योग भवनात सुरु असलेल्या मीनी दालमिल आणि सीताफळ पल्स निर्मिती उद्योग प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. कांबळे यांनीही माहिती दिली.   
तसेच महाराष्ट्र शासनाच्या सुक्ष्म व लघु उद्योगाच्या क्लस्टरकरिता सामुहिक सुविधा केंद्र उभारणे या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत नांदेडमध्ये प्रिटींग क्लस्टर, ज्वेलरी क्लस्टर , स्टील फर्निचर क्लस्टर व माहूर येथे बंजारा आर्ट क्लस्टरला शासनाने मंजूरी दिलेली आहे. त्यापैकी प्रिंटींग क्लस्टर कार्यान्वित झाले असून, त्यातील सामुहिक सुविधा केंद्रामध्ये प्रिंटींगच्या अद्ययावत मशिनरी शासनाने रु. 4.77 कोटीचे अनुदान देवून उभारणी केली आहे. त्याचा उपयोग नांदेड शहर व आजुबाजूच्या परिसरात जवळपास 90 प्रिंटींग व्यावसायिक घेत आहेत. या क्लस्टरच्या केंद्राच्या पाहणी करण्याकरिता उद्योग विभागाचे विकास आयुक्त तथा सचिव, सुक्ष्म व लघु , मध्यम उपक्रम डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आज येथे भेट दिली. त्यांच्या भेटीमध्ये त्यांनी सदर क्लस्टर पाहणी करुन क्लस्टरच्या सदस्यांच्या प्रगती व अडीअडचणीबाबत विस्तृत चर्चा केली.
तसेच डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शिवाजीनगर येथील उद्योग भवनमध्ये भेट देवून सर्व क्लस्टरच्या सदस्यासोबत चर्चा करुन शासनाच्या योजनेचा जास्तीतजास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले. उद्योग भवनमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र याच्यामार्फत आयोजित एक दिवसीय दालप्रक्रिया चर्चा सत्रास भेट देवून उपस्थित जवळपास 50 लाभार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यांनी ग्रामीण भागातील उद्योजकांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेवून, स्वंयस्फुर्तीने छोटे-मोटे उद्योग सुरु करावेत, असेही आवाहन केले. उद्योजकांना शासन सामुहिक प्रोत्साहन योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम इ. योजनेच्या माध्यमातून सर्वेात्परी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकरिता त्यांनी दाखविलेला उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल उद्योजकांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.

राज्य शासनाच्या उद्योग विभागाने मैत्री नावाचे ऑनलाईन पोर्टल तयार केले असून उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती त्यावर टाकल्यास त्या अडचणी सोडविण्यात येतील, असे सांगून डॉ. कांबळे यांनी उद्योग विकास विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेवून उद्योग उभे करावेत, असेही आवाहन केले.                                                 000000
शिल्पनिदेशक पदासाठी
15 नोव्हेंबरला मुलाखत
नांदेड, दि. 8 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे शिल्पकारागीर योजनेंतर्गत शिल्पनिदेशकाचे पदे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर तत्वाभ्यास व प्रात्यक्षिक शिकविण्यासाठी नेमणुक करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी बुधवार 15 नोव्हेंबर 2017 रोजी मुलाखतीसाठी मुळ व छायांकित कागदपत्राच्या प्रतीसह सकाळी 11.30 वा. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धर्माबाद येथे उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

यांत्रिक कृषित्र, संधाता, कातारी, वीजतंत्री या व्यवसायासाठी शैक्षणिक अर्हता ही संबंधीत व्यवसायातील यंत्र, विद्युत अभियांत्रिकी किमान द्वितीय श्रेणीतील पदवी, पदविका व एक, दोन वर्षाचा अनुभव किंवा संबंधीत व्यवसायातील आयटीआय प्रमाणपत्र एनसीव्हीटी, एटीएस परीक्षा उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सीटीआय उत्तीर्ण उमेदवारास व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले शिल्पनिदेश, गटनिदेशक यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड झालेलया उमेदवारांना शासन निर्णयातील अटी मान्य असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतरच तासिका तत्वावरील नियुक्ती मिळेल. यापुर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी उपस्थित रहावे. तसेच त्यानंतर आलेल्या संबंधीत उमेदवारांचा विचार केला जाणार नाही, असेही संस्थेचे प्राचार्य यांनी आवाहन केले आहे.
000000 
कापुस, तुर पिकासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 8 :- कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या  5 तालुक्यामध्ये तुर, कापुस पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पिकावरील किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांनी दिला आहे.
कापाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 10 इसी 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच लाल्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट 1 टक्के फवारणी करावी. तुर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट 5 एसजी 4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी, इनएसई (निबोंळी तेल ) 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन नांदेडचे उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000
शेतकरी गटांनी प्रकल्प अहवाल सादर करावा  
नांदेड, दि. 8 :- जगातिक बँकेच्या अर्थ सहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (MACP) अंतर्गत कृषी व्यावसायिकतेवर आधारित कृषी उद्योजकता विकास कार्यक्रम (ई.डी.पी) राबवण्यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी वैयक्तीक उद्योजक शेतकरी गटामधील सदस्य यांच्याडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे. शनिवार 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत प्रकल्प अहवाल संबंधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन
यामध्ये काढणी पश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन धान्य फळे विषयक प्रकल्प, मुल्यवर्धन प्रक्रिया प्रतवारी पणन संदर्भातील प्रकल्प, कृषि पणन विषयक प्रकल्प, कृषी मुल्यवर्धनासाठी यांत्रिकीकरण प्रकल्प अहवाल, कृषि व्यवसायाला प्रोत्साहन मिळण्यासाठीचे उपक्रम (ग्री क्लिनिक ग्री बिझनेस सेंटर), शेतकरी गटाने, संघाने कृषी अवजारे सामूहिक भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी पणन याबाबत प्रोत्साहन देणारे प्रकल्पांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यासाठी या योजनेत 2 प्रकल्पांचे द्दीष्ट आहे यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

प्रस्तावामधील उद्योजक उभारणीसाठी लागणारी मशीनरी, उपक्रम बांधकाम ह्या बाबींनाच सहाय्य उपलब्ध आहे. एकूण प्रकल्पाच्या 50 टक्के किंवा जास्तीतजास्त 10 लाख रुपये अनुदान देण्यात येईल. यामध्ये मशीनरी, उपकरणे, बांधकाम त्यादी बाबींचा समावेश असेल. सर्वसाधारणपणे एकूण प्रकल्पाच्या 40 टक्के बांधकाम 60 टक्के मशिनरी उपकरणे, यासाठी अनुदान देता येईल. जमिन खरेदी याबाबी अर्थ सहाय्यासाठी गृहीत धरल्या जाणार नाहीत. प्रकल्प किमान 6 वर्षे यशस्वीपणे चालविणे बंधनकारक आहे. तसेच प्रकल्पाच्या अटी शर्ती शेतकरी गटास, शेतकरी उत्पादक कंपनीस वैयक्तीक उद्योजक शेतकरी गटामधील सदस्य यांना बंधनकारक राहतील. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. 7588057855 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कार्यालय नांदेड किंवा www.macp.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, नांदेड यांनी केले आहे.

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...