Wednesday, November 8, 2017

जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी बैठक संपन्न
नांदेड, दि. 8 :- जिल्हा नियोजन समितीच्या आगामी बैठकीच्या अनुषंगाने आज पुर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटचे प्रकल्प अधिकारी अजित कुंभार, सहाय्यक आयुक्त भगवान वीर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 
जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी व विविध विभागांच्या योजनांसाठी सन 2017-2018 या आर्थिक वर्षात करण्यात आलेली तरतूद, त्याचा विनीयोग यांचा जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी बाबनिहाय आढावा घेतला. मंजूर नियतव्यय आणि खर्चाचे तसेच पुनर्विनियोजन याबाबत उपस्थित विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.  
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी नियतव्यय मंजूर असलेल्या बाबींबाबत संबंधीत विभागांनी तांत्रिक मंजूरी आणि प्रशासकीय मंजुरीनुसार उपलब्ध निधीचा वेळेत विनियोग करावा, असे निर्देश दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत कार्यन्वयन यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. सहायक नियोजन अधिकारी एस. एस. राठोड यांनी बैठकीचे संयोजन केले.  
000000


No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...